Posts

Showing posts from January 29, 2023

“महाआरोग्य योजना-सार्वजनिक आरोग्य योजना व कार्यक्रम” (भाग-1)

    आरोग्य सेवांचा मूळ उद्देश आरोग्य सुधारणे हा असून, लोकांचे जीवनमान सुधारावे व निरोगीपणे जगता यावे यासाठी, आरोग्य शिक्षण व सेवा यावर भर देण्यात आला आहे. आरोग्य सेवा ही सामाजिक आरोग्य क्षेत्र, यात प्राथमिक आरोग्य सेवा, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचाही समावेश होतो. या माध्यमातून लोकांना आरोग्य सेवांची उपलब्धता करून देण्यात येते. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून शासनाच्या वतीने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध योजना आखण्यात आलेल्या आहेत. या आरोग्य सेवा अधिकाधिक लोकाभिमुख झाल्यास लोकांना चांगले आरोग्य लाभून समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. सामाजिक क्षेत्राबरोबरच स्वयंसेवी संस्था व खाजगी क्षेत्र या माध्यमातून अंगीकृत रुग्णालयातून आपल्या सेवा या देत असतात, त्या सेवांशीही शासन सामाजिक आरोग्य क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न करीत आलेले आहे. निरोगी महाराष्ट्राच्या दृष्टीने विविध महाआरोग्य योजना सामान्य माणसासाठी शासनाच्या वतीने साकारलेल्या आहेत.  या लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन लोकांनी त्याचा अधिकाध

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी- विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर

  अलिबाग, दि.2 (जिमाका) : कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.     विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी दि. 30 जानेवारी रोजी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज नवी मुंबईतील नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या देखरेखीखाली पार पडली यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून विशाल सोलंकी उपस्थित होते. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड चे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, पालघर चे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपायुक्त मनोज रानडे आदी उपस्थित होते. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. एकूण 99 मतपेट्या मध्ये मतपत्रिका होत्या. मतमोजणी साठी एकूण 28 टेबले ठेवण्यात आली होती. या निवडणुकीत एकूण   35069 मतदारांन

महाराष्ट्र शासनाच्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याच्या कालावधीस मुदतवाढ

  अलिबाग,दि.2(जिमाका):- मराठी भाषेतील उत्कृष्ट बाय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वा पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका पूर्वीच्या जाहिरातीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 01 जानेवारी ते दि.31 जानेवारी 2023 पर्यंत पाठविता येणार होत्या. तथापि, या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात येत असून आता या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दि. 02 मार्च 2023 हा राहील. दि. 01 जानेवारी 2022 ते दि.31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्य

संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची तयारी सुरू 7 कोटी 61 लाख‌ रुपये खर्चाचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार 1 हजार 328 गावे, वाड्यांचा आराखड्यात समावेश

    अलिबाग,दि.2(जिमाका) :- रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. तसेच पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी 7 कोटी 61 लाख 58 हजार रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करुन मंजूरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. या आराखड्यात 1 हजार 328 गावे व वड्यांवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील काही गावांना एप्रिल, मे महिन्यात दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभमीवर प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून, जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात विहिरी खोल करणे त्यामधील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे, नवीन विंधन विहीर खोदणे, विंधन विहीर दुरुस्ती करणे, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 1

रायगड जिल्हा कृषी महोत्सव-2023 कृषी महोत्सवास जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी भेट द्यावी --जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले

  अलिबाग,दि.2(जिमाका):- दि.09 फेब्रुवारी ते दि.13 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये सेक्टर 27, सिडको मैदान, खांदेश्वर रेल्वे स्टेशन जवळ, कामोठे, पनवेल येथे रायगड जिल्हा कृषी महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या रायगड जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023, शासनाच्या विविध कृषी योजना/उपक्रमांची माहिती, कृषी तंत्रज्ञान, नाविण्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषी पूरक व्यवसाय इत्यादी बाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद, प्रात्याक्षिके, कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी/उद्योजकांची व्याखाने, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य, कडधान्ये व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सव इत्यादीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रायगड जिल्हा कृषी महोत्सवास जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे. ०००००००

पनवेल येथे व्यवसाय सुलभीकरण कार्यशाळा संपन्न

    अलिबाग,दि.2(जिमाका):- जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पनवेल येथे व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business) एकदिवशीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या, पनवेल सहकारी औद्योगिक वसाहत पनवेल श्री.विजयकुमार लोखंडे, EODB श्री.सरीम खान, MAITRI श्रीमती अमषा शेट्टी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ श्री.व्ही.व्ही.किल्लेदार,   सहाय्यक आयुक्त कामगार श्री.समीर चव्हाण,   महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ श्री. ठाकूर इत्यादी सह जिल्ह्यातील सुमारे 60 ते 70 उद्योजक उपस्थित होते. महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त मोठे व विशाल उद्योग असून 12 हजार पेक्षा जास्त सूक्ष्म, लघु व मध्यम उत्पादन उद्योग   कार्यरत असून 8 ते 9 महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ क्षेत्रे 3 सहकारी औद्योगिक वसाहती कार्यरत आहेत. रायगड जिल्हा औद्योगिकदृष्टया महाराष्ट्रातील एक मोठा जिल्हा असून जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूकीकरिता मोठा वाव आहे.   तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आजपर्यंत 200 पेक्षा जास्त नव उद्यो

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

    अलिबाग,दि.2(जिमाका):- शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान केले जातात. पूर्वी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास दि.16 जानेवारी ते दि.30 जानेवारी 2023 अशी मुदत देण्यात आली होती. तथापि या कालावधीत असलेल्या खेलो इंडिया व इतर स्पर्धांच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण शिबीर व स्पर्धा यासाठी अर्ज करण्यास पुरेशा कालावधी न मिळाल्याने पुरस्कार अर्ज सादर करण्यास 20 दिवसांची मुदतवाढ मिळावी, यासाठी राज्यातील विविध क्रीडा संघटना व खेळाडूंनी शासनास विनंती केली होती. त्यानुसार शासनाने विनंतीचा व वस्तुस्थितीचा सर्वकष विचार करुन दि.20 फेब्रुवारी 2023 पर्यंत कार्यालयीन

भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाईन तयार

    अलिबाग,दि.2(जिमाका):- मागील काही दशकांमध्ये भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. आकडेवारीवरून असे दिसून येते की, ही वाढ एक मोठी आवाहन ठरणार आहे.   अशा प्रकारे शहरी व ग्रामीण भागातील जेष्ठांना विशेष सेवा पुरवण्यासाठी नवीन मॉडेल्सची आवश्यकता आहे, याचसाठी सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय हेल्पलाईन (ELDERLINE-14567) सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी नॅशनल इम्प्लीमेंटीग ऐजन्सी (NIA), राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था (NISD), सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष साह्य मंत्रालय, महाराष्ट्र शासन व जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून आपल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी जेष्ठ नागरीक राष्ट्रीय हेल्पलाईन-14567 (NATIONAL HELPLINE FOR SENIOR CITIZENS-14567 सुरु आहे. राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन महाराष्ट्र राज्य म्हणून श्री.स्मितेश शहा हे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. श्रीमती रेखा आनंद (टीम लीडर), श्री.हणमंत धुमाळ (टीम लीडर) म्हणून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागिर

महाड येथे आपदा मित्र प्रशिक्षणाच्या दुसरे सत्र सुरु 69 प्रशिक्षणार्थ्यांनी घेतला सहभाग

    अलिबाग,दि.1(जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड येथे  आपदा मित्र प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्र दि.31 जानेवारी 2023 रोजी उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण दल एम.व्ही.म्हात्रे. श्री शिरसाठ व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सतीश ठिगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या प्रशिक्षणास 69 प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत. 0000000

संयुक्त संरक्षण सेवा (CDS) परीक्षा पूर्वतयारी अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा

  अलिबाग,दि.1(जिमाका):-  संयुक्त संरक्षण सेवा (CDS) परीक्षेची तयारी करण्यासाठी, महाराष्ट्र शासनातर्फे संयुक्त संरक्षण सेवा  ( CDS) अभ्यासक्रम क्रमांक 60 हा महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी प्री-कॅडेट प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि. 01 फेब्रुवारी ते दि.9 एप्रिल 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन व प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, प्री-कॅडेट प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे फोन नंबर 0253-2451032, 09130271626 या क्रमांकावर संपर्क साधावा, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. 0000000

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील सूवर्णसंधी

  अलिबाग,दि.1(जिमाका):-  सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण   संस्था (मुलींसाठी), नाशिक या शासकीय संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे.  या संस्थेतील प्रथम तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी पात्रता-  अविवाहित (मुलगी), महाराष्ट्र बेळगाव कारवार बिदर येथील मध्ये माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारी, जून-2023 मध्ये इयत्ता 11 वी प्रवेश घेण्यासाठी असावी. शारीरिक पात्रता-  सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या निकषांसाठी पात्र असावी, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नॅशनल डिफेन्स ॲकडमी/नेव्हल ॲकडमीकरिता जे निकष आहेत ते असावेत.   जसे की, उंची 152 सें.मी., वजन 42.5 कि.ग्रा., रातांधळेपणा  किंवा रंगांधळेपणा नसावा, प्रवेशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नॅशनल डिफेन्स ॲकडमी/नेव्हल ॲकडमीतील प्रवेशाकरिता जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार डोळयांची क्षमता असावी (eye power). लेखी परीक्षा आणि मुलाखत उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी दि.09 एप्रिल 2023 रोजी साधारणतः इयत्ता  10 वीच्या बोर्ड सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रत्येक योग्य उत्तराला गुण मिळेल. यशस्वी परीक्षार्थीना मुलाखती

जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी फूटबॉल स्पर्धेत सहभागी व्हावे -- जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक

    अलिबाग,दि.1(जिमाका):-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच फुटबॉल क्लब बायर्न, म्युनिच, जर्मनी यां च्या  मध्ये महाराष्ट्र राज्यातील फुटबॉल खेळाचा प्रचार विकास होण्यासाठी करार झाला आहे. त्या अंतर्गत शालेय  14  वर्षाखालील मुलांसाठी  “ एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप ”   राज्यस्तर फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.  या  करारानुसार या स्पर्धेतून राज्यातून  20  खेळाडू  म्युनिच, जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहेत.             या  20  खेळाडूंची क्रीडाराज्यस्तर स्पर्धेपूर्वी जिल्हास्तर व विभागस्तर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजयी संघ विभाग/राज्य स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करेल व हारलेल्या संघातून उत्कृष्ट  5  खेळाडू पुढीलस्तरावर निवड चाचणीसाठी निवडले जातील.             जिल्हा क्रीडा परिषद, रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड आणि रायगड जिल्हा ॲमच्युर फुटबॉल असोशियशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर  “ एफ.सी.बायर्न कप ”  14 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- वयोगट व जन्मदिनांक  -  14 वर्ष मुले फक

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

    अलिबाग,दि.1(जिमाका):-  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा कुष्ठरोग रायगड अलिबाग व माणुसकी प्रतिष्ठान, जितनगर अलिबाग महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यामध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवड्याची सुरुवात रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करून आणि अलिबाग शहरांमध्ये पाच किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेस (दि.30 जानेवारी 2023) हिरवा झेंडा दाखवून संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला व  स्पर्धा पूर्ण केली. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ.प्रताप शिंदे, समुदाय आरोग्य अधिकारी श्री.भगवान जाधव, वैद्यकीय सहाय्यक श्री.राजकुमार गाजुलवार, निमवैद्यकीय कर्मचारी, कनिष्ठ लिपिक श्री.तेजस मोरे, श्री. शशिकांत शिर्के उपस्थित होते.  सहायक संचालक कुष्ठरोग डॉ.प्रताप शिंदे यांनी सर्वांना कुष्ठरोगाबाबत माहिती देऊन जनजागृती  केली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रशस्तीप

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यांकरिता पिल्लई कॉलेज नवीन पनवेल येथे शिकाऊ उमेदवारांकरिता कार्यशाळेचे आयोजन

    अलिबाग,दि.31(जिमाका):-कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याद्वारे शिकाऊ उमेदवारी व राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजना या संदर्भातील विविध सुधारणा विचारात घेऊन या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे तसेच योजनेच्या प्रचार प्रसाराकरीता जिल्हास्तरावर " Apprenticeship Awareness Workshop" आयोजित करण्यात आली आहे.        रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यांकरिता दि. 02 फेब्रुवारी 2023 रोजी पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनियरींग (ॲटोन (मस), सेक्टर-16, नवीन पनवेल येथे सकाळी 9.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये संबधित सहभागधारक जसे विविध क्षेत्रातील उद्योग व आस्थापना, शैक्षणिक संस्था, सेक्टर स्कील कॉन्सिल्स प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) अंतर्गत येणाऱ्या प्रशिक्षण संस्था इत्यादींना आमंत्रित करण्यात येणार आहे.         तरी इच्छुक सहभाग धारकांनी ( https://forms.gle/ uwDTS31kdi1V7Lwn6 ) या गुगल लिंकवर माहिती भरुन दि. 01 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे, असे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मु

जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर येथे सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

Image
    अलिबाग,दि.3(जिमाका):- जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर ता.माणगाव येथे इयत्ता सहावी प्रवेशासाठी  https://cbseitms.rcil.gov.in/ nvs/  या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म भरण्यास दि.8 फेब्रुवारी 2023 पर्यंत  मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास दिलेल्या मुदतवाढीचा विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी लाभ घ्यावा आणि जिल्ह्यातून अधिकाधिक संख्येने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन प्राचार्य, के.वाय.इंगळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री.संतोष आर. चिंचकर, मो.9881351601, श्री.सतीश जमदाडे, मो.9890343452/9284669382,  श्री.केदार र. केंद्रेकर, मो.9423113276/7038215346 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ०००००००

सुंदरराव मोरे महाविद्यालयात “चला जाणूया नदीला” अभियानानिमित्त जलदिंडी आणि जलपूजन कार्यक्रम संपन्न

  अलिबाग,दि.31 (जिमाका):-     भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने  “  चला जाणूया नदीला ”  हे अभियान जिल्हाधिकारी  डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व  महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, पोलादपूर तहसिलदार श्रीमती दिप्ती देसाई यांच्या सूचनेनुसार सुंदरराव मोरे महाविद्यालय पोलादपूर येथे जलदिंडी आणि जलपूजन कार्यक्रम संपन्न झाला. “ चला जाणूया नदीला ”  या अभियानानिमित्त महाड महसूल विभाग, शिक्षणाधिकारी, वनविभाग महाड तर्फे हिरवळ प्रतिष्ठान या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या सहकार्याने पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, लघुपट सादरीकरण, जलदिंडी व जलपूजन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पोलादपूरचे परिवीक्षाधीन तहसिलदार श्री.विनायक घुमरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ भाग्यरेखा पाटील, उपप्राचार्य प्रा.सुनिल बलखंडे, हिरवळ संस्थचे श्री.जय अंबुर्ले, श्री.गणेश कुरडूनकर, श्री.कुणाल गुरव, वनविभागाच्या अधिकारी श्रीमती प्रियंका जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. क

जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी चवदार तळे येथे भेट देवून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले अभिवादन रायगड विकास प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या किल्ल्यावरील विविध विकासकामांची केली पाहणी

Image
    अलिबाग,दि.30 (जिमाका):-   रायगड जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी महाड तालुक्यातील चवदार तळे येथे शुक्रवार, दि.27 जानेवारी रोजी भेट देऊन महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशीद, महाड नगरपरिषद मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलादपूर तहसिलदार दीप्ती देसाई, सुधीर शेठ हे उपस्थित होते. याशिवाय जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांनी महाड प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय येथेही भेट दिली. त्याचबरोबर रायगड विकास प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या रायगड किल्ल्यावरील विविध विकासकामांची जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी शनिवार, दि.28 जानेवारी रोजी पाहणी केली. या दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे सपत्नीक दर्शनही घेतले.   यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव सौ.स्वाती म्हसे-पाटील, महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशीद, कार्यकारी अभियंता महेश नामदे, सहाय्यक अभियंता श्री.स्वप्निल बुर्ल

हुतात्म्यांच्या स्मरणार्थ जिल्हा प्रशासनाकडून मौन (स्तब्धता) पाळून हुतात्मा दिन संपन्न

Image
    अलिबाग,दि.30 (जिमाका):-   देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दि. 30 जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हा प्रशासनाकडून सकाळी 11 वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता ) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात आला. यावेळी तहसिलदार   डॉ.सतिश कदम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ०००००००

“चला बोलू करिअर वर” या विषयावरील ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

    अलिबाग,दि.30 (जिमाका):-   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात येतात. सध्याच्या स्पर्धेच्या युगात योग्य नोकरी कशी मिळवावी, नोकरीसाठी अर्ज करताना कसा व कुठे करावा या सगळ्या प्रश्नांचे निरसन करण्याच्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड अलिबाग यांच्या वतीने “ चला बोलू करिअर वर ” या विषयावरील ऑनलाईन मार्गदर्शन सत्र दि.31 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता https://meet.google.com/sqr-ytej-cox , या गुगल मिट प्लॅटफॉर्म वर आयोजित केले आहे. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रांतर्गत या सत्रामध्ये ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता कार्यालयाचे यंग प्रोफेशनल, श्री.आशुतोष साळी हे सहभागी उमेदवारांना 12 वी/पदवी नंतर कोणता मार्ग निवडावा?, स्व-परिचयपत्र (Resume, CV, Bio Data) कसा बनवावा? मुलाखतीची तयारी कशी करावी? अशा नोकरीसंबधी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या ऑनलाईन मार्गद