उद्योजकांसाठी अलिबाग येथे बुधवारी कार्यशाळा उद्योग संचालनालयामार्फत एमएसएमई विकासाकरिता आयोजन

 


रायगड (जिमाका), दि. 6 :- सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग (एमएसएमई) क्षेत्रासंदर्भात 8 नोव्हेंबर 2023 रोजी अलिबाग येथे आयोजित “IGNITE Maharashtra” या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात उद्योजकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योग संचालनालयामार्फत राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी उद्योजकांसाठी भागधारकांसोबत होणाऱ्या या कार्यशाळेत रायगड जिल्हयातील सुमारे 200 उद्योजक उपस्थित राहणार आहेत.

राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणेसाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबवत आहेत. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांच्या सहकार्याने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रीया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातीसंबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँक इत्यादींना आमंत्रित करण्यात आलेले आहे, असे महाव्यवस्थापक तथा सचिव, जिल्हा निर्यात प्रचालन समिती, रायगड अलिबाग यांनी कळविले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक