Posts

Showing posts from January 15, 2023

निर्लेखित साहित्याच्या निविदा प्रक्रियेसाठी इच्छुक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात--प्राचार्य श्री.के.डी.शिंदे

      अलिबाग,दि.19(जिमाका):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,महाड या संस्थेतील वापरून निर्लेखित झालेल्या साहित्याची विक्री जसे आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निर्लेखित झालेले हत्यारे, उपकरणे व लाकडी फर्निचर इत्यादी साहित्याचा समावेश आहे.  या निविदा प्रक्रियेकरिता लिफाफा पध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांकडून सीलबंद निविदा मागविण्यात येत आहेत. विक्री करावयाच्या वस्तू संस्थेतील संबंधित विभागामध्ये दि.23 जानेवारी  ते दि.06 फेब्रुवारी 2023 या कालावधीत सुटीचे दिवस वगळून सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाहावयास मिळतील. याच कालावधीदरम्यान सादर करावयाच्या विहित नमुन्यातील निविदा अर्ज रु.300/- (अक्षरी रुपये तीनशे मात्र ) ना परतावा किंमतीत संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येईल, नमुन्यातील ही पूर्ण माहिती अचूकपणे भरलेली निविदा अर्जासोबत रु. 5 हजार अनामत रक्कम जमा करणे गरजेचे असेल.  या रक्कमेचा भरणा प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड जि. रायगड या नावाने डी.डी. च्या स्वरुपात करावा. इच्छुक जी.एस.टी.नोंदणी

सुंदरराव मोरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले एड्स जनजागृतीपर पथनाट्य

Image
      अलिबाग,दि.18(जिमाका):-  युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशात साजरा करण्यात येणाऱ्या युवक सप्ताहाचे औचित्य साधून सामाजिक कार्यात योगदान देण्यासाठी येथील शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित सुंदरराव मोरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ग्रामीण रुग्णालय, पोलादपूरच्या एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र (आयसीटीसी सेंटर) यांच्या सहकार्याने रेड रिबन क्लब अंतर्गत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक सौ.भाग्यरेखा पाटील व तंत्रज्ञ सौ.सीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एड्स  जनजागृतीपर पथनाट्याचे नुकतेच सादरीकरण केले. या पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एड्स आणि एचआयव्ही बद्दल समाजामध्ये असणारे विविध गैरसमज तसेच एचआयव्ही बाधित रुग्णांना दिली जाणारी भेदभावयुक्त वागणूक, एड्स आणि एचआयव्ही यांच्या उपचारासाठी उपलब्ध असणाऱ्या आधुनिक उपचार पद्धती आणि याबाबत सरकारी रुग्णालयाकडून प्राप्त होणारे सहकार्य याबद्दल पथनाट्याद्वारे प्रबोधन केले. तसेच पथनाट्यातून एचआयव्ही, एड्स पासून स्वतःची सुरक्षा करण्यासाठी कोणत्

काळजी घ्या..किटकनाशके फवारणी करताना..!

  बऱ्याचदा शेतात काम करताना शेतपिकाच्या संरक्षणासाठी किटकनाशक फवारणी आवश्यक ठरते. शेतीच्या कामातील तो एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे किटकनाशके फवारणीचे काम करताना स्वत:ची व आपल्या बरोबर काम करणाऱ्या व्यक्तीचीही काळजी घेणे क्रमप्राप्त असते. ही काळजी कशी घ्यावी, याविषयी पुढील लेखातून समजून घेवू या…! किटकनाशक वापरापूर्वी बाटलीवरील लेबल व माहिती पत्रक वाचून खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे. डब्यावरील लाल रंगाचे पतंगाच्या आकाराचे चिन्ह असलेली किटकनाशके सर्वात विषारी त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो ही चिन्हे सोपी व सर्वसाधारण, निरक्षर व्यक्तींसाठी समजण्यासाठी असतात. तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही किटनाशके फवारणीसाठी वापरू नये. मुदतबाह्य किटकनाशकाची फवारणी करू नये. किटकनाशकाचे मिश्रण तयार करताना कोणती काळजी घ्यावी?:- कृषी विभागाने शिफारस केलेल्या प्रमाणातच रसायने घ्यावी,   रसायनांच्या भुकटीला सुरूवातीला पाण्यात मिसळावे त्यानंतर गरजेनुसार त्यात पाणी टाकावे,   किटकनाशक हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे. किटकनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी? :- मिश्रण तयार करताना हातमोजे

जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या 1 लाख 19 हजार 573 लोकसंख्येपैकी एकूण 74 हजार 478 मतदारांची नोंदणी पूर्ण

      अलिबाग,दि.17(जिमाका):-  मा.भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार दि.01 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील विशेषतः असुरक्षित आदिवासी गटातील सर्व पात्र मतदारांची 100 टक्के नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये ठिकठिकाणी आदिवासी मतदार नोंदणीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वी आदिवासी समाजातील 71 हजार 880 इतकी मतदार नोंदणी झाली होती. तसेच या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 2 हजार 598 एवढी नोंदणी झाली आहे. जिल्ह्याच्या कातकरी समाजाच्या 1 लाख 19 हजार 573 लोकसंख्येपैकी एकूण 74 हजार 478 मतदार नोंदणी झाली आहे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे यांनी कळविले आहे. 00000000

रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा वायशेतच्या तीन विद्यार्थ्यांची भरारी सॅटेलाईट लाँच व्हेहीकल मिशन-2023 साठी विद्यार्थ्यांची वर्णी डॉ.किरण पाटील यांनी विद्यार्थ्यांसह केला‌ पालकांचा सत्कार

    अलिबाग,दि.17(जिमाका):-  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाईट लाँच व्हेहीकल मिशन 2023 साठी रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील वायशेत शाळेतील तीन विद्यार्थ्यांची वर्णी लागली आहे. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलाम, स्पेस झोन इंडिया, मार्टिन ग्रुप यांच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सॅटेलाईट लाँच व्हेहीकल मिशन 2023 आयोजित करण्यात आले आहे. अतिशय प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या या मिशनसाठी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा आज सत्कार केला. यावेळी डॉ. किरण पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या तसेच या विद्यार्थ्यांना मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषद सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही  दिली. दि.19 फेब्रुवारी 2023 रोजी तमिळनाडूतील पत्तीपुरम येथून 150 पिको सॅटेलाईट हे परत वापरल्या जाणाऱ्या रॉकेट सह प्रक्षेपित होणार आहे. हे रॉकेट उपग्रह प्रक्षेपित केल्यानंतर पॅराशूटच्या मदतीने परत जमिनीवर उतरणार आहे. हे रॉकेट पुन्हा पुढील मिशनसाठी वापरता येईल, असा प्रय

मौजे हनुमान कोळीवाडा गावच्या पुनर्वसन संदर्भात यादीतील टंकलिखित दोष/आक्षेप असल्यास तहसिल कार्यालय,उरण येथे निवेदन सादर करावे--तहसिलदार भाऊसाहेब अंधारे

    अलिबाग,दि.17(जिमाका):-  मौजे हनुमान कोळीवाडा गावचे पुनर्वसन करण्याकामी जे.एन.पी.ए. प्रशासनाकडून 256 कुटूंबांची अधिकृत यादी मागविण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अभिलेखानुसार 86 शेतकरी कुटूंब संख्या असून 170 बिगर शेतकरी कुटूंब आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी, पनवेल यांच्याकडील दि.17 फेब्रुवारी 1990 रोजीच्या आज्ञापत्रामध्ये कुटूंबातील व्यक्तींची संख्या 206 एवढी असून 105 कुटूंबांना भूखंड वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर सन 1997 च्या दरम्यान हनुमान कोळीवाडा गावाला वाळवी लागत असल्याने तेथील ग्रामस्थांनी पुनर्वसनाची मागणी केल्यानंतर मार्च 1997 मध्ये हनुमान कोळीवाडा गावचे कुटूंबांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यावेळी 268 कुटूंबे होती असे तहसिल कार्यालय, उरण  यांच्या अभिलेखावरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे दोन्हीही कागदपत्रे पाहता व पडताळणी करता 256 कुटूंबांची यादी या कार्यालयामार्फत तयार करण्यात आली आहे. त्यापैकी 86 शेतकरी कुटूंबे व 170 बिगर शेतकरी कुटुंबे आहेत. उपविभागीय अधिकारी, पनवेल यांच्याकडील दि.17 फेब्रुवारी 1990 रोजीचे आज्ञापत्र व तहसिल कार्यालय उरण यांच्याकडील हनुमान कोळीवाड

पीक संरक्षण घरच्या घरी उपयोगी आहे निंबोळी अर्क..!

  रसायनांच्या अतिवापरामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास सुध्दा निश्चितपणे थांबविता येऊ शकतो. त्यासाठी एकात्मिक किडरोग पध्दतीमधील शिफारसीचा अवलंब सर्वांनी करावा. त्या पध्दतीमधील अत्यंत महत्वाचा व तितकाच प्रभावी उपाय म्हणजे निंबोळी अर्क. काय आहे निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दत, त्याचे लाभ समजून घेवू, या लेखाद्वारे..! निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दत :- शेतीच्या बांधावरील, रस्त्याच्या कडेला असलेल्या कडुनिंबाच्या झाडाखाली पडलेल्या चांगल्या पिकलेल्या निंबोळ्या वेचून गोळा करा. गोळा केलेल्या निबोळ्यांची साल वेगळी करून बियांचा गर स्वच्छ धुवून काढा. गरात साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यावर बुरशी वाढण्याची शक्यता असते. साल व गर काढलेल्या निंबोळीच्या बिया चांगल्या सुकवून कोरड्या जागी साठवून ठेवा. चांगल्या सुकलेल्या निंबोळ्यांच्या बिया घेऊन त्या खलबत्यात कुटून चांगल्या बारीक करून घ्या. प्रमाणात निंबोळ्या गोळा झाल्या असल्यास पल्चरायझरच्या सहाय्यानेसुध्दा पावडर करता येईल. फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी पाच किलो बारीक केलेली निंबोळी पावडर नऊ लिटर भिजत टाका. तसेच एक लिटर पाण्यात 200  ग्राम साबणाचा च

पेण तालुक्यातील आदिवासी वाड्यांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार--मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील

  अलिबाग,दि.16(जिमाका):-  पेण तालुक्यातील ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील तांबडीवाडी, काजूचीवाडी, खौसावाडी, केळीचीवाडी, उंबरमाळ या पाच आदिवासी वाड्यांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या आदिवासी वाड्यांवर रस्ता तसेच पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व पेण गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी दिली आहे. पेण तालुक्यातील तांबडीवाडी, काजूचीवाडी, खौसावाडी, केळीचीवाडी, उंबरमाळ या आदिवासी वाड्यांवरील नागरिकांना विविध मूलभूत सुविधांची वानवा जाणवत होती. यामुळे येथील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ठोस पाऊले उचलण्यात आली आहेत. या वाड्यांकरिता रस्ता बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने 60 लाख रुपये निधीला तदर्थ मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत उपविभाग पेण बांधकाम अभियंता यांच्या कार्यालयामार्फत अंदाजपत्रक तयार करुन अंतिम प्रशासकीय मान्यता मिळविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तसेच या वाड्यांकरिता जलजीवन मिशन अंतर्गत न

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण यांच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

    अलिबाग,दि.16(जिमाका):-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांच्या वतीने दि. 11 ते दि. 17 जानेवारी 2023 या कलावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्याच अनुषंगाने (दि. 12 जानेवारी 2023)  रोजी या कार्यालयामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.महेश देवकाते यांनी केले.  तसेच कार्यालयात कामासाठी येणाऱ्या अभ्यगतांना रस्ते अपघात कमी करण्याकरिता प्रबोधनात्मक चित्रफित दाखविण्यात आली. नेत्र तपासणी शिबीरामध्ये वाहन चालक, विविध कामासाठी येणाऱ्या जनतेचे तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. दिवसभरात किमान 100 लोकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर या कार्यालयाच्या जिते येथील ब्रेक टेस्टींग ट्रॅकवर वाहन तपासणीसाठी येणाऱ्या वाहन चालक, मालक यांचे रस्ते अपघात कमी करण्याकरिता रस्ता सुरक्षा संदर्भात प्रबोधन करण्यात आले. या कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त शाळा. महाविद्यालये येथे जाऊन रस्ता सुरक्षा विषयक विशेष मार्गदर्शन करण्यात येत असून वाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडूंनी अर्ज सादर करावेत

    अलिबाग,दि.16(जिमाका):- शासनाच् या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान केले जातात. शासनाने नुकत्याच दि.14 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने  https://sports.maharashtra. gov.in  या संकेतस्थळास भेट देऊन, डाऊनलोड करुन घेऊन, व्यवस्थितरित्या भरुन संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी मिळणार मोफत अन्नधान्य

  अलिबाग,दि.16(जिमाका):-   राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना-2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा प्रति शिधापत्रिका 35 किलो अन्नधान्य व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रति व्यक्ती 5 किलो अन्नधान्य वितरीत करण्यात येते. हे अन्नधान्य गहू रु. 2  प्रतिकिलो व तांदूळ  रु.3 प्रतिकिलो या दराने लाभार्थ्यांना देण्यात येते.              केंद्र शासनाच्या निर्णयानुसार हे अन्नधान्य राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना माहे जानेवारी,2023 पासून डिसेंबर 2023 पर्यंत वर्षभर मोफत वितरीत करण्यात येणार आहे. कोविड-19 विषाणूच्या प्रादूर्भावामुळे केंद्र शासनाकडून एक विशेष बाब म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत माहे एप्रिल,2020 पासून डिसेंबर,2022 पर्यंत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिव्यक्ती 5 किलो अतिरिक्त अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात येत होते.             ही योजना माहे जानेवारी 2023 पासून बंद करण्यात आली असून नियमित योजनेचे अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे.             या निर्णयाचा लाभ जिल्