नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक ------ प्रसार माध्यमावर सनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

दिनांक:-5 नोव्हेंबर 2016                                                                      वृत्त क्र.707
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक
------
प्रसार माध्यमावर सनियंत्रण ठेवण्यासाठी
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

अलिबाग,दि.5:-(जिमाका)रायगड जिल्हयातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका आणि नगरपरिषद अध्यक्षांची थेट निवडणूक कार्यक्रम 2016-17 करिता प्रसार माध्यमावर सनियंत्रण ठेवण्यासाठी  जिल्हाधिकारी, रायगड यांच्या अध्यक्षतेखाली समिती  स्थापन  करण्यात आली आहे.
या समितीचे सदस्य पुढील प्रमाणे आहेत. अपर जिल्हाधिकारी, रायगड, पोलिस उपअधिक्षक(गृह),अलिबाग, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचा नामनिर्देशित प्रतिनिधी, संबंधित प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी,संबंधित तहसिलदार अथवा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
या समितीचे कामकाज पुढीलप्रमाणे राहील.राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर केल्यावर सदर समिती एक वार्ताहार परिषद घेऊन तसेच वृत्तपत्रामध्ये जाहीर सूचना देऊन निवडणुकांमध्ये होणाऱ्या पेड न्यूज म्हणजे काय याची माहिती सर्व संबंधितांना देईल. तसेच अशाप्रकारे पेड न्यूजबाबत आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्याकरीता जाहिरात समितीचे गठन केलेले आहे हे सर्वांच्या निदर्शनास आणेल.
सदर समिती संबंधित जिल्हयात प्रसिद्ध होणाऱ्या/वितरीत होणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूज यामध्ये मोडणाऱ्या बातम्या निवडणुकीच्या कालावधीत प्रसिद्ध होत आहेत. या संदर्भात तक्रार आल्यास अशा तक्रारींच्या अनुषंगाने त्या पेड न्यूज या सदराखाली मोडतात किंवा कसे याची छाननी करेल. एखादी राजकीय जाहिरात/उमेदवाराची बातमी पेड न्यूजच्या स्वरुपात असल्याचे समितीचे मत झाल्यास या बातमीवर, जाहिरातीवर झालेला खर्च उमेदवारांच्या खर्चात का समाविष्ट करण्यात येऊ नये अशी नोटीस संबंधित  पक्ष, उमेदवार यांना देईल. या समितीकडे संबंधित पक्ष,उमेदवार तसेच प्रसार माध्यम यांनी आपली बाजू लेखी स्वरुपात मांडल्यानंतर समिती या संदर्भात अंतिम निर्णय घेईल. एखादी बातमी पेड न्यूज आहे असे समितीचे मत झाल्यास या पेड न्यूजवर झालेला खर्च संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करण्याबाबत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवेल.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक