रेती उपगटाचा जाहीर लिलाव ई-निविदेच्या प्रक्रियेस दि.15 जून पर्यंत प्रथम मुदतवाढ


अलिबाग,दि.7(जिमाका):- सन 2023-24 साठी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी-बाणकोट खाडी, (केंबुर्ली ते राजेवाडी), कुंडलिक नदी, रेवदंडा खाडी व सावित्री नदी, बाणकोट खाडी तसेच पातळगंगा नदी, धरमतरखाडी, रेवदंडा खाडी, राजपुरी खाडी व  बाणकोट खाडी या खाडीपत्रामधील ड्रेजरद्वारे उत्खननासाठी राखीव असलेल्या रेती उपगटाचा जाहीर लिलाव ई- निविदेच्या प्रक्रिया दि.29 मे 2023 ते 5 जून 2023 या कालावधीसाठी राबविण्यात आली आहे.  याप्रकरणी दि.05 जून 2023 पर्यंत एकही निविदा प्राप्त झाली नाही.

या निविदा प्रक्रियेस दि.07 जून ते दि.15 जून 2023 या कालावधीसाठी प्रथम मुदतवाढ देण्यात येत आहे. या लिलावाच्या प्रक्रियेसंबंधी सर्व माहिती, गटाचा-डेपोचा तपशील आणि गाळ अटी व शर्ती यांची सविस्तर माहिती  https://mahatenders.gov.in, तसेच www.raigad.gov.in, या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक