1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार महिला खातेदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न ---जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 30 जुलै 2016                                                             वृत्त क्र.460

1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार
महिला खातेदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न
                                                             ---जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले                                                      
                 
अलिबाग दि. 30:-  संपूर्ण राज्यात 1 ते 7 ऑगस्ट 2016 या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.  या सप्ताहात महिलांसाठी शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना याची माहिती महिलांना देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिली. 
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल, तहसिलदार जयराज देशमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना त्या पुढे म्हणाल्या की, या सप्ताहात गावपातळीवर महिलांची सभा घेण्याबाबत संबंधित तलाठयांना तहसिलदारांमार्फत सूचना देण्यात आल्या आहेत.  या महिला सभेला विविध विभागाचे संबधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.  कुटुंब प्रमुख महिलांचे, महिलां खातेदारांच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.  महिला खातेदारांकडून आलेल्या अर्जांचा, तक्रारींचा निपटारा याच आठवडयात करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर संपर्क अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी नेमले आहेत.   महसूल सप्ताहात महिलांचे प्रश्न सोडविण्या संदर्भात खाजगी स्वयंसेवी संस्था यांची आवश्यक ठिकाणी मदत घेण्यात येणार आहे.
या सप्ताहात  प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक योजना, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना, नरेगा अंतर्गत जॉबकार्ड वाटप करणे, निशुल्क 7/12 वाटप करणे, महिलांच्या वारस नोंदी करणे, 8 अ वाचन करणे, शालेय विद्यार्थींनींना विविध प्रकारचे दाखले वाटप, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना, माजी कन्या भाग्यश्री योजना, मनोधर्ये योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अशा महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या 27 योजनांची माहिती महिलांना देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
000000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक