Posts

Showing posts from October 30, 2016

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक ------ प्रसार माध्यमावर सनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

दिनांक:-5 नोव्हेंबर 2016                                                                      वृत्त क्र.707 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक ------ प्रसार माध्यमावर सनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत अलिबाग,दि.5:-(जिमाका)रायगड जिल्हयातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका आणि नगरपरिषद अध्यक्षांची थेट निवडणूक कार्यक्रम 2016-17 करिता प्रसार माध्यमावर सनियंत्रण ठेवण्यासाठी  जिल्हाधिकारी, रायगड यांच्या अध्यक्षतेखाली समिती  स्थापन  करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य पुढील प्रमाणे आहेत. अपर जिल्हाधिकारी, रायगड, पोलिस उपअधिक्षक(गृह),अलिबाग, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचा नामनिर्देशित प्रतिनिधी, संबंधित प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी,संबंधित तहसिलदार अथवा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. या समितीचे कामकाज पुढीलप्रमाणे राहील.राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर केल्यावर सदर समिती एक वार्ताहार परिषद घेऊन तसेच वृत्तपत्रामध्ये जाहीर सूचना देऊन निवडणुकांमध्ये होणाऱ्या पेड न्यूज म्हणजे काय याची माहिती

पिवळया व केशरी शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक कळविणे बंधनकारक 15 नोव्हेंबर पर्यंत मुदत

दिनांक :- 0 4/11/2016                                                                         वृ.क्र. 704 पिवळया व केशरी शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक कळविणे बंधनकारक 15 नोव्हेंबर पर्यंत मुदत अलिबाग,दि.4:- (जिमाका) पिवळया व केशरी शिधापत्रिका धारकांना त्यांचा आधार क्रमांक संबधित दुकानदाराला कळविले बंधनकारक करण्यात आले आहे.  आधार कार्ड क्रमांक कळविण्यासाठी 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.  सद्यस्थ्‍िातीत जे लाभार्थी शासकीय अन्नधान्याचा लाभ घेत आहेत अशा शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांचे आधारकार्ड संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे जमा केल्याची खात्री लाभार्थी  धारकांनी स्वत: करुन घ्यावी. कुटूंबांतील काही सदस्यांकडे आधार क्रमांक नसल्यास त्यांनी तालुक्यातील आधार केंद्रांवर आधार कार्डाची नोंदणी करुन आधार नोंदणी क्रमांक 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत संबंधित रेशन दुकानदारास द्यावे.  जे लाभार्थी आधार क्रमांक अथवा आधार नोंदणी क्रमांक उपलब्ध करुन देणार नाहीत त्यांची नावे 16 नोव्हेंबर 2016 पासून रेशनकार्डमधून कायमस्वरुपी वगळण्यात येतील तद्नंतर त्यांचे नाव पुन्हा समाविष्ट

रायगड जिल्हा परिषद प्रभाग रचना, आरक्षण व सोडत सुधारित कार्यक्रम

दिनांक :- 04/11/2016                                                                वृ.क्र.701 रायगड जिल्हा परिषद प्रभाग रचना,  आरक्षण व सोडत सुधारित कार्यक्रम अलिबाग दि.04 (जिमाका) रायगड जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 15 पंचायत समित्याच्या सार्वत्रिक निवडणुका 2017 करिता प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे.   पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यामुळे त्यात समाविष्ट असलेली 29 गावे वगळावी लागल्यामुळे यापूर्वी जाहिर करण्यात आलेला प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 1) प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती करिता आरक्षणासह) विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करणे  (जिल्हा परिषद क्षेत्राची निवडणूक विभागामध्ये व पंचायत समिती क्षेत्राची निर्वाचक गणामध्ये विभागणी करुन) सादर करण्याचा दिनांक मंगळवार दि. 8 नोव्हेंबर 2016 पर्यंत.  2) प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे शुक्रवार दि.11 नोव्हेंबर 2016 पर्यंत.   3) आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसि