सन 2020-21 साठी पुन:अर्ज करण्यासाठी व सन 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी महाडिबीटी पोर्टलवर नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

  

अलिबाग,दि.04 (जिमाका):- सन 2021-22 करिता महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करण्याकरिता शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दि.07 मार्च 2022 पर्यंत व इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी दि.31 मार्च 2022 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नाहीत, त्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज दि.31 मार्च 2022 पर्यंत https://mahadbtmai.ait.gov.in या संकेतस्थळावर भरावेत.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन ऑनलाईन प्रणालीतून लवकरात लवकर सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत. शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नूतनीकरण करण्याबाबत काही समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, रायगड येथे संपर्क साधावा, असे आवाहनही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक