जिल्हा वार्षिक योजना खर्चाचा आढावा विहित वेळेत निधी खर्च करा - जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी



अलिबाग दि.16,(जिमाका) जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 च्या जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयालयाच्या राजस्व सभागृहात  आज झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जिल्हा वार्षिक योजने मधील प्राप्त निधी, झालेला खर्च याचा आढावा घेतला व विहित वेळेत निधी खर्च करा अशा सूचना संबंधित यंत्रणेना दिल्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर,जिल्हा नियोजन अधिकरी सुनिल जाधव,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती मृणाल देवराज, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ अधिक्षक अभियंता फारुक शेख,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, शिक्षणाधिकारी माध्यमिक शेषराव बडे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी यावेळी विविध विभागांच्या खर्चाचा आढावा घेतला.   जिल्हा नियोजन समिती कडून प्राप्त झालेला निधी हा त्याच आर्थिक वर्षात खर्च झाला पाहिजे. यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी अचूक व कालबध्द नियोजन करावे अशा स्पष्ट सूचना यावेळी त्यांनी दिल्या.   तसेच या वर्षासाठी प्रत्येक विभागाने 30 सप्टेंबर पर्यंत संबंधित विभागाची तांत्रिक मंजूरी प्राप्त करुन निधी व प्रशासकीय मंजूरीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा अशा सूचना दिल्या.  मंजूर झालेला नियतव्यय खर्च करण्याची जबाबदारी ही त्या संबंधित अधिकाऱ्याची राहील याची नोंद सर्वांनी घ्यावी असेही ते यावेळी म्हणाले.
नाविण्यपूर्ण योजना
जिल्हा वार्षिक योजनामधून नाविण्यपूर्ण योजनेमध्ये शासकीय यंत्रणांनी नविन उपक्रमांचे प्रस्ताव सादर करावेत. ज्याचा लाभ समाजातील सामान्य जनतेला होईल. यामध्ये शिक्षण, क्रीडा, आरोग्य विभागांनी नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत चांगल्या सेवा दिल्या पाहिजेत.
जिल्हा ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान
या बैठकीमध्ये जिल्हा ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना संदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. या अभियानांतर्गत सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडाव्यात. हे एक महत्वाचे अभियान असून या अभियानाकरीता नेमण्यात आलेल्या आरडीएफ यांना योग्य ते सहकार्य करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती मृणाली देवराज यांनी शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दती व धोरणामध्ये सुधारणा केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलची माहिती दिली.
मुद्रा योजना
जिल्हा नियेाजन अधिकारी सुनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली  रायगड जिल्हा मुद्रा बँक योजना समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न झाली.   यावेळी मुद्रा योजनेबाबत करावयाच्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला.  या बैठकीला  जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती मृणाल देवराज,  जिल्हा अग्रणी बँकेचे अ.भ.नंदनवार,  जिल्हा कौशल्य विकास विभागाचे प्रतिनिधी स.अ.वर्तक  आदि उपस्थित होते. 


000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक