Posts

Showing posts from February 27, 2022

औद्योगिक आवेदनपत्रधारक घटकांनी डेटा अपडेट करावा - महाव्यवस्थापक श्री.हरळय्या

  अलिबाग,दि.04 (जिमाका):- उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने दि.25 मार्च 2021 पासून आय.ई.एम अर्ज भरण्यासाठी एक सुधारित “ जी2बी ” पोर्टल ( http://services.dipp.gov.in/ims ) सुरू केले आहे. एका आय.ई.एम कंपनी व्यवसाय घटकाच्या नावाने त्याच्या युनिटच्या स्थानाचा विचार न करता केवळ एकच आय.ई.एम जारी केला जात आहे. याकरिता अर्जदाराने पोर्टलवर लॉग-इन करून त्यांच्या आय.ई.एम संदर्भात डेटा   अपडेट किंवा पुनर्प्रमाणित करण्यासाठी दि.15 जुलै 2021 पासून “ जी2बी ” पोर्टलमध्ये एक वेगळी विंडो प्रदान करण्यात आली आहे. अर्जदारांना ऑनलाइन प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी वापरकर्ता मॅन्युअल आणि व्हिडिओ ट्यूटोरियल “ जी2बी ” पोर्टलवर उपलब्ध करून दिले आहेत. तरी संबंधित आय.ई.एम (औद्योगिक आवेदनपत्र धारक) घटकांमध्ये कोणताही बदल नसला तरीही सर्व आय.ई.एम धारकांना नव्याने उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर पुन:श्च अर्ज सादर करणे आवश्यक आहे. याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सर्व अर्जदारांना आवश्यक तेथे आधारभूत कागदपत्रे जोडावी लागणार असून अशा सर्व अर्जांची पुन्हा पडताळणी करताना अर्जदारांना एक क्यू-आर

वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन दि.06 मार्च रोजी

    अलिबाग,दि.04 (जिमाका):- रायगड-अलिबाग वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ रविवार, दि.06 मार्च 2022 रोजी न्याय सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय, रायगड-अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई तथा प्रमुख आश्रयदाते, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई श्री.दिपांकर दत्ता हे लाभणार आहेत तर न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई तथा कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई श्री.ए.ए. सय्यद यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती, रायगड-अलिबाग श्री.गिरीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडणार असून अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग असणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी नागरिकांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी तसेच अध्यक्ष, वकील संघटना, अलिब

सन 2020-21 साठी पुन:अर्ज करण्यासाठी व सन 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी महाडिबीटी पोर्टलवर नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

    अलिबाग,दि.04 (जिमाका):- सन 2021-22 करिता महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करण्याकरिता शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दि.07 मार्च 2022 पर्यंत व इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी दि.31 मार्च 2022 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नाहीत, त्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज दि.31 मार्च 2022 पर्यंत https://mahadbtmai.ait.gov.in या संकेतस्थळावर भरावेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन ऑनलाईन प्रणालीतून लवकरात लवकर सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत. शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नूतनीकरण करण्याबाबत काही समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, रायगड येथे संपर्क साधावा, असे आवाहनही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. 00000

जागतिक महिला दिनानिमित्त अलिबाग येथे “स्त्रिया आणि लोकशाही – लोकशाही गप्पा (भाग 5)” या परिसंवादाचे आयोजन

Image
    अलिबाग,दि.04 (जिमाका):- मा.भारत निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार दि.08 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त “ राज्यस्तरीय ” कार्यक्रमाचे सकाळी 10.00 वाजता येथील पी.एन.पी नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने “ स्त्रिया आणि लोकशाही – लोकशाही गप्पा (भाग 5) ” या परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी, वैशाली पाटील, मुमताज शेख, प्रयोगशील शिक्षक सुजाता पाटील, प्राध्यापक डॉ.श्याम पाखरे, पत्रकार जयंत धुळप, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत सोनवणे हे सहभागी होणार असून संवादक म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.दीपक पवार हे जबाबदारी सांभाळणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य श्री.श्रीकांत देशपांडे असून सहआयोजक जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि जे.एस.एम. महाविद्यालय अलिबा

जिल्ह्यात “रायगड बाईकर्स फेस्टिव्हल 2022” चे यशस्वी आयोजन

Image
    अलिबाग,दि.03 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच स्थानिक युवक युवतींना रस्ता सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यासाठी गेली 6 वर्षे रायगड बाईकर्स फेस्टिव्हलचे आयोजन केले जात आहे. यावर्षी दि.26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाईकर्स फेस्टिव्हलच्या उद्घाटनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा वाहतूक शाखा-रायगड पोलीस तसेच रायगड बाईकर्स फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने “ रस्ता सुरक्षा जनजागृती बाईक रॅली ” चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक श्री.अश्वनाथ खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे (भा.पो.से.) यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात असून सुरक्षित प्रवासासंबंधी जनजागृती करण्यासाठी रायगड पोलीस महत्वपूर्ण कार्य करीत असल्याचे जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक श्री.अश्वनाथ खेडेकर यांनी रॅलीप्रसंगी सांगितल

रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पांतर्गत संलग्न रस्ते व सागरी पूल विकास प्रक्रियेला वेग

    अलिबाग,दि.03 (जिमाका):- राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व कोकणचे सुपुत्र कै.बॅ.ए.आर. अंतुले साहेबांनी कोकणच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंत सागरी महामार्ग विकसित करण्याचा संकल्प केला होता. तद्नंतर बहुप्रतिक्षीत असलेल्या या सागरी महामार्गाची उभारणी करण्याचा मनोदय राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या समर्थ नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या   महाविकास आघाडी सरकारने केला.   तसेच कोकण पर्यटन विकासासह सर्वांगिण विकासासाठी महत्त्वाची भूमिका असलेल्या या सागरी महामार्ग प्रकल्पास विशेष महत्त्व दिले आहे. बहुप्रतिक्षीत सागरी महामार्ग कालबद्ध कालावधीत पूर्णत्वास यावा यासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयामध्ये गठीत केलेल्या प्रोजेक्ट मॉनिटरींग युनिटमध्ये या प्रकल्पाच्या समावेशासाठी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांना आग्रहाची विनंती केली. या युनिटच्या बैठकांमध्ये या प्रकल्पाचा नियमित प्रगती आढावा घेवून प्रकल्पासाठी शासन स्तरावरील रितसर मान्यता मिळण्यास गती मिळत आहे.

जिल्ह्यातील 31 हजार 873 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा, तर दहावीची परीक्षा देणार 33 हजार 500 विद्यार्थी

    अलिबाग,दि.03 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वीच्या (उच्च माध्यमिक) परीक्षा शुक्रवार, दि.4 मार्च 2022 पासून जिल्ह्यातील 190 परीक्षा केंद्रावर तर 10 वीच्या परीक्षा मंगळवार, दि.15 मार्च 2022 पासून सुरु होत असून यावेळी कॉपी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 8 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षा निर्भय आणि मोकळ्या वातावरणात होण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे. या परिक्षेला 12 वीचे एकूण 31 हजार 873 विद्यार्थी आणि 10 वीचे 33 हजार 500 विद्यार्थी बसले असल्याची माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:- इयत्ता (12वी)- शुक्रवार, दि.4 मार्च ते बुधवार, दि.7 एप्रिल 2022, इयत्ता (10 वी)- मंगळवार, दि.15 मार्च   ते गुरुवार दि.4 एप्रिल 2022. कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे केंद्र असणार आहे. याचा मुख्यत्वे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. जिल्ह्यात 16 परिरक्षण

“माझी वसुंधरा” अभियानांतर्गत किहीम समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम संपन्न

Image
      अलिबाग,दि.03 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली व अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे आणि अलिबाग तहसिलदार श्रीम. मीनल दळवी यांच्या पुढाकारातून दि.27 फेब्रुवारी 2022 रोजी “ माझी वसुंधरा अभियान ” अंतर्गत अलिबाग तालुक्यातील मौजे किहीम येथील समुद्र किनारा स्वच्छता मोहीम संपन्न झाली. या मोहिमेत किहीम गावातील प्रतिष्ठीत नागरीक, ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ.राजाराम हुलवान व सदस्य, अलिबाग रोटरी क्लबचे सदस्य सहभागी झाले होते. विशेष म्हणजे किहीम समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या स्वच्छता मोहिमेत आपले योगदान दिले असून ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी किहीमचे मंडळ अधिकारी श्री.पाटील यांच्यासह तलाठी श्री.शिंगाडे, श्री.इग्रुळकर, श्री.हांगे, श्री.घुमरे तसेच कोतवाल, पोलीस पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. 00000

पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम 7 मार्च पासून श्रीवर्धन येथे होणार सुरू

  अलिबाग, दि.03 (जिमाका):- पर्यटन क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई यांच्यावतीने दि.7 ते 11 मार्च 2022 या कालावधीमध्ये श्रीवर्धन येथील माळी समाज मंदिर हॉल, दबक पहाडी रोड, आर.एन. राऊत हायस्कूल जवळ या ठिकाणी पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे विविध स्थानिक युवकांना पर्यटना विषयक रोजगाराची माहिती मिळून व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती उपसंचालक (पर्यटन) कोकण विभाग, नवी मुंबई श्री.हनुमंत हेडे यांनी दिली आहे. पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत (आय.आय.टी.टी.एम) तसेच पर्यटन संचालनालयातील तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणासाठी स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी 30 प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल त्याचप्रमाणे त्यांना ओळखपत्रही देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचा

“पिंक रन मॅरेथॉन” विजेत्या ऋतुजाचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले अभिनंदन

Image
  अलिबाग, दि.03 (जिमाका):- “ लडकी हॅूं..लड सकती हॅूं..! ” या मोहिमेवर आधारित मुंबई येथे झालेल्या पिंक मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम आलेल्या ऋतुजा सकपाळ (वय-21) हिचे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी अभिनंदन केले. मुंबई येथे रविवार दि.27 फेब्रुवारी रोजी मरीन ड्राईव्ह येथून सुरू झालेल्या “ पिंक रन ” या 5 किमी अंतराच्या महिला विशेष मॅरेथॉन स्पर्धेत तालुका पेण येथील धावपटू ऋतुजा सकपाळ हिने अव्वल येत ही स्पर्धा अवघ्या 19.03 मिनिटात पूर्ण केली. तिच्या या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना 'ऋतुजा तू लढून दाखवलंस, एक महिला म्हणून तुझा अभिमान वाटतो' या शब्दांत क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी अभिनंदन केले आहे. 00000

“न्याय सर्वांसाठी” या ब्रीदवाक्यासह जिल्हा विधी प्राधिकरण आहे आपल्यासाठी..!

अलिबाग, दि.02 (जिमाका):- न्यायसंस्थेतील जिल्हा विधी प्राधिकरण हा घटक प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे. या जिल्हा विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून कोणत्याही गरजू नागरिकाकडे पैसे नाहीत म्हणून तो नागरिक न्यायापासून वंचित राहू नये, त्याला न्यायप्रक्रिया करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने शासकीय खर्चाद्वारे मोफत वकील उपलब्ध करून दिला जातो. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने पीडित महिला व 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मोफत विधी सहाय्य उपलब्ध होते. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व जमातीचे सदस्य ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा अधिक नाही अशा व्यक्तींना हे सहाय्य मिळते. त्याचप्रमाणे औद्योगिक कामगार तुरुंगातील व्यक्ती, विपत्ती, वांशिक हिंसाचार, जातीय हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ आदी आपत्तींना बळी पडलेल्या व्यक्ती, विकलांग व्यक्ती आदींना मोफत विधी सहाय्य मिळू शकते. या सहाय्यांतर्गत विनामूल्य कायदेशीर सल्ला, कायदेशीर प्रक्रियेत वकिलाद्वारे प्रतिनिधीत्व, खटल्यासाठी मसूदा तयार करणे व त्याकरिता येणारा खर्च मिळणे, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात अपील किंवा जामीन अर्ज करण्यास

सन 2022-23 मध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम सुरू

अलिबाग,दि.02 (जिमाका):- बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी “ शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम ” हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम दि.01 ते 20 मार्च 2022 या कालावधीत व्यापक स्वरूपामध्ये राबविण्यात येत आहे. आपल्या परिसरातील अशा शाळाबाह्य बालकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील 02141-227452 व 8275152363 या संपर्क क्रमांकांवर द्यावी किंवा नजीकच्या तहसील कार्यालयास / पोलीस ठाण्यास कळवावी तसेच नागरिकांनी या शोध मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व शिक्षणाधिकारी ज्योती शिंदे-पवार यांनी केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार 2009 राज्यात दि.01 एप्रिल 2010 रोजी लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. शाळेत कधीही दाखल न झालेली तसेच शाळेत न जाणारी बालके, ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा ज्या बालकांनी प्रवेश घेवून प्रा

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून खालापूर तालुक्यात वावोशी मंडळात “आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण” शिबिराचे आयोजन

             अलिबाग,दि.02 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियानांतर्गत कर्जत उपविभागीय अधिकारी श्री.अजित नैराळे, खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, यांच्या पुढाकारातून वावोशी मंडळातील ग्रुप ग्रामपंचायत नारंगी येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात शिबिरार्थींना प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन आदी विषयांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या शिबिरास मंडळ अधिकारी वावोशी, तलाठी सजा नारंगी, सरपंच, उपसरपंच व ग्राम विकास अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत नारंगी स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. हे शिबीर तहसील कार्यालय खालापूर व उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रुप ग्रामपंचायत नारंगी यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले. 00000

महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत पनवेलमध्ये रायगड जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन

  अलिबाग,दि.02 (जिमाका):- महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) रायगड व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन दि.0 4 ते 06 मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वेळेत गुजराती शाळा , डॉ . आंबेडकर रोड , जुने पनवेल येथे करण्यात आले आहे . तांदूळ , कडधान्य व भाजीपाला विक्री दालने , सेंद्रीय शेतकरी गटांची शेतमाल विक्री , महिला बचत गट उत्पादने - मसाला , पापड , लोणची इ . प्रदर्शन व विक्री तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञान परिसंवाद व चर्चा सत्र , शेतकरी उत्पादक ग्राहक परिसंवाद त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजनांचा प्रसार ही या प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत . या महोत्सवात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून खरीप हंगामात विविध योजनेंतर्गत भात पीक प्रात्यक्षिकामधून उत्पादित झालेले लाल , काळा , जांभळा भात तसेच इतर सुवासिक - इंद्रायणी , बारीक जातीच्या - वाडा कोलम , शुभांगी वाय एस आर इ . तांदळाची थेट शेतकऱ्यां

माणगाव विभागीय क्रीडा संकुल येथे 100 युवा क्षमतेचे "युवा वसतिगृह" स्थापण्यास शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान

अलिबाग,दि.1(जिमाका):-  राज्याचे युवा धोरण 2012 मध्ये युवा वसतिगृह स्थापन करणे, ही एक महत्त्वाची बाब अंतर्भूत आहे. संबंधित युवा वसतिगृह प्राधान्याने विभागीय क्रीडा संकुलाच्या ठिकाणीच जागा उपलब्धतेनुसार विकसित करण्यात यावे, असे शासनाचे निर्देश आहेत.  या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यासह कोंकण विभागातील युवकांना भावी आयुष्याच्या जडणघडणीसाठी परीक्षा, प्रशिक्षण, मुलाखती, शिबिरे, चर्चासत्रे या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतावाढीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी हक्काचे निवासस्थान माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुलातच स्थापण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. कोकण विभागीय क्रीडा संकुल रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील मौजे नाणोरे येथे उभारण्यासंदर्भात शासनाकडून अलिकडेच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी पुरेशी, पोषक व सर्वच दृष्टीने अनुकूल जागा उपलब्ध असल्याने येथे युवा वसतिगृह उभारावे, अशी आग्रहाची विनंती पालकमंत्री कु.तटकरे यांनी शासनाला केली. ही विनंती

वरसोली-अलिबाग येथे पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रमाचे रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Image
  अलिबाग,दि.28 (जिमाका):- पर्यटन क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई यांच्यावतीने दि.28 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 या कालावधीत 5 दिवसाच्या प्रशिक्षण शिबिराचे अलिबाग येथील मराठी शाळा, ग्रामपंचायत कार्यालय वरसोली येथे आयोजन करण्यात आले आहे. या पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन श्री.रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी वरसोली ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती प्रमिला भाटकर, पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक श्री.हनुमंत हेडे, आय.आय.टी.टी.एम, ग्वाल्हेर चे डॉ.रमेश देव्रथ, दि स्काय हॉटेलचे संचालक श्री.अभिजीत कवळे आणि ग्रामपंचायत वरसोलीचे सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी श्री.रघुजीराजे आंग्रे म्हणाले की, पर्यटन म्हणजे फक्त समुद्र, मच्छी थाळी आणि घोडागाडी सफर नव्हे, तर त्या भागातील संस्कृती, इतिहास, लोकजीवन आणि निसर्गसंपदा यांची ओळख असते. ईश्वराने आपल्या कोकणावर निसर्ग, प्राणी, पक्षी यांची विपुल प्रमाणात उधळण केली आहे. त्याचबरोबर अर्वाचीन आणि