नवोदय विद्यालय इयत्ता 6वी साठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा प्रक्रिया सुरु

 


 

            अलिबाग,जि.रायगड दि. 25 (जिमाका):-  भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे संचलित माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय वर्ष 2021-22 साठी इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख दि. 15 डिसेंबर 2020 अशी असून https://navodaya.gov.in/nvs/en/Home१ किंवा https://cbseitms.in/nvsregn/index.aspx या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत.

             इयत्ता पाचवीत शिकत असलेले आणि दि.1 मे 2008 ते दि.30 एप्रिल 2012 (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान जन्मतारीख असलेले विद्यार्थी यासाठी अर्ज भरण्यास पात्र आहेत.  परीक्षा दि.10 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ठरलेल्या केंद्रावर होईल.

            तरी जिल्ह्यातील पाचवी मध्ये शिकत असलेल्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी नवोदय स्टाफ संतोष चिंचकर मो.9881351601, कैलास वाघ मो.9527256185, राकेश कुमार मीणा मो.9146156642, लक्ष्मण तिगोटे मो.9421169088 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी प्राध्यापक प्राचार्य एस.व्ही. बोभाटे यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक