Posts

Showing posts from June 4, 2023

जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

  रायगड,दि.9(जिमाका):-  प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात "बिपर जॉय" नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे दि. 9 ते 12 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. तरी दि 9 ते 12 जून या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. तसेच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून तसेच समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी (बिचेसवर) जाणे टाळावे, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात पर्जन्यमान विषयक व वाऱ्याच्या वेगाविषयक खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.     या कालावधीत जिल्ह्यातील पर्जन्यमान स्थिती पुढीलप्रमाणे : - दि.9 जून रोजी जिल्हयातील काही ठिकाणी वादळी वारा ( वाऱ्याचा वेग 30-40 कि.मी. प्रति तास) व विजांच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. दि.10 जून रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारा ( वाऱ्याचा वेग 30-40 कि.मी. प्रति तास) ढग

जिल्ह्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे प्रस्ताव दि.30 जूनपर्यंत सादर करण्याचे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांचे आवाहन

    अलिबाग,दि.09 (जिमाका):-  अल्पसंख्यांक विकास विभागाकडून धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. रायगड जिल्हयातील इच्छुक शाळांनी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता विहीत नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे दि.30 जुन 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, रायगड अलिबाग श्री.जयसिंग मेहेत्रे, यांनी केले आहे. 000000

सहाय्यक व्यवस्थापक व स्वयंपाकी पदासाठी इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

  अलिबाग,दि.9(जिमाका):- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या  जंजिरा सैनिकी विश्रामगृह, गोंधळपाडा-अलिबाग येथे  एकत्रित मासिक मानधनावर कंत्राटी पध्दतीने एक अशासक ी य सहा य्य क व्यवस्थापक हे निवासी पद स्थानिक प रि सरातील माजी सैनिक संवर्गामधून तसेच एक महिला/पुरुष स्वयंपाकी हे पद भरावयाचे आहे. इच्छूक उमेदवारांनी आपला अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे स्वहस्ते कार्यालयीन वेळेत दि. 25 जून 2023 पर्यंत सादर करावा.  या  दोन्ही पदासाठी मा सि क मानधन, कामाचे तास तसेच कामाचे स्वरुप हे उमेदवाराशी मुलाखतीचे दरम्यान सांगण्यात येईल. इतर आवश्यक माहितीक रि ता कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02141-222208 वर संपर्क साधावा ,  असे  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी  कळविले  आहे.  00000000

दि.1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

    अलिबाग,दि.9(जिमाका):-   भारत निवडणूक आयोगाने दि.1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत दि.01 जून 2023 ते दि.16 ऑक्टोबर 2023 पर्यंत पुनरिक्षण पुर्व कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केला आहे. तसेच पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 17 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करावयाची असून दि. 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करावयाची  आहे.  या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे एसएसआर 24 चा कार्यक्रम विहित कालमर्यादेत व अचूकरित्या पूर्ण करावयाचा आहे. त्याकरिता ठरवून दिलेला कार्यक्रम प्रथम टप्प्यात दि.01 जून 2023 ते दि.20 जून 2023 या कालावधीत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकरिता आवश्यक त्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर घरोघरी भेटी देऊन प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया संबधित मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आवश्यक प्रमाणपत्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यामार्फ

शिष्यवृत्ती, फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करावेत

    अलिबाग, दि.9 (जिमाका):- सन 2018-19 पासून महाडीबीटी प्रणालीमार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.  पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विहीत मुदतीत अर्ज भरता न येणे, अर्ज ॲटो रिजेक्ट होणे, एखाद्या वर्षी अर्ज भरता न आल्यास त्यावर्षी गॅप ईयर असे पोर्टलवर नमूद होऊन पुढच्या वर्षीचा अर्ज भरण्यास अडचण येणे अशा बऱ्याच अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.  त्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि.24 मे 2023 च्या शासन निर्णयानुसार सन-2018-19  ते सन 2021-22 या कालावधीतील शिष्यवृत्ती, फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयास दि.15 जून 2023 पर्यंत जमा करावयाचे आहेत.  तरी विद्यार्थ्यांनी वेळेत ऑफलाईन अर्ज महाविद्यालयात जमा करावयाचे असून ते अर्ज महाविद्यालयाने दि.20 जून 2023 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावयाचे आहेत, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी कळविले आह

रेती उपगटाचा जाहीर लिलाव ई-निविदेच्या प्रक्रियेस दि.15 जून पर्यंत प्रथम मुदतवाढ

    अलिबाग,दि.9(जिमाका):-   सन 2023-24 साठी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी-बाणकोट खाडी, (केंबुर्ली ते राजेवाडी), कुंडलिक नदी, रेवदंडा खाडी व सावित्री नदी, बाणकोट खाडी तसेच पातळगंगा नदी, धरमतरखाडी, रेवदंडा खाडी, राजपुरी खाडी व  बाणकोट खाडी या खाडीपत्रामधील ड्रेजरद्वारे उत्खननासाठी राखीव असलेल्या रेती उपगटाचा जाहीर लिलाव ई- निविदेच्या प्रक्रिया दि.29 मे 2023 ते 5 जून 2023 या कालावधीसाठी राबविण्यात आली आहे.  याप्रकरणी दि.05 जून 2023 पर्यंत एकही निविदा प्राप्त झाली नाही. या निविदा प्रक्रियेस दि.07 जून ते दि.15 जून 2023 या कालावधीसाठी प्रथम मुदतवाढ देण्यात येत आहे. या लिलावाच्या प्रक्रियेसंबंधी सर्व माहिती, गटाचा-डेपोचा तपशील आणि गाळ अटी व शर्ती यांची सविस्तर माहिती   https://mahatenders.gov.in , तसेच  www.raigad.gov.in , या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी कळविले आहे. ०००००००

अलिबाग येथे उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन

    अलिबाग,दि.9(जिमाका) :-   राष्ट्रीय महिला आयोग, भारत सरकार नवी दिल्ली पुरस्कृत व भारतीय उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद, प्रकल्प कार्यालय अलिबाग द्वारा गुरुवार, दि. 15 जून 2023 रोजी सकाळी 10 ते  सायंकाळी 5 या वेळेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय अलिबाग येथे महिलांकरिता उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नि:शुल्क स्वरूपाचा असून यामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास,उद्योजकतेचे महत्व, यशस्वी उद्योजकांसोबत चर्चा व यशोगाथा, उद्योजकीय कल्पना, मागणी व पुरवठ्यातील अंतर, नेतृत्व गुण, महिला उद्योजिकांसमोरील आव्हाने, शासकीय कर्ज योजनांची माहिती इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन साधन व्यक्तीद्वारे करण्यात येणार आहे.  उद्योजकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिला उद्योजिका, महिला बचत गटातील सदस्या, व्यवस्थापन क्षेत्रातील महिला, बेरोजगार महिला व युवती यांना स्वयंरोजगार निर्माण करण्याकरिता उपयुक्त आहे.  प्रवेश मर्यादित असून पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही अट नाही. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी शशिकांत दनोरीक

डॉ.एस एस भामरे यांची सहसंचालक पदी नियुक्ती

  अलिबाग,दि.9(जिमाका):-   शासकीय तंत्रनिकेतन पेण या संस्थेचे प्राचार्य डॉ.एस.एस. भामरे यांची तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे सहसंचालक या पदावर दि. 31 मे 2023 रोजी नियुक्ती करण्यात आली. डॉ.एस एस. भामरे हे शासकीय तंत्रनिकेतन पेण या संस्थेत दि. 11 ऑक्टोबर 2018रोजी रुजू झाले होते.  त्याआधी ते लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ येथे कुलसचिव पदी होते.  डॉ.भामरे यांनी त्यांच्या कार्यकाळात शासकीय  तंत्रनिकेतन  पेण या संस्थेत शैक्षणिक व पायाभूत सुविधांमध्ये अमुलाग्र असे बदल घडवून आणले.  एखादा शासकीय अधिकारी समर्पण व सहेतुने जर कार्य करीत असेल तर कोणत्याही संस्थेत कसे बदल घडतात याचे शासकीय तंत्रनिकेतन पेण हे एक उत्तम उदाहरण आहे.              शासकीय तंत्रनिकेतन पेण या संस्थेत शैक्षणिक वातावरण उत्कृष्ट राहील याकडे त्यांनी जातीने लक्ष दिले. त्यांच्या कार्यकाळात संस्थेत शंभर टक्के प्रवेश झालेले आहेत.  तसेच संस्थेचा निकाल सातत्याने उंचावत गेलेला आहे.  या संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध

महिला आर्थिक विकास महामंडळाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न रायगड जिल्ह्याला मिळाला उतेजनार्थ श्रेणीतील पुरस्कार

  अलिबाग,दि.9(जिमाका):-  महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत सन 2022-23 या वर्षाचा राज्यस्तरीय आढावा व पुढील नियोजन कार्यशाळा हॉटेल ग्रेप सिटी, त्रंबकेश्वर, नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती.        या कार्यशाळेत ज्या जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण कामगिरी केली, अशा जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये कोकण विभागातून ठाणे जिल्हा राज्यात लो लोडेड जिल्ह्यामध्ये रायगडाला उतेजनार्थ श्रेणीत पुरस्कार मिळाला.       या बैठकीत राज्यातील सर्व जिल्ह्यांचा विभाग निहाय सन 2022-23 या वर्षातील कामगिरी बाबत आढावा घेण्यात आला. तसेच विविध मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.      या जिल्ह्यांना व्यवस्थापकीय संचालक माविम मुंबई डॉ.इंदूमती जाखड (भा.प्र.से.), महाव्यवस्थापक (प्रकल्प) माविम कुसुम बाळसराफ व महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) रविंद्र सावंत यांच्या हस्ते मोमेंटो व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.        यावेळी कार्यक्रम व्यवस्थापक, माविम, श्री.महेंद्र गमरे, श्रीम.रूपा मेस्त्री, श्रीम. गौरी दोंदे, राखी मिराशी कॅफो तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील माविम मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित

बालकामगार अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता जनजागृती मोहिमेत सहभाग नोंदवावा --कामगार उपायुक्त प्र.ना.पवार

  अलिबाग,दि.9(जिमाका):-  “ बालकामगार ”  ही सामाजिक अनिष्ट प्रथा असून या प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याकरिता समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, याकरिता सातत्याने शासनाच्या विविध विभागांमार्फत व विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.              दि.12 जून 2023 या जागतिक बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून कामगार उपायुक्त पनवेल कार्यालयामार्फत विविध जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.12 जून ते दि.17 जून 2023 या कालावधीत विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.        जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, क्रीडाई-बांधकाम व्यवसायातील मालक असोसिएशन व वीटभट्टी चालक आणि मालक असोसिएशन तसेच सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, नागरिकांनी बालकामगार या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता जनजागृती करून या मोहिमेत सहभाग नोंदवावा व रायगड जिल्हा बालकामगार मुक्त करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन कामगार उपायुक्त पनवेल प्र.ना.पवार यांनी केले आहे. 0000000

समग्र शिक्षाअंतर्गत शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना दिली जाणार पाठ्यपुस्तके ---शिक्षणाधिकारी श्रीमती पुनिता गुरव

    अलिबाग,दि.8(जिमाका):-समग्र शिक्षाअंतर्गत इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी मध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडथळा येवू नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी शासनाने समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक ही योजना सुरु केली आहे.       इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी च्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या 1 लाख 89 हजार 274 विद्यार्थ्यांना 7 लाख 81 हजार 561 पाठ्यपुस्तके (एकात्मिक पुस्तक संच) शासनामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहेत.       जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करु नयेत. ही पाठ्यपुस्तके सर्व पात्र शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करुन दिली जातील, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद श्रीमती पुनिता गुरव यांनी केले आहे. ०००००००००

शिष्यवृत्ती, फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करावेत

    अलिबाग, दि.7(जिमाका):- सन 2018-19 पासून महाडीबीटी प्रणालीमार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.  पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विहीत मुदतीत अर्ज भरता न येणे, अर्ज ॲटो रिजेक्ट होणे, एखाद्या वर्षी अर्ज भरता न आल्यास त्यावर्षी गॅप ईयर असे पोर्टलवर नमूद होऊन पुढच्या वर्षीचा अर्ज भरण्यास अडचण येणे अशा बऱ्याच अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.  त्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि.24 मे 2023 च्या शासन निर्णयानुसार सन-2018-19  ते सन 2021-22 या कालावधीतील शिष्यवृत्ती, फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयास दि.15 जून 2023 पर्यंत जमा करावयाचे आहेत.  तरी विद्यार्थ्यांनी वेळेत ऑफलाईन अर्ज महाविद्यालयात जमा करावयाचे असून ते अर्ज महाविद्यालयाने दि.20 जून 2023 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावयाचे आहेत, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी कळविले आहे

बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन तर्फे 59 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

    अलिबाग, दि.7(जिमाका):-  बँक ऑफ इंडिया ऑफिस असो. मुंबई व गोवा यूनिट यांच्या ५९व्या  स्थापना दिवस मुंबई, गोवा सहित अलिबाग येथेही दिमाखात  साजरा करण्यात आला.                युनिट चे जनरल सेक्रेटरी यांच्या मार्गदर्शनाखाली बीकेसी मुंबई, पणजी - गोवा सोबत रायगड-अलिबाग येथे रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बँक ऑफ इंडिया, रायगड  विभागाचे प्रमुख श्री. मुकेश कुमार, उपप्रमुख श्री. जॉन लोबो व  बँक ऑफ इंडिया ऑफिस असोशियसनचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी श्री. अजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.               जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांच्यामार्फत झालेल्या या शिबिरास बँकेचे अग्रणी जिल्हा प्रबंधक श्री. विजयकुमार कुलकर्णी व अधिकारी संघटनेचे कमिटी मेंबर श्री. कालिदास माने यांची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण रायगड जिल्हयातील बँक अधिकारी, व इतर कर्मचा-यांनी रक्तदान करून समाजासाठी मोलाचे सहकार्य केले. 00000

अलिबाग मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळयाचे यशस्वी आयोजन

    अलिबाग, दि.7:- अखंड हिंदुस्थान आणि स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा अलिबाग शहरामध्ये मंगळवार दि.6 जून 2023 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अणि मंगलमूर्ती वाद्य पथक, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिमाखात संपन्न झाला.       कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिवाजी चौकात मशाली पेटविण्यात आल्या. मंगलमूर्ती वाद्य पथकांनी याप्रसंगी ढोल व ताशा वादन केले तसेच जय हनुमान लाठी काठी पथक, भोनंग यांनी लाठी काठी व मर्दानी खेळांचे प्रदर्शन केले.   छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर अलिबागचा बाल मावळा कैवल्य म्हात्रे यांनी व्याख्यान सादर केले. तर मुंबई विद्यापीठामध्ये सुवर्ण पदक विजेते श्रीराम ठोसर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान दिले. अक्षय म्हात्रे यांचे स्ट्रींग फॅमिली या संगीत संचाने  “ सूर मराठी मातीचा उत्सव शिव स्वराज्याचा ”  हा संगीत व बहारदार गीत कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात शिवाजी महाराजांवर विविध गीत व पोवाडे गायले गेले.  कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अखिल भारतीय वि

रेती उपगटाचा जाहीर लिलाव ई-निविदेच्या प्रक्रियेस दि.15 जून पर्यंत प्रथम मुदतवाढ

अलिबाग,दि.7(जिमाका):-   सन 2023-24 साठी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी-बाणकोट खाडी, (केंबुर्ली ते राजेवाडी), कुंडलिक नदी, रेवदंडा खाडी व सावित्री नदी, बाणकोट खाडी तसेच पातळगंगा नदी, धरमतरखाडी, रेवदंडा खाडी, राजपुरी खाडी व  बाणकोट खाडी या खाडीपत्रामधील ड्रेजरद्वारे उत्खननासाठी राखीव असलेल्या रेती उपगटाचा जाहीर लिलाव ई- निविदेच्या प्रक्रिया दि.29 मे 2023 ते 5 जून 2023 या कालावधीसाठी राबविण्यात आली आहे.  याप्रकरणी दि.05 जून 2023 पर्यंत एकही निविदा प्राप्त झाली नाही. या निविदा प्रक्रियेस दि.07 जून ते दि.15 जून 2023 या कालावधीसाठी प्रथम मुदतवाढ देण्यात येत आहे. या लिलावाच्या प्रक्रियेसंबंधी सर्व माहिती, गटाचा-डेपोचा तपशील आणि गाळ अटी व शर्ती यांची सविस्तर माहिती   https://mahatenders.gov.in , तसेच  www.raigad.gov.in , या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी कळविले आहे. ०००००००

अलिबाग येथे उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन

    अलिबाग,दि.7(जिमाका) :-   राष्ट्रीय महिला आयोग, भारत सरकार नवी दिल्ली पुरस्कृत व भारतीय उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद, प्रकल्प कार्यालय अलिबाग द्वारा गुरुवार, दि. 15 जून 2023 रोजी सकाळी 10 ते  सायंकाळी 5 या वेळेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय अलिबाग येथे महिलांकरिता उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नि:शुल्क स्वरूपाचा असून यामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास,उद्योजकतेचे महत्व, यशस्वी उद्योजकांसोबत चर्चा व यशोगाथा, उद्योजकीय कल्पना, मागणी व पुरवठ्यातील अंतर, नेतृत्व गुण, महिला उद्योजिकांसमोरील आव्हाने, शासकीय कर्ज योजनांची माहिती इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन साधन व्यक्तीद्वारे करण्यात येणार आहे.  उद्योजकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिला उद्योजिका, महिला बचत गटातील सदस्या, व्यवस्थापन क्षेत्रातील महिला, बेरोजगार महिला व युवती यांना स्वयंरोजगार निर्माण करण्याकरिता उपयुक्त आहे.  प्रवेश मर्यादित असून पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही अट नाही. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी शशिकांत दनोरीक

आजचा दिवस सर्वांसाठी मंगलमय --मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
  अलिबाग,दि.7(जिमाका):-  सर्वांना आनंद देणारा हा भूमीपूजन सोहळा असून आजचा दिवस सर्वांसाठी मंगलमय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उरण तालुक्यातील उलवे येथे केले.              उलवे, सेक्टर 12, नोडे उलवे, नवी मुंबई या ठिकाणी एकूण दहा एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमीपूजन मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.               यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, डॉ.श्रीकांत शिंदे, सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रसिद्ध उद्योजक रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. गौतम सिंघानिया, तिरूमला देवस्थानचे अध्यक्ष श्री.वाय.व्ही. सुब्बा रेड्डी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तिरुमला ट्रस्टचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.             भूमीपूजनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर

लाखो शिवभक्तांच्या साक्षीने 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न आम्हाला 50 कोटी रुपयांऐवजी संवर्धनासाठी 50 किल्ले द्या-- छत्रपती संभाजी राजे

  अलिबाग,दि.6(जिमाका):-  याच रायगडावर दि.2 जून रोजी तिथीप्रमाणे आयोजित 350 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी साकारल्या जाणाऱ्या भव्यदिव्य अशा शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. मात्र आम्हाला या 50 कोटी  रुपयांऐवजी संवर्धनासाठी 50 किल्ले द्या, आपण हे किल्ले रायगड मॉडेल करून दाखवू,असे आवाहन छत्रपती युवराज संभाजी राजे यांनी आज किल्ले रायगड येथे केले.                लाखो शिवभक्तांच्या साक्षीने रायगड किल्ल्यावर आज 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.                यावेळी राजसदरेवर युवराज्ञी संयोगिता राजे, युवराज शहाजी महाराज, सर्वश्री आमदार मंगेश चव्हाण, रोहित पवार, अनिकेत तटकरे, माजी मंत्री सतेज बंटी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, स्नेहल जगताप, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.               छत्रपती युवराज संभाजी राजे पुढे म्हणाले की, रायगडावर आले

“शासन आपल्या दारी..!” प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू

               कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकासप्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हे लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळावेत, यासाठी शासनाने  “ शासन आपल्या दारी..! ”  हा एक महत्वाकांक्षी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्दी करण्यात येत असून काय आहेत शासकीय योजना.. जाणून घेवू या लेखातून...              केंद्रीय महिला बाल विकास विभागाच्या दि. 14 जुलै 2022 च्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांचे दि. 19 मे 2023 च्या पत्रानुसार प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नव्या अटींसह लागू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे उद्दिष्ट गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या अवस्थेमुळे मिळणारी मजुरी कमी होण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची आंशिकरि

जिल्ह्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे प्रस्ताव दि.30 जूनपर्यंत सादर करण्याचे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांचे आवाहन

    अलिबाग, दि.06 (जिमाका):-  अल्पसंख्यांक विकास विभागाकडून धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. रायगड जिल्हयातील इच्छुक शाळांनी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता विहीत नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे दि.30 जुन 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, रायगड अलिबाग श्री.जयसिंग मेहेत्रे, यांनी केले आहे. 000000

सहाय्यक व्यवस्थापक व स्वयंपाकी पदासाठी इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

    अलिबाग,दि.6(जिमाका):- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या  जंजिरा सैनिकी विश्रामगृह, गोंधळपाडा-अलिबाग येथे  एकत्रित मासिक मानधनावर कंत्राटी पध्दतीने एक अशासक ी य सहा य्य क व्यवस्थापक हे निवासी पद स्थानिक प रि सरातील माजी सैनिक संवर्गामधून तसेच एक महिला/पुरुष स्वयंपाकी हे पद भरावयाचे आहे. इच्छूक उमेदवारांनी आपला अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे स्वहस्ते कार्यालयीन वेळेत दि. 25 जून 2023 पर्यंत सादर करावा.  या  दोन्ही पदासाठी मा सि क मानधन, कामाचे तास तसेच कामाचे स्वरुप हे उमेदवाराशी मुलाखतीचे दरम्यान सांगण्यात येईल. इतर आवश्यक माहितीक रि ता कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02141-222208 वर संपर्क साधावा ,  असे  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी  कळविले  आहे.  00000000

दि.1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

    अलिबाग,दि.6(जिमाका):-   भारत निवडणूक आयोगाने दि.1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत दि.01 जून 2023 ते दि.16 ऑक्टोबर 2023 पर्यंत पुनरिक्षण पुर्व कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केला आहे. तसेच पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 17 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करावयाची असून दि. 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करावयाची  आहे.  या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे एसएसआर 24 चा कार्यक्रम विहित कालमर्यादेत व अचूकरित्या पूर्ण करावयाचा आहे. त्याकरिता ठरवून दिलेला कार्यक्रम प्रथम टप्प्यात दि.01 जून 2023 ते दि.20 जून 2023 या कालावधीत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकरिता आवश्यक त्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर घरोघरी भेटी देऊन प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया संबधित मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आवश्यक प्रमाणपत्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यामार्फ