Posts

Showing posts from June 24, 2018

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 12मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 12.76 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 924.01   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 19.00 मि.मि., पेण-11.00 मि.मि., मुरुड-22.00 मि.मि., पनवेल-5.00 मि.मि., उरण-3.50 मि.मि., कर्जत-19.20 मि.मि., खालापूर-23.00 मि.मि., माणगांव-12.00 मि.मि., रोहा-9.00 मि.मि., सुधागड-17.00 मि.मि., तळा-6.00 मि.मि., महाड-1.00 मि.मि., पोलादपूर-1.00, म्हसळा-9.80मि.मि., श्रीवर्धन-22.00 मि.मि., माथेरान-23.70 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 204.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 12.76 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   29.40 % इतकी आहे. ०००००

जिल्हा माहिती कार्यालयातील अशोक महादेव मोरे सेवानिवृत्त

Image
            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30-    जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग या कार्यालयातील रोनिओ ऑपरेटर अशोक महादेव मोरे हे नियत वयोमानानुसार शनिवार दि. 30 जून, 2018 रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांना जिल्हा   माहिती कार्यालयातर्फे स्नेहपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती)डॉ.गणेश मुळे   यांच्या हस्ते श्री.मोरे यांना सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.             डॉ.गणेश मुळे यांनी श्री.मोरे यांच्या 38 वर्षाच्या सेवेचे कौतुक करून त्यांना भावी   वाटचालीस शुभेच्छा दिल्या.             श्री. मोरे यांनी आपल्या मनोगतात सेवा काळातील आठवणी सांगून सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, कर्मचारी सर्वश्री विभागीय माहिती कार्यालयाचे लेखापाल गंगाराम बांगरा,   लिपिक टंकलेखक श्री. सचिन काळुखे, लिपिक टंकलेखक श्रीमती निशा चंद्रकांत कदम, सिनेयंत्रचालक श्री. धनजंय कासार, श्री.जितेंद्र यादव, श्री.सचिन राऊत, श्री.शशिकांत भोसल

कृषिदिनानिमित्त आज प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 -    हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतरावजी नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या जयंती निमित्त दि. 1 जुलै, रोजी कृषि दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद रायगड व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार सोहळा कै.ना.ना.पाटील सभागृह जिल्हा परिषद रायगड,अलिबाग येथे रविवार दि. 1 जुलै रोजी सकाळी 11 वा. आयोजित केला आहे. हा कार्यक्रम रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कु. आदितीताई तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली,   तर बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते, लोकसभा सदस्य खा.श्रीरंग बारणे, विधानपरिषद सदस्य   आ. जयंत पाटील, आ. सुनिल तटकरे, आ. निरंजन डावखरे,       आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य आ. सुभाष पाटील, आ. सुरेश लाड, आ. भरत गोगावले, आ. धैर्यशिल पाटील, आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर, आ. अवधु

13 कोटी वृक्ष लागवड : आजपासून अभियानास प्रारंभ : 37 लक्ष रोप लागवडीसाठी जिल्हा प्रशासनाची सज्जता

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 -    राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्र शासनाने सोडला आहे. या मोहिमेंतर्गत सन 2016 मध्ये 2 कोटी, 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला असून आता सन 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टात रायगड जिल्ह्यात या वर्षी 30 लक्ष 6 हजार   रोपे लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून ही रोपे उद्या (रविवार दि.1 ते 31 जुलै दरम्यान) सुरु होणाऱ्या अभियानात जिल्हाभरात शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत व विविध संस्था, नागरिकांमार्फत लावण्यात येतील. रायगड जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले असून उद्दिष्ट जरी 30 लक्ष 6 हजार रोपे लागवडीचे आहे, तरी प्रत्यक्षात 37 लक्ष 22 हजार 388 रोपे लावण्याची तयारी प्रशासनाने केली आहे हे विशेष. या महोत्सवात जिल्ह्यातील सर्वस्तरातील नागरिकांनी , सामाजिक, सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. विभागनिहाय रोप लागवड जिल्ह्यात विभागनिहाय रोपे लागवडीचे देण्यात आलेले उद्दिष्ट्य याप्रमाणे- अलि

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 33मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 33.24 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 891.65   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 38.00 मि.मि., पेण-60.20 मि.मि., मुरुड-17.00 मि.मि., पनवेल-19.40 मि.मि., उरण-15.20 मि.मि., कर्जत-66.60 मि.मि., खालापूर-61.00 मि.मि., माणगांव-31.00 मि.मि., रोहा-19.00 मि.मि., सुधागड-30.00 मि.मि., तळा-18.00 मि.मि., महाड-40.00 मि.मि., पोलादपूर-22.00, म्हसळा-37.20मि.मि., श्रीवर्धन-12.00 मि.मि., माथेरान-45.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 531.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 33.24मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   29.53 % इतकी आहे. तसेच रविवार दि.1 व सोमवार दि.2 जुलै रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिला आहे. ००००

13 कोटी वृक्ष लागवड मौजे कार्ला येथे रविवारी मुख्य कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 -    राज्य शासनाच्या   13   कोटी वृक्ष लागवड मोहिम अंतर्गत रायगड जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम मौजे कार्ला, कं.नं. 160, ता.अलिबाग येथे रविवार दि. 1 जुलै रोजी सकाळी 11 वा. होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अदितीताई तटकरे, लोकसभा सदस्य खा.श्रीरंग बारणे, विधानपरिषद सदस्य आ. जयंत पाटील, आ. सुनिल तटकरे, आ. निरंजन डावखरे,       आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य आ. सुभाष पाटील, आ. सुरेश लाड, आ. भरत गोगावले, आ. धैर्यशिल पाटील, आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर, आ. अवधुत तटकरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहून वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, व उप वनसंरक्षक मनिष कुमार यांनी केले आहे. 0000000

सिडको भवन येथे रविवारी वस्तू सेवा कर दिन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 -    एक राष्ट्र एक कर एक बाजारपेठ या संकल्पनेनुसार संपूर्ण देशभरात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरु होऊन दि. 1 जुलै, 2018 रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या विषयी अधिक जनजागृती व्हावी यासाठी वस्तू व सेवाकर विभाग रायगड यांच्या मार्फत रविवार दि. 1 जुलै रोजी सकाळी 11 वा. सिडको भवन बेलापूर येथे वस्तू व सेवाकर दिन साजरा करण्यात येणार आहे. 000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 64मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 64.39 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 858.41   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 36.00 मि.मि., पेण-73.20 मि.मि., मुरुड-50.00 मि.मि., पनवेल-64.00 मि.मि., उरण-67.00 मि.मि., कर्जत-57.60 मि.मि., खालापूर-44.00 मि.मि., माणगांव-68.50 मि.मि., रोहा-95.00 मि.मि., सुधागड-33.00 मि.मि., तळा-150.00 मि.मि., महाड-66.00 मि.मि., पोलादपूर-27.00, म्हसळा-117.20मि.मि., श्रीवर्धन-35.00 मि.मि., माथेरान-44.70 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1030.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 64.39 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   28.46 % इतकी आहे. तसेच रविवार दि.1 व सोमवार दि.2 जुलै रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिला आहे. ०००००

पिक पाणीःभात लावणीची लगबग

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28 -    भात हे रायगड जिल्ह्यातील मुख्य पिक. या पिकाच्या लागवडीसाठी सध्या शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.   जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाखालील क्षेत्र हे 1 लाख 5 हजार हेक्टर इतके होईल असा कृषि विभागाचा अंदाज आहे.   भात शेतीच्या मशागतीचे उलकटणी, राब पेरणी असे महत्त्वाचे टप्पे आटोपल्यानंतर आता सध्या सर्वत्र चिखलणी सुरु झाली आहे. या दरम्यान पिकाला नत्राचा पुरवठा द्यावा लागतो, त्यादृष्टीने खतांचे डोस दिले जातात. त्यासाठी खताचीही मुबलक उपलब्धता करुन देण्यात आली आहे. लावणीनंतरही चाळीस दिवसात दोनदा नत्राची मात्रा दिली जाते. यासंदर्भात शासनाचा कृषि विभाग शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि   तांत्रिक सहाय्य उपलब्ध करुन देत आहे.   शेतकऱ्यांना बियाण्याची उपलब्धता यापुर्वीच करुन देण्यात आली आहे. त्यानुसार भाताची पेरणी (राब पेरणी) आटोपली आहे. सध्या जिल्ह्यात पुरेसा खताचा व किटकनाशकांचा साठा   शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उपलब्ध आहे, अशी माहितीही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके यांनी दिली. यापुढील टप्प्यात मोठी होत आलेली रोपे लावणीचे काम सुरु होईल. त्यासाठी आता शेतकऱ्या

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 19मि.मि.पावसाची नोंद

      अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19.60 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 813.62   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 8.00 मि.मि., पेण-29.00 मि.मि., मुरुड-18.00 मि.मि., पनवेल-4.60 मि.मि., उरण-7.00 मि.मि., कर्जत-18.90 मि.मि., खालापूर-21.00 मि.मि., माणगांव-4.50 मि.मि., रोहा-26.00 मि.मि., सुधागड-12.00 मि.मि., तळा-59.00 मि.मि., महाड-14.00 मि.मि., पोलादपूर-8.00, म्हसळा-52.80मि.मि., श्रीवर्धन-5.00 मि.मि., माथेरान-25.80 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 313.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 19.60 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   26.99 % इतकी आहे. ०००००

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 26मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 26.33 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 794.02   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 16.00 मि.मि., पेण-40.20 मि.मि., मुरुड-6.00 मि.मि., पनवेल-44.00 मि.मि., उरण-8.00 मि.मि., कर्जत-29.80 मि.मि., खालापूर-60.00 मि.मि., माणगांव-26.00 मि.मि., रोहा-17.00 मि.मि., सुधागड-27.00 मि.मि., तळा-18.00 मि.मि., महाड-25.00 मि.मि., पोलादपूर-20.00, म्हसळा-25.40मि.मि., श्रीवर्धन-7.40 मि.मि., माथेरान-51.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 421.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 26.33 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   26.37 % इतकी आहे. ०००००

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26 - इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी   अभ्यासक्रमांत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या मातंग समाजातील विद्यार्थ्यांना   साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती दिली जाते. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती साठी महामंडळाकडून सरासरी 60%पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज मागविण्याची अंतिम मुदत मंगळवार दि.10 जुलै 2018 रोजी पर्यंत आहे. आलेल्या प्रस्तावांतून जेष्ठता   व गुणक्रमांकानुसार शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी इयत्ता दहावी व बारावी पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला ,उत्पन्न दाखला, रेशनकार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट,2फोटो पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ.सह दोन प्रतीत आपल्या पूर्ण पत्त्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,विकास महामंडळ (मर्या.),डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन,मराठी शाळेच्यामागे, गोंधळपाडा,

आपत्ती व्यवस्थापनाचा वस्तूपाठ : वाहुन गेलेल्या मोरीची 12 तासात पुन्हा उभारणी : प्रशासनाची प्रयत्नांची शर्थ; पाली खोपोली रस्त्यावरील रहदारी पुर्ववत

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26 -    अनिश्चितता हा आपत्तीचा स्थायी भाव. तरीही आलेल्या आपत्तीला धैर्याने, सुनियोजित कार्य्पद्धतीने आणि संघटितपणे सामोरे गेले तर त्या आपत्तीचा सहज बिमोड करता येतो. रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने याचा वस्तूपाठच घालून दिलाय तो काल (दि.25) रोजी घडलेल्या घटनेला सामोरे जाऊन. रविवारी (दि.24) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वाकण – पाली - खोपोली रस्त्यावर खुरावले फाट्याजवळील पाईप मोरी सोमवारी (दि.25) सकाळी अकरा वाजेच्या सुमारा वाहुन गेल्याने   रहदारी बंद झाली होती. परंतू शासनाच्या यंत्रणेने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन   वाहुन गेलेली ही मोरी भर पावसात पुन्हा नव्याने बांधून अवघ्या 12 तासात रहदारी पुर्ववत सुरु केली. रविवारी रात्री जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस होत होता. जिल्ह्यात नुकताच केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग निर्माण मंत्रालयाने वाकण- पाली-खोपोली हा रस्ता एनएच 548- अ राष्ट्रीय महामार्ग घोषित केला.   या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी खुरावले फाट्याजवळ रस्त्याच्या अर्ध्याभागाचे काम सुरु होते व जुन्या अर्ध्या भागावरुन रहदारी सु

सामाजिक समता दिन सोहळा: छत्रपती शाहू महाराजांनी रचला सामाजिक समतेचा पाया : निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांचे प्रतिपादन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26 -    ब्रिटीश राजवटीत सुद्धा आपल्या कोल्हापुर संस्थानात   समाजातील दुर्बल घटकांसाठी न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी   अस्पृश्यता निवारण, शिक्षण, आरक्षण यासारख्या धोरणांची अंमलबजावणी करुन राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पाया रचला, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी आज येथे केले.   राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रविकिरण पाटील , तहसिलदार लोखंडे तसेच अन्य विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थि विद्यार्थिनी उपस्थित होते.   कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.   आपल्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी पाणबुडे म्हणाले की, महाराष्ट्र ही छत्रपती शाहू, महात्मा जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महा

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 84 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 84.24 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 767.69   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 17.00 मि.मि., पेण-45.00 मि.मि., मुरुड-45.00 मि.मि., पनवेल-110.20 मि.मि., उरण-63.00 मि.मि., कर्जत-138.60 मि.मि., खालापूर-80.00 मि.मि., माणगाव-120.00 मि.मि., रोहा-86.00 मि.मि., सुधागड-40.00 मि.मि., तळा-70.00 मि.मि., महाड-140.00 मि.मि., पोलादपूर-124.00, म्हसळा-98.02मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-160.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1347.82 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 84.24 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   25.54 % इतकी आहे. 00000

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रयोजनासाठी: अनुसूचित जमाती प्रमाणपत्र त्वरीत देण्याकरीता विशेष मोहिम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25 - अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना  शैक्षणिक प्रयोजनासाठी (विशेषत: वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी व सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र त्वरीत मिळावे यासाठी विशेष मोहिम आखण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना  e-ribe पोर्टलवर https://etribevalidity.mahaonline.gov.in  ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राधान्याने वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे,असे सहआयुक्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती,कोकण विभाग,ठाणे यांनी कळविले आहे.   यासंदर्भात या समितीच्या पोलीस दक्षता पथकास देखील गृह व शालेय चौकशीची व कागदपत्रांची पडताळणी   करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था,पुणे येथे हेल्पलाईन व 020-26360941 सुरु करण्यात आली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत अनुसूचित जमातीच्या जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैधता प्रमाणपत्रांच्या अनुषंगाने विशेष कक्षामार्फत आवश्यक ती माहिती पुरविण्याची व्यवस्था क

जिल्हा रुग्णालयात दर महिन्याच्या 21 तारखेला ‘योग’मार्गदर्शन-डॉ. गवळी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25 - योग दिवस हा एक दिवसाचा सोहळा न राहाता लोकांना जास्तीत जास्त् फायदा मिळण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे निरनिराळ्या व्याधींवर उपचार म्हणून योग मार्गदर्शन दिले जाईल, या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.अजित गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक रायगड अलिबाग यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान   अंतर्गत आयुष विभागाद्वारे जागतिक योग दिनानिमित्त   जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, अलिबाग येथे योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.अजित गवळी, जिल्हा शल्य् चिकित्सक, डॉ.अनिल फुटाणे,अति.जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ.अमोल भुसारे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क), जिल्हा आयुष अधिकारी डॉ.चेतना पाटील, डॉ.अर्चिस पाटील व डॉ.वैशाली पाटील,आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी, डॉ.रश्मी गंभीर, होमिओपॅथी वैद्यकीय अधिकारी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग मार्गदर्शक दामोदर पाटील व स्मिता देवळे, सामान्य रुग्णालयातील प्रशिक्षिका सौ.सीमा रेजा,आयुष सहाय्यक रुपेश पाटील व दिपाली म्हात्रे तस

सार्वजनिक ग्रंथालय लेखा परीक्षण अहवाल सादर करण्याचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25 -    जिल्ह्यातील शासनमान्य   सार्वजनिक ग्रंथालयांनी त्यांच्या ग्रंथालयाचा सन 2017-18च्या लेखा परीक्षणाचा वार्षिक अहवाल   शनिवार दि.30 पर्यंत जमा करावेत. तसेच सनदी लेखा परीक्षण अहवाल 30 ऑक्टोबर अखेर   जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, डोंगरे हॉलच्या वर, पोस्ट ऑफिस समोर, अलिबाग, जि. रायगड येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी यांनी केले आहे. 00000

सामाजिक न्याय दिनानिमित्त आज कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25 -    राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त (26 जून) सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम   जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात सकाळी 11 वा.आयोजित करण्यात आला आहे.   तसेच आगामी महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन दि.25 जुलै पर्यंत करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. 00000

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना: शिधा पत्रिका व आधार कार्ड झेरॉक्स जमा करण्याचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25 - अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय यांच्या शासन निर्णयानुसार 30 एप्रिल 2018 अखेर आधार संलग्नता   करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शासन निर्णयातील निर्देशानुसार स्वलतीच्या दराने लाभ घेत असलेल्या व घेऊ इच्छित असलेल्या   शिधापत्रिकाधारकांनी   या शासन निर्णयासोबत दिलेले हमीपत्र संबंधित शिधावाटप अधिकारी किंवा तहसिलदार यांच्या कार्यालयात जमा करण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत. ही कार्यवाही करतांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा   योजनेअंतर्गत केंद्र शासनाने ग्रामीण भागाकरीता विहीत केलेली   कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रक्कम रुपये 44 हजार आणि शहरी भागाकरीता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रक्कम रुपये 59 हजार च्या मर्यादेत लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. तरी सर्व शिधापत्रिकाधारकांनी   आपल्या   शिधापत्रिकेची छायाप्रत, कुटुंबातील सदस्यांच्या आधारकार्डच्या छायाप्रती आपल्या संबंधित तहसिलदार कार्यालयाच्या पुरवठा शाखेत जमा करावी, शासनाकडून प्राप्त होणाऱ्या हमीपत्रातही आपली स्वतःची माहिती

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीत वाढ

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25 - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेबाबत केंद्रशासनाने सन 2017 -18 या वर्षापासून शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वार्षिक रु. सहा हजार रुपयांऐवजी रु. 12 हजार इतकी वाढ केली आहे. केंद्र शासनाने बाराव्या नियोजन आयोगानुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेबाबत सन 2017-18 या वर्षापासून शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये रु.पाचशे वरुन दरमहा रु.एक हजार   तर तिमाहीसाठी रु.पंधराशे च्या दुप्पट म्हणजेच तीन हजार तर सहा हजारावरु रु.बारा हजार या प्रमाणे वाढ केली आहे. ही वाढ सन 2017-18 मध्ये शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील होणाऱ्या परीक्षेकरीता लागू राहील. 1.)परिक्षा दिनांक 20 नोव्हेंबर 2016 (सन 2017-18 इयत्ता नववी नवीन), 2.)परिक्षा दिनांक 7 जानेवारी   2016 (सन 2017-18 इयत्ता दहावी नुतनीकरण), 3.)परिक्षा दिनांक 10 जानेवारी   2015 (सन 2017-18 इयत्ता अकरावी   नुतनीकरण), 4.)परिक्षा दिनांक 17 नोव्हेंबर 2013 (सन 2017-18 इयत्ता बारावी नुतनीकरण).तरी पात्र विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा.असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) र

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 98 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 98.49 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 683.45   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 155.00 मि.मि., पेण-160.00 मि.मि., मुरुड-60.00 मि.मि., पनवेल-158.50 मि.मि., उरण-106.00 मि.मि., कर्जत-86.30 मि.मि., खालापूर-71.00 मि.मि., माणगांव-70.00 मि.मि., रोहा-110.00 मि.मि., सुधागड-77.00 मि.मि., तळा-130.00 मि.मि., महाड-38.00 मि.मि., पोलादपूर-50.00, म्हसळा-105.00मि.मि., श्रीवर्धन-44.00 मि.मि., माथेरान-155.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1575.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 98.49 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   22.89 % इतकी आहे. ०००००