Posts

Showing posts from September 11, 2022

खरवई गावातील शेतकरी व नागरिकांना ई-पीक पाहणीबाबत मार्गदर्शन

Image
  अलिबाग,दि.16 (जिमाका):-  खालापूर तालुका महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या वतीने ई-पीक पाहणीबाबत खरवई गावातील शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन तसेच ई-पीक पाहणीचे प्रशिक्षणही देण्यात आले. यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत उपस्थितांना माहिती दिली. यावेळी तलाठी प्रतीक बापर्डेकर, कृषी सहाय्यक मंजुषा शिंदे, भारतीय कृषी विमा कंपनी खालापूर तालुका प्रतिनीधी गणेश सावंत, पंकज साखरे, कोतवाल सुरेश ठोंबरे या सर्वांनी उपस्थित शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी खरवई गावातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते. 00000

प्रधानमंत्री किसान सन्मान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

  अलिबाग,दि.16 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यामध्ये  1 लाख 74 हजार 216 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थी असून 1 लाख 34 हजार 289  शेतकऱ्यांनी आधारकार्ड जोडलेले आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार नुकत्याच जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या ई-केवायसी अद्ययावतीकरणानुसार आत्तापर्यंत एक लाख 16 हजार 540 (88.61%) लोकांनी ई-केवायसी अपडेट केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड, ज्यामध्ये पीक लागवडीसाठी, पशुधन संगोपनासाठी, मच्छी पालनासाठी, बँकेकडून खेळते भांडवल मंजूर करण्यात येते, त्या शेतकऱ्यांनी आपले खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेत संबंधित कागदपत्रे जमा करून किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केली आहे. यासाठी संबंधित कृषी विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत, बँका यांना आपापल्या क्षेत्रांमध्ये एकमेकांच्या संहयोगाने मेळावा घेऊन किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश माननीय जिल्हाधिकारी दिले आहेत. तरी संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजने

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी दि.20 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

Image
अलिबाग,दि.16 (जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने  “ नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ”  मंगळवार, दि.20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल, मुंबई-पुणे महामार्ग, गांधी हॉस्पिटलसमोर, ता.पनवेल, जिल्हा-रायगड येथे आयोजित केला आहे. जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील 467 पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या रोजगार मेळाव्यात एस.एस.सी. पास, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, फार्मासिस्ट इत्यादी नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती  www.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर उपलब्ध असून अधिक माहितीकरिता या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02141-222029 वर संपर्क साधावा. तसेच या विनामूल्य रोजगार मेळाव्यास नोकरी इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त

“स्वच्छ सागर सुरक्षित सागर” “स्वच्छ किनारा सुरक्षित समुद्र” मोहीमेसाठी शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे

    अलिबाग,दि.16(जिमाका):- केंद्र शासनाचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय, इतर मंत्रालये तसेच स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाज यांच्या सहकार्याने भारतीय किनारपट्टीवरील 75 समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची 75 दिवसांची “ स्वच्छ सागर सुरक्षित सागर ” “ स्वच्छ किनारा सुरक्षित समुद्र ” मोहीम सुरू केली आहे.        ही मोहीम दि.5 जुलै 2022 रोजी सुरू झालेली असून या मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अलिबाग, वरसोली, किहिम, मांडवा, रेवदंडा, आक्षी, नागाव,   तर मुरुड तालुक्यातील मुरुड, काशीद, आणि श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, मारळ, वेळास, आरावी या समुद्रकिनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.                   या मोहिमेंतर्गत निवड करण्यात आलेल्या समुद्र किनाऱ्यांवर शनिवार, दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.   त्यानुसार समुद्र किनारी स्वच्छता मोहिमेसाठी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी   यांनी उपस्थित राहावे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी कळविले आहे. 0000000

वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून रब्बी भाजीपाला व कडधान्य क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील

    अलिबाग,दि.16(जिमाका):- या वर्षात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत ओढे नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. सध्या पावसाळा संपत आल्यामुळे ओढे नाले यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारे हाती घेण्यात यावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.               जुलै ते सप्टेंबर पावसाळा हंगाम संपल्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत नाले व ओढ्यांमधून पाण्याचा प्रवाह सुरू असतो हा पाण्याचा प्रवाह पारंपारिक पद्धतीने अडवून पाण्याचा साठा करून बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज काही अंशी भागवण्यासाठी उपलब्ध साधनांचा जसे की सिमेंट किंवा खताची मोकळी पोती, वाळू, माती, इत्यादीचा वापर करून बांधलेला बंधारा म्हणजे वनराई बंधारा होय. दहा मीटर लांबीचा व 1.20 मीटर उंचीचा वनराई बंधारा बांधण्यासाठी ३९ पोती आवश्यक असतात यातून 2 हेक्टर क्षेत्राकरिता संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध होऊ शकते. यामुळे रब्बी हंगामातील कडधान्य व भाजीपाला पिकांना याचा लाभ होणार आहे.      जिल्ह्यामध

तृतीयपंथियांनी नोंदणी करून ओळखपत्र मिळविण्याकरिता समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा -सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव

    अलिबाग,दि.16 (जिमाका):-   जिल्ह्यातील तृतीयपंथियांच्या समस्यांच्या/तक्रारी संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानुसार तृतीयपंथियांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत ओळखपत्र देण्यात येणार आहे. या ओळखपत्रासाठी तृतीयपंथीय व्यक्तींनी   www.transgender.dosje.gov.in   या पोर्टलवर तात्काळ नोंदणी करावी. तसेच तृतीयपंथीय व्यक्तींनी आपल्या काही तक्रारी असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड, कच्छी भवन, नमिनाथ मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. 00000

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील आर्थिक स्तर उंचाविलेल्या शिधापत्रिकाधारकांनी सवलतीच्या दराने मिळणारे अन्नधान्य नाकारण्याचे प्रशासनाचे आवाहन

    अलिबाग, दि.16 (जिमाका):-   राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वेच्छेने सवलतीच्या दराने मिळणारे अन्नधान्य नाकारण्याचा (GIVE IT UP) पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावा, याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. जे शिधापत्रिकाधारक राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेचे लाभ मिळण्यास पात्र होते, मात्र कालांतराने त्या शिधापत्रिकाधारकांचे व शिधापत्रिकेतील सदस्यांचे आर्थिक उत्पन्न वाढले व त्यांचा आर्थिक स्तर उंचावला असून आता त्यांचे उत्पन्न अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेच्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे अशा शिधापत्रिकाधारकांनी त्यांची शिधापत्रिका अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतून स्वखुशीने बाहेर पडून त्यांच्या उत्पन्नाच्या निकषानुसार त्यांनी केशरी किंवा शुभ्र शिधापत्रिका प्राप्त करुन घेण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालयात जावून तसा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या GIVE IT UP चा अर्ज भरुन देवून उत्पन्नानुसार केशरी व शुभ्र शिधापत्रिका घ्याव्यात. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांनी त

सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने मासेमारी नौकेवरील कार्यरत नौकामालक,तांडेल व खलाशांना मिळणार क्यू आर कोड आधारकार्ड

         अलिबाग,दि.14 (जिमाका):- केंद्र शासनाकडून मासेमारी नौकेवरील कार्यरत नौकामालक, तांडेल व खलाशी यांना सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने क्यू आर कोड असलेले आधार कार्ड देण्याबाबत कळविण्यात आले आहे. संस्थेमार्फत प्राप्त अर्ज व त्याचा गोषवारा नोडल अधिकाऱ्यांमार्फत प्रादेशिक आधार ओळखपत्रे कार्यालय यांच्या सॉफ्टवेअर द्वारे अपलोड करण्यात येतो.      उर्वरित स्थानिक व परप्रांतीय खलाशी वर्ग तसेच क्रियाशील मासेमाऱ्यांना क्यू आर कोड असलेले ओळखपत्र देण्याच्या दृष्टीने दि.12 सप्टेंबर ते दि.12 ऑक्टोबर 2022 या कालावधीपर्यंत अर्ज घेवून कार्ड वितरीत करण्याची कार्यवाही करण्याबाबत मुख्य कार्यालयाने कळविले आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने वातावरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे समुद्रात मासेमारी करणाऱ्या सर्व नौकांची काटेकोर तपासणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   त्यादृष्टीने आपल्या कार्यक्षेत्रातील सागरी मासेमारी करणाऱ्या उर्वरित नौका मालक/ तांडेल/ खलाशी तसेच नव्याने आलेले तांडेल व खलाशी यांना नवीन आधार ओळखपत्र उपलब्ध करून देण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.      उर्वरित

“महिला आयोग आपल्या दारी” जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात- रुपाली चाकणकर यांचे आवाहन

    अलिबाग, दि.14 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “ महिला आयोग आपल्या दारी ” या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हयात दि.16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता, जिल्हा नियोजन भवन येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली असून आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर आणि सदस्या या स्वतः तक्रारीची सुनावणी घेणार आहेत.                 आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर या दि.16 सप्टेंबर 2022 रोजी रायगड जिल्हयाचा दौरा करणार आहेत. केंद्र शासनाकडून सप्टेंबर महिना पोषण महा म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधत आयोगाकडून पोषण पंचायत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दु.12 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात आहारतज्ज्ञ, स्त्री रोग तज्ञ, अंगणवाडी सेविका, महिला, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पारंपारिक खाद्यातून पोषक आहार यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानंतर दु. 3 वाजता महिला आयोग अध्यक्षा रायगड जिल्हयाची आढावा बैठक घेणार असून यावेळी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच आरोग्य, परिवहन, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. हे सर्व कार्यक्रम जि

समाज कल्याण विभागाच्या वैयक्तिक अर्थसहाय्य लाभ व सामूहिक योजनेसाठी पात्र मागासवर्गीय लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

    अलिबाग, दि.14(जिमाका):- रायगड जिल्हा परिषदेच्या सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात 20 टक्के जिल्हा परिषद सेस निधीमधून वैयक्तिक अर्थसहाय्य लाभाच्या योजना डीबीटी तत्त्वावर व सामूहिक योजना राबविण्यात येत आहे.        या योजना पुढीलप्रमाणे आहेत-            वैयक्तिक योजना :- संगणक, शिलाई मशीन, ड्रायव्हिंग, बांबू फर्निचर प्रशिक्षणासाठी सहायक अनुदान, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणे, मागासवर्गीय युवकांना वेल्डिंग कामासाठी मशीन पुरवणे.       सामूहिक योजना :- मागासवर्गीय वस्तीत व वस्तीवर जाणाऱ्या सौर ऊर्जा प्रकाश योजना, मागासवर्गीयांसाठी अनुदानित वसतीगृहांना सोयी सुविधा पुरविणे (सतरंजी व चादरी पुरविणे), मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरासाठी खुर्ची पुरविणे, मागासवर्गीयांना समाज मंदिरास सतरंगी पुरविणे, व्यायाम शाळांना साहित्य पुरविणे, सामूहिक व्यवसायासाठी मंडपाचे साहित्य पुरविणे.       या योजनांसाठी पुढीलप्रमाणे एकत्रितपणे सर्वसाधारण आवश्यक निकष आहेत-      वैयक्तिक योजना- लाभार्थ्यांचा नमुन्यातील अर्ज (गट विकास अधिकारी यांच्या मार्फत), शासनाचे आवश्यक अभ्यासक्रम प्रमाणपत्र, शाळा

पीक पेरणीची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा

Image
अलिबाग,दि.12 (जिमाका):-  पीक पेरणीची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी उपलब्ध करुन देण्याचा ई-पिक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. म्हसळा तालुक्यामध्ये ई-पिक पहाणी प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांमध्ये गावपातळीवरील कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत गावोगावी बैठक घेऊन जनजागृती करण्यात आलेली आहे. ई-पिक पाहणी मोबाईल अॅपद्वारे होणार असल्यामुळे म्हसळा तालुक्यामध्ये माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालय, आय.टी.आय. विद्यालय येथील विद्यार्थ्यांनाही पीक पाहणीची माहिती व मोबाईल अॅपचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यानुषंगाने शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन म्हसळा तहसिलदार समीर घारे यांनी केले आहे. मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांच्या पिकाची पिक पाहणी प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना ई-पिक पाहणीबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये तसेच ई-पिक पाहणीचे काम प्रभावीपणे होण्यासाठी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय सनियंत्रण समिती गठी

लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध व निमूर्लनाकरिता विविध यंत्रणांची आढावा बैठक संपन्न

  अलिबाग,दि.12 (जिमाका):-  लम्पी या रोगासंदर्भात प्रतिबंध, नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी अधिनियमाखालील अधिकारांतर्गत तात्काळ कार्यवाही करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांना निर्देश दिले होते. त्यानुषंगाने आज (दि.12 सप्टेंबर) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.रत्नाकर काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.रायगड डॉ.शामराव कदम, सर्व तहसिलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जारी केलेल्या मनाई आदेशात लम्पी चर्मरोगावर (एलएसडी) नियंत्रण प

नवीन “आपले सरकार सेवा केंद्र” सुरु करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन

Image
  अलिबाग,दि.12 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील सध्या रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  https://raigad.gov.in  या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी  https://raigad.gov.in  या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.12 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत नोंदणी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे सादर करावेत. आपले सरकार सेवा केंद्राबाबत माहितीसाठी माहिती व तंत्रज्ञान कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई-सेवा केंद्रे, सेतू सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना  “ आपले सरकार सेवा केंद्र ”  हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे ब्रँडिंग करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान एक केंद्र स्थापन करण्यात येईल, मात्र 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या (2011 च्या

लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध व निमूर्लनाकरिता जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले विविध यंत्रणांना निर्देश

Image
  अलिबाग,दि.12 (जिमाका):-  प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगांस प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अंतर्गत अधिसूचना प्राप्त झाली आहे. त्यामध्ये प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 (2009 चा (27) याची कलमे (6) (7) (11) (12) व (13) याद्वारे पूर्ण महाराष्ट्र राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. केंद्र शासनाच्या अधिनियमातील कलम 36 द्वारे राज्य शासनाने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून या रोगासंदर्भात प्रतिबंध, नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी अधिनियमाखालील अधिकारांतर्गत कार्यवाही तात्काळ करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत. लम्पी चर्मरोगावर (एलएसडी) नियंत्रण प्रतिबंध किंवा त्याचे निमूर्लन करता येईल आणि गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्