Posts

Showing posts from August 23, 2020

ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलविण्याचे स्व. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

 अलिबाग,जि.रायगड, दि.29 (जिमाका):- ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी 30 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुढाकारातून उभा राहिलेल्या रमाधाम वृद्धाश्रमाचे नूतनीकरण करताना ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ कायम फुलविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा सर्वांच्या आशीर्वादातून आणि सहकार्यातून प्रयत्न केला आहे, असे भावूक उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे काढले.       खोपोली परिसरातील रमाबाई केशव ठाकरे विश्वस्त संस्थेच्या रमाधाम या वृद्धाश्रमाच्या पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या नव्या सुसज्ज वास्तूचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई,सामना वृत्तपत्राच्या मुख्य संपादिका रश्मी ठाकरे, डॉ. संजय उपाध्ये हे मान्यवर सहभागी झाले होते.           मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मुलांना संघर्ष करायला नको म्हणून प्रत्येक आई-वडील स्वतः काबाडकष्ट करतात. परंतु काळाच्या ओघात मुले त्यांची स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासा

जिल्हा न्यायाधीश कार्यालयातील जुने वाहन खरेदी करु इच्छिणाऱ्यांनी मोहोरबंद किंमतीच्या निविदा सादर कराव्यात

    अलिबाग,जि.रायगड दि.28 (जिमाका) :-   प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांच्या नियंत्रणाखालील जिल्हा न्यायाधीश-एक, रायगड-अलिबाग यांना पुरविण्यात आलेले शासकीय वाहन मारुती बलेनो व्ही.एक्स.आय. क्र.एम.एच.01/पीए/5050 हे दि. 16 मे 2019 रोजी निर्लेखित करण्यात आले आहे.          तरी हे वाहन योग्य ती किंमत देऊन खरेदी करू इच्छिणाऱ्या लोकांकडून मोहोरबंद किंमतीच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत.                हे वाहन जिल्हा न्यायालय, रायगड अलिबाग यांच्या न्यायालयाच्या आवारात पाहण्यासाठी उपलब्ध आहे. कार्यालयीन वेळेत ते इच्छुक लोकांना पाहता येईल. ज्या कोणाला हे वाहन खरेदी करावयाचे असेल, त्यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांच्या नावाने मोहोर बंद किंमतीच्या निविदा दि.28 सप्टेंबर 2020 रोजी, सकाळी 11.00 वाजेपर्यंत प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयात पोहोचतील, अशा बेताने सादर कराव्यात. दि. 28 सप्टेंबर 2020   रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत प्राप्त न झालेल्या निविदा किंवा अपूर्ण असलेल्या निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत.अनामत रक्कम म्हणून रुपये 5 हजार रकमेचा अल

राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक महाड येथे कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा पाठपुरावा*

अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका) :- नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे.  निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी तसेच नुकत्याच घडलेल्या महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व निर्मूलनासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथकाचा कायम स्वरुपी बेस कॅम्प जिल्ह्यात स्थापित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा आपत्ती प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनाचे काम जलदगतीने व्हावे तसेच आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी, म्हणून पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काल (दि.27ऑगस्ट) रोजी राज्य आपत्ती व्यवस्थापन  विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत महाड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथक कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे व संबंधितांना तसे आदेश देण्यात आले आहेत.             तसेच महाड येथे कायमस्वरूपी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजि

रायगडकरांनो चला महाड दुर्घटनाग्रस्तांना मदत करूया, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले रायगडकरांना मदतीचे आवाहन

   अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका)-  जिल्हा प्रशासनाबरोबरच जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, व्यक्ती महाड येथील तारिक गार्डन या इमारतीच्या दुर्घटनेत अतीव नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करू इच्छितात, त्या सर्व कंपन्या, संस्था आणि व्यक्तींनी “जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड” या नावाने सुरु करण्यात आलेल्या बचतखात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा करावी,  सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव आणि मोहरम या महत्त्वाच्या सणांच्या निमित्ताने आपण या दुर्घटनाग्रस्तांना सढळ हाताने मदत करू शकता,आपल्याकडून पुढील पंधरा दिवसात या खात्यात जमा होणारा निधी हा महाड दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठीच वापरला जाईल, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.      जिल्ह्यातील महाड शहरातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत दि.24 ऑगस्ट रोजी  सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली.      या दुर्घटनाग्रस्त इमारतीतील एकूण 41 सदनिकांमध्ये राहत असलेले सर्वच नागरिक बेघर झाले  असून यापैकी 9 जण जखमी तर 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.       या दुर्घटने

बँक ऑफ इंडिया व्दारा ग्राहकांसाठी ‘“डिजिटल अपनाए’” अभियानास सुरुवात

  अलिबाग,जि.रायगड,दि.26(जिमाका):-   करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी बँक ऑफ इंडिया ने ‘डिजिटल अपनाए’ अभियानाची सुरुवात केली आहे. याद्वारे आपल्या ग्राहकांना आपल्या घरातूनच बँकेच्या विविध सेवा उपभोगण्याचे आवाहन बँकेने केले आहे. या अभियानाद्वारे बँक ऑफ इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए.के.दास यांनी आपल्या सर्व 5 हजार 58 शाखांना 100 नवीन डिजिटल ग्राहक शाखेशी जोडण्याचे आवाहन केले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये या योजनेचा शुभारंभ मंगळवार, दि. 25 ऑगस्ट रोजी विभागीय प्रबंधक श्रीमती शंपा बिश्वास यांनी रायगड जिल्ह्यातील बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखांना ग्राहकांना मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, POS, डेबिट कार्ड याबद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना डिजिटल बँकिंग चे महत्व आणि तत्पर सेवा देण्यासंदर्भात सूचित केले आहे. त्याचबरोबर उपस्थित बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डिजिटल बँकिंग सेवा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवावी, यासाठी प्रोत्साहित केले. 000000

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॅट्रिक्स कॅड अकॅडमी च्या वतीने ऑनलाइन मार्गदर्शन (Webinar) सत्राचे आयोजन

  अलिबाग,जि.रायगड,दि.26(जिमाका):-   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड व मॅट्रिक्स कॅड अकॅडमी, खारघर यांच्या वतीने   ऑनलाइन मार्गदर्शन (Webinar) सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींनी या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री.शा. गि. पवार यांनी केले आहे.   हे वेबिनार शुक्रवार, दि. 28 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11:00 ते 12:00 या वेळेत होणार असून या   वेबिनार सत्राचा विषय   Business opportunities in the 3D Printing Industry   हा आहे. वेबिनारचे प्रशिक्षक मेकॅनिकल इंजिनियर बलभीम कामन्ना हे असून ऑनलाइन मार्गदर्शन लिंक  https://meet.google.com/mqg-vsoi-rif   ही आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी लिंक वर क्लिक करावे,  आपल्याकडे Google meet app यापूर्वी install केलेले नसेल तर  install करून घ्यावे, आपण Google meet app मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे, या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे, दिलेल्या लिंक मधून connect झाल्यावर लगेच

जिल्ह्यातील कुशल-अकुशल उमेदवारांसाठी पंडित दीन दयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

  अलिबाग, जि.रायगड, दि.26 (जिमाका) :-   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत जिल्ह्यातील कुशल-अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दि.29 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत सकाळी 10.00   ते सायंकाळी 6.00   या वेळेत फक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.    जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजरआयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील आपली सर्व माहिती अद्ययावत करावी. तसेच ज्यांनी या विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Employment-Job Seeker (Find a Job)-Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी.

जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्याकरिता कुशल-अकुशल मनुष्यबळाची माहिती वेबपोर्टलवर भरावी

  अलिबाग,जि.रायगड,‍ दि.26(जिमाका) :   कोविड-19 मुळे जिल्ह्यातून कुशल-अकुशल कामगारांचे स्थलांतर झालेले आहे.   त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनेमध्ये कुशल-अकुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि.29 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.   त्यासा़ठी या कार्यालयाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल-अकुशल मनुष्यबळाची माहिती या विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in वर दिनांक 27 ऑगस्ट 2020 पर्यंत भरावी. ही माहिती भरताना प्रथम हे वेबपोर्टल सुरु करावे. त्यातील Employment-Employer (List a Job)-Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील PanditDindayal Upadhyay Job Fair   या ऑप्शनमधून दिसणा-या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील जिल्ह्याच्या नावावरील View Details-Job Details-Agree and Post Vacancy-Cho

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 7 मि.मी.पावसाची नोंद

  अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.61 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2 हजार 909.46 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 2.00 मि.मी., पेण-1200 मि.मी., मुरुड-6.00 मि.मी., पनवेल-12.40 मि.मी., उरण-5.00 मि.मी., कर्जत-9.80 मि.मी., खालापूर-7.00 मि.मी., माणगांव-0.00 मि.मी., रोहा-12.10 मि.मी., सुधागड-11.00 मि.मी., तळा-8.00 मि.मी., महाड-6.00 मि.मी., पोलादपूर-4.00 मि.मी., म्हसळा-3.00मि.मी., श्रीवर्धन-5.00 मि.मी., माथेरान-18.40 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 121.70 मि.मी.इतके असून सरासरी 7.61 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण   पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 92.36 मि.मी.इतकी टक्के आहे. 00000

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा*

अलिबाग,जि.रायगड, दि.25 (जिमाका):-  महाड येथील  काजळपुरा भागात असलेली तारिक गार्डन इमारत काल दि.24 ऑगस्ट राेजी सायंकाळी 6 च्या सुमारास कोसळली.          या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घटनास्थळाला भेट देवून दुर्घटनाग्रस्तांचे सांत्वन केले.         श्री.वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून घटनेची संपूर्ण माहिती घेऊन तसेच पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप व नगरपरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती जगताप यांच्यासोबत चर्चा करून या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वारसदारांना मदत व पुनर्वसन  विभागाकडून प्रत्येकी 4 लाख रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले.         याशिवाय या दुर्घटनेत  उध्वस्त झालेल्या कुटुंबांना भरीव आर्थिक मदत मिळण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून ती मदत तातडीने देण्याचे  निश्चित प्रयत्न केले जातील, असेही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

महाड मधील तारिक गार्डन इमारतीतील 41फ्लॅटमधील 97 व्यक्तींपैकी 78 व्यक्ती सुखरूप तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 19 व्यक्तींचा शोध व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरूच*

अलिबाग,जि.रायगड, दि.25 (जिमाका):-  महाड शहरातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत दि. 24 ऑगस्ट रोजी  सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास  कोसळून दुर्घटना घडली.             स्थानिक चौकशीनुसार इमारतीमध्ये एकूण 41 सदनिका, 1 कार्यालय, 1 जिम, 1 मोकळा हॉल होता.       A विंग मध्ये एकूण 21 सदनिका हाेत्या. यामध्ये रहिवास करीत असलेल्या व्यक्तींची संख्या 54 हाेती. सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तींची संख्या 41 असून अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींची संख्या 13 आहे. B विंग मध्ये 20 सदनिका हाेत्या. यामध्ये रहिवास करीत असलेल्या व्यक्तींची संख्या 43 हाेती. या  दुर्घटनेवेळी सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तींची संख्या 37 आहे. अद्यापही इमारतीमध्ये अडकलेल्या व्यक्तींची संख्या 6 अाहे.        अशा प्रकारे तारिक गार्डन  या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील एकूण 41 सदनिकांमध्ये राहत असलेल्या 97 व्यक्तींपैकी 78 व्यक्ती सुखरूप बाहेर पडू शकल्या. अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 19 व्यक्ती अडकलेल्या आहेत.          दूर्घटनास्थळी बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांकडून युद्धपातळीवर

महाड तालुक्यातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मदतकार्य वेगाने करण्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

अलिबाग, जि.रायगड,दि.25 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत पूर्णपणे ढासळून असून मोठी दुर्घटना घडली.         या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी आज पहाटे उपस्थित राहून तेथे सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तसेच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत प्रशासकीय यंत्रणांना वेगाने मदतकार्य करण्याबाबत आवश्यक ते निर्देश दिले.        यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे,जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ व अन्य अधिकारी उपस्थित होते.

तारिक गार्डन इमारतीच्या बिल्डर व इतर दोषींवर गुन्हा दाखल तर दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे* *-पालकमंत्री कु.अादिती तटकरे*

अलिबाग, जि.रायगड, 25 (जिमाका) : महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही 5 मजली इमारत सोमवार,दि.24 ऑगस्ट राेजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या पार्श्वभूमीवर या इमारतीचा बिल्डर तसेच अन्य संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले.      महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत कोसळल्यानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे तातडीने घटनास्थळी पोहोचल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.        यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी  डॉ.भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ हेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले.         या दूर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य 7 जण जखमी झाले आहेत.        दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल  करण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यां

रोहा तांबडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणार- गृहमंत्री अनिल देशमुख

Image
  अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- रोहा तांबडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले.               मौजे तांबडी, तालुका रोहा येथील रणजित म्हांदळेकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे म्हांदळेकर   कुटुंबियांच्या घरी आले असताना बोलत होते.                 यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, पोलीस महानिरीक्षक निकीत कौशिक, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, पोलीस उपअधीक्षक श्री. किरणकुमार सूर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव उपस्थित होते.                 यावेळी पुढे बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, रोहा तांबडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी   घटना आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. हे प्रकरण जलदगती

उज्वला योजना राबवू इच्छिणाऱ्या व राबवित असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

  अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- शासनाने अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र पुरस्कृत उज्वला योजना राज्यात कार्यान्वित करण्यात केली आहे. त्या अनुषंगाने   महिला व बालविकास क्षेत्रात   उज्वला योजना राबवू इच्छिणाऱ्या व राबवित असलेल्या सर्व स्वयंसेवी संस्थांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत.             स्वाधार योजनेकरिता अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :- संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी. संस्थेमध्ये किमान 50 महिलांकरिता सुविधा उपलब्ध असावी.   संस्थेत अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणे या विषयातील किमान 5 वर्षे कामाचा अनुभव असावा. संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असावी. संस्थेचा वार्षिक ताळेबंद किमान 20 लाख रुपये असावा.   संस्थेच्या नावे किमान 15 लक्ष इतकी रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणून असणे आवश्यक आहे. योजना राबविण्याकरिता इच्छुक संस्था त्याच जिल्ह्यातील असावी. संस्थेचे कायमस्वरुपी मुख्यालय किंवा शाखा कार्यालय त्याच जिल्ह्यात असणे आवश्यक आहे.   संस्था नीती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी.   नीती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्यास   संस्थेचे अर्ज ग्

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11 मि.मी.पावसाची नोंद

      अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.46 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण   सरासरी 2 हजार 890.95 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 3.00 मि.मी., पेण-12.00 मि.मी., मुरुड-2.00 मि.मी., पनवेल-11.60 मि.मी., उरण-5.00 मि.मी., कर्जत-10.00 मि.मी., खालापूर-15.00 मि.मी., माणगांव-4.00 मि.मी., रोहा-16.10 मि.मी., सुधागड-20.00 मि.मी., तळा-21.00 मि.मी., महाड-7.00 मि.मी., पोलादपूर-19.00 मि.मी., म्हसळा-10.00मि.मी., श्रीवर्धन-2.00 मि.मी., माथेरान-25.60 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 183.30 मि.मी.इतके असून सरासरी 11.46 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण   पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 89.88 मि.मी.इतकी टक्के आहे. 00000