“स्वच्छ सागर सुरक्षित सागर” “स्वच्छ किनारा सुरक्षित समुद्र” मोहीमेसाठी शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे

 


 

अलिबाग,दि.16(जिमाका):- केंद्र शासनाचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय, इतर मंत्रालये तसेच स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाज यांच्या सहकार्याने भारतीय किनारपट्टीवरील 75 समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची 75 दिवसांची स्वच्छ सागर सुरक्षित सागर स्वच्छ किनारा सुरक्षित समुद्र मोहीम सुरू केली आहे.

       ही मोहीम दि.5 जुलै 2022 रोजी सुरू झालेली असून या मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अलिबाग, वरसोली, किहिम, मांडवा, रेवदंडा, आक्षी, नागाव,  तर मुरुड तालुक्यातील मुरुड, काशीद, आणि श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, मारळ, वेळास, आरावी या समुद्रकिनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. 

               या मोहिमेंतर्गत निवड करण्यात आलेल्या समुद्र किनाऱ्यांवर शनिवार, दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.  त्यानुसार समुद्र किनारी स्वच्छता मोहिमेसाठी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी  यांनी उपस्थित राहावे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक