Posts

Showing posts from September 10, 2017

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 6मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,(जिमाका)दि.16:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.19 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3185. 39 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 04.00 मि.मि., पेण-05.00 मि.मि., मुरुड-02.00 मि.मि., पनवेल-03.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-03.00 मि.मि., सुधागड-01.00 मि.मि., तळा-01.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-05.00, म्हसळा-05.00मि.मि., श्रीवर्धन-70.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 99.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 6.19 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   101.36 टक्के इतकी आहे. 00000

जिल्हा वार्षिक योजना खर्चाचा आढावा विहित वेळेत निधी खर्च करा - जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग दि.16,(जिमाका) जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 च्या जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयालयाच्या राजस्व सभागृहात  आज झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जिल्हा वार्षिक योजने मधील प्राप्त निधी, झालेला खर्च याचा आढावा घेतला व विहित वेळेत निधी खर्च करा अशा सूचना संबंधित यंत्रणेना दिल्या. यावेळी  जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा नियोजन अधिकरी सुनिल जाधव, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार,  जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती मृणाल देवराज, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ अधिक्षक अभियंता फारुक शेख,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, शिक्षणाधिकारी माध्यमिक शेषराव बडे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी यावेळी विविध विभागांच्या खर्चाचा आढावा घेतला.    जिल्हा नियोजन समिती कडून प्राप्त झालेला निधी हा त्याच आर्थिक वर्षात खर्च झाला पाहिजे. यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी अचूक व कालबध्द नियोजन करावे अशा स्पष्ट सूचना यावेळी त्यांनी दिल्या.    तसेच या वर्षासाठी प्रत्येक व

स्वच्छतेची मोहिम नियमित असावी --जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी

Image
            अलिबाग दि. 16 (जिमाका)  :- निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून स्वच्छता  मोहिम केवळ अभियानपुरती मर्यादित न ठेवता नियमित असावी. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची सवय बाळगून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज येथे  केले.  निर्मल सागर तट स्वच्छता मोहिम अंतर्गत, कोस्टगार्ड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, जिल्हा प्रशासन  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी  मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, मेरीटाईम बोर्डाचे प्रधान अधिकारी जसविर सिंग, कंमाडट कोस्टगार्ड अरुण कुमार सिंग  आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानाद्वारे  पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे.  त्यानुसार आपण सातत्याने  स्वच्छता मोहिम विविध ठिकाणी राबवितो.   आज आपण अलिबाग समुद्र किनारा स्वच्छ करुन पर्यटकांना त्याचे आकर्षण राहिल असे पहावे. 

जिल्ह्यात पावसाने ओलांडली सरासरी

         अलिबाग,(जिमाका)दि.15-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 42.54 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली.    जिल्ह्याच्या पर्जन्यमानाची सर्वसाधारण सरासरी ही 3142.64 मि.मी. इतकी असून आज नोंदविण्यात आलेल्या सरासरी  पर्जन्यमानामुळे ही सरासरी ओलांडून 3179. 20   मि.मी.  इतकी झाली आहे. तर एकूण पावसाची टक्केवारी 101.16% झाली आहे.   आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 58.00 मि.मी, पेण-22.00 मि.मी., मुरुड-16.00 मि.मी., पनवेल-42.60 मि.मी., उरण-18.00 मि.मी., कर्जत-52.60 मि.मी., खालापूर-46.00 मि.मी., माणगांव-60.00 मि.मी., रोहा-58.00 मि.मी., सुधागड-43.00 मि.मी., तळा-11.00 मि.मी., महाड-59.40 मि.मी., पोलादपूर-29.00मि.मी., म्हसळा-05.00मि.मी., श्रीवर्धन-140.00 मि.मी., माथेरान-20.00 मि.मी.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 680.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 42.54 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   101.16 % इतकी आहे.  यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान  माथेरान येथे नोंदविण्यात आले असून तेथे आज अख

महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलीयन:भरपूर खेळा; तंदुरुस्त रहा-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
  अलिबाग, (जिमाका),दि.15- विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलीयन (10 लक्ष) निमित्त रायगड जिल्ह्यातही विद्यार्थ्यांचे फुटबॉल सामने आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कुरुळ येथील आरसीएफ विद्यालयाच्या मैदानात फुटबॉल 'किक ऑफ' करुन या सामन्यांचा प्रारंभ केला. 'भरपुर खेळा आणि शारिरीक, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त रहा', असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना दिला. कुरुळ येथील आर.सी.एफ शाळेजवळील मैदानावर आज सकाळी साडेआठ वाजेपासून शाळकरी विद्यार्थ्यांचे फुटबॉल संघ दाखल होऊ लागले होते.  येथे आयोजित आटोपशीर कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील सामन्यांचा प्रारंभ केला. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक)सुनिल सावंत, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शेषराव बढे, पोलीस उपअधिक्षक (गृह) राजेंद्र दंडाल, आर.सी.एफ.चे  प्रशासकीय व्यवस्थापक हेमंत कुलकर्णी, तसेच एस.बी. पोटपोसे, डी.टी. चौधरी,  सी.व्ही . तळेगावकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आदी अधिकारी तसेच विद्यालयाचे

अलिबाग येथे 25 रोजी डाक अदालत

अलिबाग,(जिमाका)दि.14:-     भारतीय डाक विभागाच्या अधिक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग या कार्यालयामार्फत सोमवार,दि.25 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार,समस्या ज्याचे निवारण सहा आठवडा कालावधीत झालेले   नाही,अशा टपाल, स्पीडपोस्ट्, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबंधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक,ज्या अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ.असणे आवश्यक आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार दोन प्रतीत अधिक्षक डाकघर रायगड विभाग यांचेकडे दिनांक 22 सप्टेंबर पर्यंत पोहचतील अशारितीने पाठवाव्या, असे आवाहन अधिक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांनी केले आहे.

पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषि योजनांचा आढावा

Image
अलिबाग,(जिमाका)दि.14-    फलोत्पादनासाठी  रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाव असून यावर्षी पाच हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवून फळबाग क्षेत्र वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी रायगड जिल्ह्यातील कृषि,आत्मा व कृषि सलग्न्   विभागांचा नुकताच आढावा घेऊन जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, रोहयो उपजिल्हाधिकारी श्रीमती पी.एस. जैतू, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग सिगेदार, व 'आत्मा' प्रकल्प संचालक मंगेश डावरे, तसेच कृषि,आत्मा,वनविभाग, पशुसंवर्धन,मत्स्य व्यवसाय, दुग्धविकास व जलसंधारण विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, प्रगतशील शेतकरी , स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादन कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी  कृषि विभागामार्फत  राबविण्यात येणाऱ्या फलोत्पाद

उपराष्ट्रीय पल्स् पोलिओ लसीकरण: जिल्ह्यातील चार तालुक्यात 17 रोजी लसीकरण; पनवेल, उरण, कर्जत, खालापुर तालुक्यांचा समावेश

Image
अलिबाग,(जिमाका)दि.14-    शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे पोलिओ रोगापासून संरक्षण व्हावे यासाठी रविवार, दिनांक 17 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत रायगड जिल्ह्यातील पनवेल,उरण,कर्जत,खालापूर या चार तालुक्यांचा समावेश असून या तालुक्यातील बालकांना यावेळी लसीकरण करण्यात येईल. पालकांनी आपल्या बालकांना पोलीओचा डोस पाजण्यासाठी लसीकरण केंद्रावर न्यावे, असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.  या अभियानाच्या पूर्व तयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयातायोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. ए. देसाई, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. संदीप कसबे,  जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बढे, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. सुरेश देवकर,  जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने आदी उपस्थित होते.  यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्हाधिकारी रायगड व मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाची आरोग्य यंत्रणा पोली

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 0.20 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,(जिमाका)दि.14-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.20 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3136. 67   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-1.00 मि.मि., कर्जत-0.20 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-1.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-01.00 मि.मि., पोलादपूर-0.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 3.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 0.20 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   99.81 % इतकी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 15 पर्यंत मुदत

अलिबाग,(जिमाका)दि.13-   शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज  दि.15 सप्टेंबर पर्यंत भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा रायगड रायगड जिल्ह्यामध्ये महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल,समुदाय सेवा केंद्र, तहसिल कार्यालय, पंचायत समिती तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या सर्व शाखेत विनामूल्य् सुविधा उपलब्ध आहे.अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2017 पर्यंत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपले अर्ज संबंधित केंद्रावर तात्काळ भरावयाचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतले आहे,अशा शेतकऱ्यांनी आपल्या शाखेशी संपर्क साधून ई-सेवा केंद्रांवर आपला अर्ज भरावा. शेतकरी बांधवांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबर 2017 पर्यंत मुदतीत आपले अर्ज भरणा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी व पांडुरंग खोडका,जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,रायगड    यांनी   केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग,(जिमाका)दि.13-   सन 2017-18 या आर्थिक   वर्षामध्ये महामंडळाच्या राज्य् शासन पुरस्कृत   50% अनुदान योजना या बीज भांडवल योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या अर्जदारांना महामंडळाच्या   www.mahatmaphulecorporation. com/applications   या संकेत स्थळावर ऑनलाईन कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.             महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना:- 1.)50 टक्के अनुदान योजना- या योजनेत प्रकल्प मर्यादा रु. 50,000/- पर्यंत आहे. तसेच प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त् रु.10,000/- पर्यंत अनुदान देण्यात येते व राहिलेली रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. बँक कर्जावर नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे. बीज भांडवल योजना:-   महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलामधून बीज भांडवल योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरुप खालील प्रमाणे आहे. 1.)प्रकल्प मर्यादा रु.50,000/-ते रु.5 लाखापर्यंत, 2) प्रकल्प्‍ मर्यादेच्या 20 टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4टक्के द.सा.द.शे.व्याजदराने देण्यात येते. या राशी

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 35 मि.मि.पावसाची नोंद

          अलिबाग,(जिमाका)दि.13-   जिल्ह् यात गेल्या 24 तासात सरासरी 35.59 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.     तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण     सरासरी 3136. 47   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                 अलिबाग 47.00 मि.मि., पेण-53.00 मि.मि., मुरुड-02.00 मि.मि., पनवेल-57.80 मि.मि., उरण-51.00 मि.मि., कर्जत-91.60 मि.मि., खालापूर-69.00 मि.मि., माणगांव-14.00 मि.मि., रोहा-18.00 मि.मि., सुधागड-20.00 मि.मि., तळा-59.00 मि.मि., महाड-18.00 मि.मि., पोलादपूर-02.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-67.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 569.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 35.59 मि     इतकी आहे. एकूण सरासरी     पर्जन्यमानाची टक्केवारी   99.80 % इतकी आहे.

पर्यटनवृद्धीसाठी स्थानिकांचा सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग, दि.13 ( जिमाका)-  रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी अमाप संधी आहेत. मात्र या संधीचे पर्यटन व्यवसायवृद्धीत रुपांतर करण्यासाठी स्थानिकांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.  जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, टूर ऑपरेटर्स,  पर्यटन केंद्र चालक आदींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे एशियन डेव्हल्पमेंट बॅंकेचे उपसंचालक समन्वयक जितेंद्र रायसिंघानी,  प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन  सुरज नाईक,  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे  प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण,  बंदर अधिक्षक अरविंद सोनवणे तसेच हॉटेल व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडल्या. त्यानंतर  बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की,  जिल्ह्यात सध्या केवळ शनिवार रविवार अनेक पर्यटक येत असतात. पर्यटकांचा हा गट येत असतांनाच अन्य प्रकारच्या पर्यटन संधींची म

निर्मल सागरतट अभियान: पर्यटकांची सुरक्षा व सुविधेस प्राधान्य- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग, दि.13 ( जिमाका)-  रायगड जिल्ह्याला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यांचा पर्यटन विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करुन जिल्ह्याचा विकास करता येईल. त्यासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सेवा सुविधांचा विकास करतांना पर्यटकांची सुरक्षा व त्यांची सुविधा या गोष्टींना प्राधान्य दिले जावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. जिल्ह्याच्या सागरतट  व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली निर्मल सागरतट अभियानाच्या अंमल्बजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे,  महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे एशियन डेव्हल्पमेंट बॅंकेचे उपसंचालक समन्वयक जितेंद्र रायसिंघानी,  प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन  सुरज नाईक,  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे  प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण,  बंदर अधिक्षक अरविंद सोनवणे, रोहयो उपजिल्हाधिकारी पी.एस. जैतू, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच सर्व किनारा विकास अधिकारी व  ज्या दहा गावांत निर्मल सागरतट अभियान राबविले जात आहे त्या गावांचे सरपंच व ग्र

पत्रपरिषदः उद्यापासून 2ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहिम 'स्वच्छता हीच सेवा'अभियानात सहभागी व्हा- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Image
अलिबाग, दि.13 ( जिमाका)- केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व   नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत   'स्वच्छता हीच सेवा' ही  विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातही ही मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेत जिल्ह्यातील सर्वस्तरातील नागरिकांनी आणि समाजघटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.  या अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत  जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी वरील आवाहन केले.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात राबवावयाच्या मोहिमेची रुपरेषा याप्रमाणे- शुक्रवार दि. 15  रोजी   स्वच्छता हीच सेवा   या मोहिमेचा औपचारिकरित्या प्रारंभ करणे. यात जिल्ह्याचा शुभारंभ  शहरी भागाचा आरसीएफ विद्यालय येथे सकाळी नऊ वाजता होईल तसेच नगरपालिका शाळा क्रमांक 1 येथून स्वच्छता जनजागृत