बँक ऑफ इंडिया व्दारा ग्राहकांसाठी ‘“डिजिटल अपनाए’” अभियानास सुरुवात

 


अलिबाग,जि.रायगड,दि.26(जिमाका):-  करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी बँक ऑफ इंडिया ने ‘डिजिटल अपनाए’ अभियानाची सुरुवात केली आहे. याद्वारे आपल्या ग्राहकांना आपल्या घरातूनच बँकेच्या विविध सेवा उपभोगण्याचे आवाहन बँकेने केले आहे.

या अभियानाद्वारे बँक ऑफ इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए.के.दास यांनी आपल्या सर्व 5 हजार 58 शाखांना 100 नवीन डिजिटल ग्राहक शाखेशी जोडण्याचे आवाहन केले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये या योजनेचा शुभारंभ मंगळवार, दि. 25 ऑगस्ट रोजी विभागीय प्रबंधक श्रीमती शंपा बिश्वास यांनी रायगड जिल्ह्यातील बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखांना ग्राहकांना मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, POS, डेबिट कार्ड याबद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना डिजिटल बँकिंग चे महत्व आणि तत्पर सेवा देण्यासंदर्भात सूचित केले आहे. त्याचबरोबर उपस्थित बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डिजिटल बँकिंग सेवा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवावी, यासाठी प्रोत्साहित केले.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक