जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या 1 लाख 19 हजार 573 लोकसंख्येपैकी एकूण 74 हजार 478 मतदारांची नोंदणी पूर्ण

 

 

 

अलिबाग,दि.17(जिमाका):- मा.भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार दि.01 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील विशेषतः असुरक्षित आदिवासी गटातील सर्व पात्र मतदारांची 100 टक्के नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते.

त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये ठिकठिकाणी आदिवासी मतदार नोंदणीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वी आदिवासी समाजातील 71 हजार 880 इतकी मतदार नोंदणी झाली होती. तसेच या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 2 हजार 598 एवढी नोंदणी झाली आहे. जिल्ह्याच्या कातकरी समाजाच्या 1 लाख 19 हजार 573 लोकसंख्येपैकी एकूण 74 हजार 478 मतदार नोंदणी झाली आहे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे यांनी कळविले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक