Posts

Showing posts from November 22, 2020

पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा

    अलिबाग,जि.रायगड दि.27(जिमाका) :-   राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे.. शुक्रवार दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 4.00 वा. मुंबई येथून शासकीय वाहनाने देवन्हावे ता. खालापूरकडे प्रयाण. सायं. 5:30 वा. देवन्हावे ता. खालापूर येथे आगमन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती. स्थळ : नोवाटेल इमॅजिका हॉटेल,खोपोली पाली रोड, ता.खालापूर.   कार्यक्रमानंतर सोयीनुसार देवन्हावे ता.खालापूर येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण व सुतारवाडी ता. रोहा निवासस्थानी आगमन व राखीव.   शनिवार दि. 28 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 8.00 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने ता.रोहाकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. रोहा येथे आगमन व गणेश मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : दमखाडी ता. रोहा, सकाळी 9:30 वा. रोहा येथून शासकीय वाहनाने महाडकडे प्रयाण. सकाळी 11:30 वा. ज्येष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर भुस्कुटे या

दि.01 ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीत संयुक्त सक्रीय क्षयरोग शोध मोहीम व कुष्ठरोग शोध अभियान

  अलिबाग,जि.रायगड दि. 27 (जिमाका) :-   रायगड जिल्ह्यात दि.01 ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये संयुक्त सक्रीय क्षयरोग शोध मोहीम अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवक घरोघरी भेटी देऊन घरातील व्यक्तीची तपासणी करणार आहेत. कुष्ठरोगाची लक्षणे : शरीरावर फिकट/लालसर बधीर चट्टा/चट्टे, मज्जातंतू जाड/दुखऱ्या होऊन हातापायास बधिरता येणे,चकाकणारी, तेलकट व सुजलेली त्वचा, कानाच्या पाळया जाड होने,भुवयाचे केस विरळ होणे. क्षयरोग लक्षणे : दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवडयाहून अधिक कालावधीचा ताप, वजनात घट, भूक लागणे, मानेवर गाठी येणे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. तसेच तपासणीसाठी येणाऱ्या आशा (स्त्री) व स्वयंसेवक (पुरुष) यांना सहकार्य करावे, असे आवाहन मा.जिल्हाधिकारी रायगड, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) रायगड व जिल्हा क्षयरोग अधिकारी रायगड यांनी केले आहे. ००००००

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदार यादीचे प्रभाग निहाय कार्यक्रम प्रसिध्द

  अलिबाग,जि.रायगड दि. 27 (जिमाका) :-   मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी माहे एप्रिल ते जून 2020 या कालायधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या व माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी दि. 25सप्टेंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली महाराष्ट्र विधान सभेची मतदार यादी वापरण्याचे निदेश दिले आहेत. तसेच मतदार यादीचे प्रभाग निहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. अलिबाग तालुक्यातील सासवणे, मान तर्फे झिराड, पेझारी व वाघोडे या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी प्रभाग निहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक, शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर 2020, प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक, मंगळवार दि.01 डिसेंबर 2020, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी मंगळवार दि. 01 डिसेंबर ते सोमवार दि.07 डिसेंबर 2020, प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिष्द करणे, गुरुवार दि.10 डिसेंबर 2020. 0000

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

Image
  अलिबाग,जि.रायगड, दि.27, (जिमाका):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग व जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समितीच्या वतीने दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता भारतीय राज्यघटना प्रास्ताविक वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग व अलिबाग वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी 2 वाजता "भारतीय राज्यघटनेची मूल्ये व तत्व" या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या विषयावर रायगड जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समितीच्यावतीने सुध्दा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.             या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संदीप स्वामी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक श्री आर.आर.पाटील, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांनी संविधान दिनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले तर अॅड. चौऊलकर यांनी भारतीय राज्यघटनेची मूल्ये व तत्वे याविषयी मार्गदर्शन केले.                    कार्यक्रमाचे

कोकण विभागातील घरकुलांच्या कामांचे दिलेले उद्दिष्ट विहीत कालावधीत पूर्ण करावे-विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ

Image
           अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका) :-   सर्वांसाठी घरे-2022 हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केला आहे. त्या अनुषंगाने कोकण विभागातील जिल्ह्यांना घरकुलांच्या कामांचे दिलेले उद्दिष्टय विहित कालावधीत पूर्ण करावेत, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आज येथे दिले.        “ महा आवास अभियान-ग्रामीण ”   अंतर्गत आयोजित व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे   आयोजित विभागस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.               यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) सर्जेराव म्हस्के पाटील तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आदिवासी विभाग पेण, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन उपस्थित होते.                विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ पुढे म्हणाले की, सर्वांसाठी घरे-2022 हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केला आहे. या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आ

नवोदय विद्यालय नववी साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

  अलिबाग,जि.रायगड दि. 25 (जिमाका):-   भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाद्वारे संचलित माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय वर्ष 2021-22 साठी इयत्ता नववी मध्ये प्रवेश परीक्षे साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 असून www.navodaya.gov.in किंवा www.nvsadmissionclassnine.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.                यावर्षी इयत्ता आठवीत शिकत असलेले आणि दि.01 मे 2005 ते 30 एप्रिल 2009 (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान जन्मतारीख असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. परीक्षा दि.13 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9:30 वा. जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर येथे होईल.                 रायगड जिल्ह्यातील आठवी मध्ये शिकत असलेल्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी नवोदय स्टाफ संतोष चिंचकर मो.9881351601, कैलास वाघ मो.9527256185 यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राध्यापक प्राचार्य एस.व्ही.बोभाटे यांनी केले आहे. 000000

चारचाकी वाहनांसाठी MH06CD ही नवीन मालिका येत्या 3 डिसेंबर पासून होणार सुरु

  अलिबाग,जि.रायगड दि. 25 (जिमाका):-   उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयाची चारचाकी वाहनांसाठी MH06CD ही नवीन मालिका दि.03 डिसेंबर 2020 पासून सुरु होणार आहे. ज्या वाहनधारकांना आकर्षक क्रमांक आगाऊ आरक्षित करावयाचा आहे, त्यांनी त्या वाहन क्रमांकासाठी असलेल्या विहित शुल्काच्या रकमेचा धनाकर्ष दि.03 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत कार्यालयात वरिष्ठ लिपीक (खाजगी वाहन विभाग) यांचेकडे सादर करावा.             धनाकर्ष विशेषतः राष्ट्रीयकृत बँकेचा असावा, धनाकर्ष DY. RTO, PEN यांच्या नावाचा असावा, एखाद्या आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जदारांची यादी त्याच दिवशी सायंकाळी 05.00 वा. कार्यालयाच्या सूचना फलकावर लावली जाईल. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या क्रमांकासाठी जादा शुल्काचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाफ्यात दि.04 डिसेंबर 2020 रोजी वरिष्ठ लिपिक (खाजगी वाहन विभाग) यांच्याकडे सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सादर करावा. एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या क्रमांकाचा लिलाव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,

नवोदय विद्यालय इयत्ता 6वी साठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा प्रक्रिया सुरु

                अलिबाग,जि.रायगड दि. 25 (जिमाका):-   भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे संचलित माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय वर्ष 2021-22 साठी इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख दि. 15 डिसेंबर 2020 अशी असून https://navodaya.gov.in/nvs/en/Home१ किंवा https://cbseitms.in/nvsregn/index.aspx या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत.               इयत्ता पाचवीत शिकत असलेले आणि दि.1 मे 2008 ते दि.30 एप्रिल 2012 (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान जन्मतारीख असलेले विद्यार्थी यासाठी अर्ज भरण्यास पात्र आहेत.   परीक्षा दि.10 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ठरलेल्या केंद्रावर होईल.             तरी जिल्ह्यातील पाचवी मध्ये शिकत असलेल्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी नवोदय स्टाफ संतोष चिंचकर मो.9881351601, कैलास वाघ मो.9527256185, राकेश कुमार मीणा मो.9146156642, लक्ष्मण तिगोटे मो.9421169088 यांच्याशी संपर्क साधावा,

1 जानेवारी 2021 च्या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

  अलिबाग, जि.रायगड,दि.23 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी, 2021 या अर्हता दिनांकावर आधारित   मतदारयादीचा पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.  दि.17 नोव्हेंबर, 2020 ते 15 डिसेंबर, 2020-हरकती व दावे स्विकारले जातील. मतदारयादीत नाव समाविष्ट होण्यासाठी त्यांनी फॉर्म नं.06 भरुन देणे आवश्यक आहे. मयत व स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यासाठी फॉर्म नं.07 तसेच मतदारयादीत वय, लिंग, नाव यामध्ये दुरुस्ती असेल तर फॉर्म नं.08 भरुन दयावयाचा आहे. या नाव नोंदणीत ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी www.nvsp.in या पोर्टलचा वापर करता येईल. अंतिम मतदारयादी दि.15 जानेवारी 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. मतदारयादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे अथवा नोंदी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन अलिबाग तहसिलदार तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी सचिन शेजाळ यांनी केले आहे. 00000  

एप्रिल ते जून 2020 कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक व मतदारयादीचा कार्यक्रम रद्द जिल्ह्यात रोहा तालुक्यातील फक्त एका ग्रामपंचायतीचा समावेश

            अलिबाग,जि.रायगड,दि.23 (जिमाका):- माहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच काही नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राबविण्यात आलेला मतदारयादीचा कार्यक्रम व निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला असून या ग्रामपंचायतींची मतदारयादी व निवडणूक कार्यक्रम नव्‍याने जाहीर करण्याचा  कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.          राज्य निवडणूक आयोगाच्या   आदेशान्वये   दि.31 मार्च   2020   रोजी जिल्‍ह्यात एप्रिल   ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम दि.17 मार्च   2020   रोजी करोना महामारीमुळे आहे त्‍या टप्‍यावर पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्‍यात येवून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरण्‍यात आलेली मतदारयादी व चालू निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.        यानुसार एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतीमध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी त.अष्टमी या ग्रामपंचायतीसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाट