Posts

Showing posts from November 5, 2023

चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी झाली राज्यस्तरीय रंगीत तालीम जिल्ह्यातील वरसोली, केंवाग तांडा, नाव्हा-शेवा,मुरुड,श्रीवर्धन,दिवेआगर,दासगाव गावांचा समावेश

    रायगड (जिमाका) दि.9:- : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वरसोली (आरसीएफ कॉलनी कुरुळ), उरण तालुका केगाव तांडा, पनवेल तालुका नाव्हा-शेवा, ता.मुरुड, ता.श्रीवर्धन, दिवेआगर, ता.श्रीवर्धन, दासगाव, ता.महाड या 7 गावांमध्ये व आर.सी.एफ.थळ, ता.अलिबाग, ओ.एन.जी.सी.कंपनी ता.उरण, पाताळगंगा एमआयडीसी पार्क/रसायनी, उरण गॅस पॉवर प्लांट ता. उरण  या 4 कंपन्यामध्ये, तसेच धरमतर, रेवदंडा, ता.अलिबाग, उलवे ता.पनवेल, दिघी ता.श्रीवर्धन व इतर मासेमारी जेट्टीच्या ठिकाणी वादळवामध्ये अडकलेल्या मच्छिमारांच्या शोध व बचावाचे कार्य करणे अनुषंगाने आज चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी रंगीत तालीम झाली. महसूल, ग्रामविकास, पोलीस, आरोग्य, पाटबंधारे, अग्नीशमन, इंडस्ट्रीयल सेफ्टी ॲण्ड हेल्थ, मत्स्यविभाग, राज्य परिवहन, सार्वजनिक बांधकाम, आपदा मित्र, भारतीय तटरक्षक, मेरीटाईम, एनडीआरएफ आदी प्रमुख विभागांनी आपली सज्जता यावेळी दाखविली.             चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय स्तरावर दोन वेळा बैठक घेऊन विविध विभागांना सूचना देण्यात आल्या

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

    रायगड(जिमाका)दि.9:- राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत ,  त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणान्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक/ शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. सन 2021-22 पासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सुद्धा सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन 2021-22 पासून पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 पर्यंत लागू ठेवण्य

पेण येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज सादर करावेत

               रायगड(जिमाका)दि.9:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरून हवे असतील त्यांनी दि.21 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, पत्याचा पुरवा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.21 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि.22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये घालून कार्यालयात जमा करावा. अतिरिक्त धनाकर्षण कमीत कमी 301 रु. चा असावा त्यापेक्षा कमी रकमेच्या धनाकर्षणचा विचार केला जाणार नाही.  या अर्जांसाठी त्याच दिवशी दुपारी 4.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन

जिल्ह्यातील माजी सैनिकांचे अभिलेख्यामधील कुणबी नोंदीच्या तपासणीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन

                 रायगड(जिमाका)दि.9:- रायगड जिल्हयामधील सर्व सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, वीधवा, वीर माता,  वीर पिता, वीर पत्नी व अवलंबीतांना आपल्या जवळ असलेल्या शैक्षणिक  कागदपत्रांमध्ये तसेच सैन्यामधील अभिलेख्यांमध्ये हिंदू मराठा कुणबी या जातीच्या नोंदीबाबत काही उल्लेख आढळून आल्यास दि. 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 02141-222208 वर त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गोविंदराव साळूंखे यांनी केले आहे. ०००००००

इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन कटीबद्ध-- महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

  रायगड (जिमाका) दि.9 :- इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यात येतील असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.  महिला व बालविकास विभाग आणि जसलोक हॉस्पिटल यांच्या सौजन्याने इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या बालकांची आरोग्य तपासणी व आरोग्य किट वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  यावेळी विभागीय उपायुक्त श्रीमती सुवर्णा पवार, कर्जत प्रांताधिकारी अजित नैराळे, तहसिलदार आयुब तांबोळी, ण प्रकल्प अधिकारी,आदिवासी विकास विभाग पेण श्रीमती शशिकला अहिरराव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  विनीत म्हात्रे, जिल्हा परिवीक्षा अधिकारी अशोक पाटील, परिवीक्षा अधिकारी योगीराज जाधव, संरक्षण अधिकारी दीप्ती रामरामे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती अपेक्षा कारेकर, चौक सरपंच श्रीमती रितू  ठोंबरे, वसांबे सरपंच उमताई मुंढे, तसेच जसलोक रुग्णालयाचे सीइओ  जितेंद्र हरियान व त्यांची आरोग्य टीम उपस्थित होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती  तटकरे म्हणाल्या की, इर्शाळवाडी दुर्घटना हा एक

सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग क्षेत्राच्या समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य --मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड उद्योजकांसाठी एमएसएमई विकासावरील कार्यशाळा संपन्न

    रायगड(जिमाका),दि.8:-  राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणेसाठी सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग (एमएसएमई) क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्राधान्य देत आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी केले.    अलिबाग येथे  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज  “ IGNITE Maharashtra ”  या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उज्ज्वला बाणखेले,  जिल्हा कौशल्य विकास अधिकारी अमिता पवार, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक मुकेश कुमार,  अग्रीम बँक व्यवस्थापक विजय कुलकर्णी,  रायगड अलिबाग जिल्हा निर्यात प्रचालन समिती सचिव तथा महाव्यवस्थापक जी एस हराळ्या यासह जिल्हयातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.        उद्योगाच्या विकासाकरीता सर्व योजनांची माहित

केंद्र सरकारच्या योजनांच्या माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे प्रदर्शन उपयुक्त - प्रशांत ठाकूर खारघर येथील मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन, नागरिकांचा जोरदार प्रतिसाद

  रायगड जिमाका दि. 7 भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोमार्फत आयोजित 'भारत सरकार : 9 वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष' या विषयावरील मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन आज पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. नवी मुंबईतील खारघर परिसरात लिटल वर्ल्ड मॉल येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले असून 7, 8 आणि 9 नोव्हेंबरदरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. केंद्र सरकारमार्फत गेल्या 9 वर्षांत राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम यांच्याबाबत माहिती चित्रे आणि डिजिटल स्वरुपात दाखवण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी नवी मुंबई टपाल कार्यालयाचे वरीष्ठ अधीक्षक नितीन येवला नायब तहसीलदार संजय भालेराव, पनवेलच्या बालविकास प्रकल्प अधिकारी सुहिता ओव्हाळ, उद्योजक कांतीभाई पटेल, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, अविनाश कोळी, केंद्रीय संचार ब्युरोचे पुणे विभागाचे उपसंचालक निखिल देशमुख, प्रसिद्धी अधिकारी हर्षल आकुडे, प्रसिद्धी सहायक पी. कुमार यांच्यासह पनवेल

माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी यांना महासैनिक पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

रायगड जिमाका दि. 7--सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यातर्फे सर्व डाटा डिजीटलायजेशन /संगणकीकरण करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी रायगड जिल्हयामधील सर्व माजी सैनिक आणि माजी सैनिक विधवा पत्नींना व अवलंबिताना www.mahasainik.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी.   नोंदणी न केलेल्या सैनिक आणि संबंधित यांना महाराष्ट्र राज्यात देण्यात येणाऱ्या सुविधा मिळणार नाहीत. या नोंदणीसाठी माजी सैनिकांना  रु. 100  शुल्क आकारण्यात येणार आहे, तर माजी सैनिक विधवा व अवलंबिताना हे शुल्क माफ आहे. नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे  १) फोटो २) आधारकार्ड ३) पॅनकार्ड ४) बैंक पास बुकचे पहिल्या पानाची छायांकीत प्रत ई) सैन्यसेवा पुस्तक सर्व पृष्ठांची छायांकित प्रत उ) पीपीओ. ऊ) माजी सैनिक ओळखपत्र ए) ECHS कार्ड ऐ)पेंशन बैंक पासबुक पहीले पृष्ठ तरी सर्वांनी महासैनिक पोर्टलवर आपले नोंदणी करून घ्यावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग ले. कर्नल राहुल बैजनाथ माने (निवृत)  यांनी केले आहे.

रायगड जिल्हयामध्ये दि. ०९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

रायगड जिमाका दि. 7---महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्हयामध्ये दि. ०९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  न्यायाधिश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्री. अमोल अ. शिंदे यांनी दिली.  या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत यांच्या कडील घरपट्टी, पाणी पट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे  तडजोडीसाठी ठेवण्यात येतात.  या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी अदालतीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. ए. एस. राजदेकर, जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रा

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांमुळे दिवेआगार येथे सुपारी संशोधन (विस्तारित) केंद्र केंद्रासाठी २ हेक्टर जमीन, ५ कोटी ६४ रुपये खर्चास मान्यता

  रायगड (जिमाका) , दि .७:--  जिल्हयामधील श्रीवर्धन आणि नजीकच्या तालुक्यामधील सुपारी हे अत्यंत महत्वाचे व व्यापारी तत्वावर घेण्यात येणारे नगदी बागायती पीक आहे. या पिकास प्रोत्साहन देण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत सुपारी संशोधन (विस्तारित) केंद्र निर्माण करण्याची मागणी केली होती. त्याच्या प्रयत्नांमुळे श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे २ हेक्टर जमीनीवर विस्तारित केंद्रास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच ५ कोटी ६४ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.  सुपारी संशोधन विस्तारित केंद्राबाबत कृषि मंत्री धनंजय मुंडे  यांचे अध्यक्षतेखाली व  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत  बैठक झाली होती. या बैठकीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत दिवेआगार येथे सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणाला मान्यता देण्यात आली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत दिवेआगार येथील सुपारी संशोधन केंद्र निर्मितीमुळे  सुपारी पिकावरील संशोधनास चालना मिळेल. सुपारीच्या बुटक्या, त

उद्योजकांसाठी अलिबाग येथे बुधवारी कार्यशाळा उद्योग संचालनालयामार्फत एमएसएमई विकासाकरिता आयोजन

  रायगड (जिमाका), दि. 6 :- सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग (एमएसएमई) क्षेत्रासंदर्भात 8 नोव्हेंबर 2023 रोजी अलिबाग येथे आयोजित “IGNITE Maharashtra” या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात उद्योजकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योग संचालनालयामार्फत राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी उद्योजकांसाठी भागधारकांसोबत होणाऱ्या या कार्यशाळेत रायगड जिल्हयातील सुमारे 200 उद्योजक उपस्थित राहणार आहेत. राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणेसाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबवत आहेत. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांच्या सहकार्याने एक दिवसीय कार्

खारघरमध्ये केंद्रीय संचार ब्युरोमार्फत मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन केंद्र सरकारच्या विविध सरकारी योजना, उपक्रम यांची माहिती मिळवण्याची संधी

रायगड दि. 6-- भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोमार्फत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने नवी मुंबईतील लिटल वर्ल्ड मॉल, खारघर येथे मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवार, दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता होणार असून येथे येत्या 7, 8 आणि 9 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील. सदर मल्टीमीडिया प्रदर्शनात केंद्र सरकारमार्फत गेल्या 9 वर्षांत राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम यांच्याबाबत माहिती चित्रे आणि डिजिटल स्वरुपात दाखवण्यात येईल. भारतीय टपाल विभागांच्या विविध योजना आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षसंदर्भात माहितीही यामध्ये मिळेल. सोबतच स्थानिक तहसील कार्यालयामार्फत मतदार नोंदणी शिबीरही यावेळी राबवण्यात येईल. पनवेल आणि खारघर परिसरातील नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मिळून त्याचा लाभ घेता यावा, हा या प्रदर्शनाचा हेतू आहे. मल्टीमीडिया प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले

दिवाळी सणानिमित्त आयोजित प्रदर्शन उदघाटन संपन्न

रायगड  दि.4-- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत श्रीवर्धन, तळा,रोहा तालुक्यात आयोजित दिवाळी सणानिमित विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे  यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.       श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पचेतन  व श्रीवर्धन तालुक्यात पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात त्याच प्रमाणे तळा तालुक्यांतील मुख्य बाजार पेठेत आणि रोहा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात अश्या चार ठिकाणी हे प्रदर्शन सुरु आहे. ८० स्वयंसहायता समूहांनी या मध्ये सहभाग घेतला आहे.  दिवाळी फराळ,पणत्या, कंदील,विविध प्रकारचे मसाले व विविध प्रकारचे लाडू काजूगर ,नाचणी लाडू, खजूर लाडू इमिटेशन ज्वेलरी, रेडीमेड ड्रेस मटेरियल, साडीज मातीची भांडी, इत्यादी विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेले आहेत.        यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री कु अदिती तटकरे यांनी सांगितले, पुढील काळात महीला स्वयं सहाय्यता समुहाच्या उत्पादनासाठी कायम स्वरूपी विक्री साठी तसेच ऑनलाइन पद्धतीने वस्तूची विक्री करण्यासाठी महिलांना प्रोसाहित करण्यात येईल असे सांगितले.        या कार्यक्रमास श्रीमती प्रिय

रायगड जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू जिल्हाधिकारी कार्यालयात "विशेष कक्ष" कार्यान्वित

     रायगड ,दि.4(जिमाका)- मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहीमे प्रमाणे संपूर्ण राज्यात ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यासाठी "स्वतंत्र कक्ष" कार्यान्वित करण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यात जुन्या शासकीय दस्तावेजची तपासणी तसेच मराठा- कुणबी नोंदी शोधण्यात येत आहेत. रायगड जिल्हा महसूल प्रशासन जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा महसूल दप्तरी असलेल्या नोंदी, कागदपत्रे तपासणी आणि उपलब्ध कागदपत्रे याची निर्दोष यादी तयार करण्यासाठी कार्यान्वित झाली आहे.  विशेष कक्षाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) विठ्ठल इनामदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार आणि महसूल कर्मचारी काम करीत आहेत. जिल्हाधिकारी डॉ म्हसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी या मोहिमेवर विशेष लक्ष ठेवून आहेत. या कक्षामार्फत  शासनाला मरा

दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या पाल्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचे निर्देश--- महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे

  रायगड (जिमाका)दि. 4- महाड तालुक्यातील बिरवाडी  येथील ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीमध्ये आग लागल्याने झालेल्या दुर्घटने मधील मृत कामगारांच्या पाल्यांना बालसंगोपन योजनेचा तात्काळ लाभ देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिले. ब्ल्यू जेट  रासायनिक कंपनीतील स्फोटाने झालेल्या दुर्घटनेची सविस्तर माहिती कु. तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतली. या दुर्घटनेतील 11 लोक बेपत्ता आहेत. यापैकी 7 मृतदेह मिळाले असून उर्वरित लोकांचा शोध सुरु आहे. या दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या पाल्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले. या योजनेतंर्गत  प्रती बालक दरमहा 2 हजार 250 रु   परिपोषण अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अनुदानातून बालकांना अन्न, वस्त्र,निवारा, शिक्षण, वैद्यकीय सुविधा इ. सुविधा पुरविण्यात येतात.

दुर्घटनाग्रस्त व्यक्तींच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ब्ल्य-ूजेट रासायनिक कंपनीत एनडीआरएफचे मदत कार्य सुरू

  रायगड,  (जिमाका) दि. 4:--रासायनिक कंपनीतील स्फोटाने दुर्घटनाग्रस्त झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त मदत देण्यात येईल, असे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच दुर्घटनाग्रस्त कंपनीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)च्या सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी केली. महाड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) उद्योग क्षेत्रातील ब्ल्यू जेट  रासायनिक कंपनीतील स्फोटाने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते .यावेळी घटनास्थळावर आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे , जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यासह अग्निशमन पोलीस एनडीआरएफ चे अधिकारी व जवान तसेच कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित होते  भेट दिल्यानंतर प्रशासनाकडून व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.जे व्यक्ती दुर्घटनाग्रस्त आहेत ती नावे जाहीर झाल्यानंतर , त्यांच्या नातेवाईकांना  मदत दिली जाणार आहे. यावेळी नातेवाईकांची विचारपूस करून त्यांना दिलासा दि