महाड अपघात स्थळी आपत्ती निवारण व मदत कक्ष स्थापन
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग दूरध्वनी -222019, ई मेल- dioraigad@ gmail.com, dioabg@rediffmail.com फेसबुक :- dioraigad ट्विटर :- dioraigad वृ.क्र.472 दिनांक :- 04/08/2016 महाड अपघात स्थळी आपत्ती निवारण व मदत कक्ष स्थापन अलिबाग दि. 4 - महाड जवळील सावित्री नदीवर असलेल्या पुलाच्या अपघात स्थळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्ती निवारण कक्ष तसेच मदत केंद्राची स्थापना करण्यात आली असून महाड उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे या नियंत्रण कक्षात समन्वयक आहेत. नातेवाईकांना सहकार्य या कक्षामार्फत शोध कार्यावर नियंत्रण तसेच बेपत्ता, मृतांच्या नातेवाईकांना माहिती देणे मार्गदर्शन करणे तसेच त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था पहाणे या बरोबरच सापडलेल्या मृतदेहाचे शव विच्छेदन व संबंधीतांच्या गावापर्यंत मृतदेह पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येत आ