जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 64मि.मि.पावसाची नोंद



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 64.39 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 858.41  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 36.00 मि.मि., पेण-73.20 मि.मि., मुरुड-50.00 मि.मि., पनवेल-64.00 मि.मि., उरण-67.00 मि.मि., कर्जत-57.60 मि.मि., खालापूर-44.00 मि.मि., माणगांव-68.50 मि.मि., रोहा-95.00 मि.मि., सुधागड-33.00 मि.मि., तळा-150.00 मि.मि., महाड-66.00 मि.मि., पोलादपूर-27.00, म्हसळा-117.20मि.मि., श्रीवर्धन-35.00 मि.मि., माथेरान-44.70 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1030.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 64.39 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 28.46 % इतकी आहे.
तसेच रविवार दि.1 व सोमवार दि.2 जुलै रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिला आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक