पनवेल येथे व्यवसाय सुलभीकरण कार्यशाळा संपन्न

 


 

अलिबाग,दि.2(जिमाका):- जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पनवेल येथे व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business) एकदिवशीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या, पनवेल सहकारी औद्योगिक वसाहत पनवेल श्री.विजयकुमार लोखंडे, EODB श्री.सरीम खान, MAITRI श्रीमती अमषा शेट्टी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ श्री.व्ही.व्ही.किल्लेदार,  सहाय्यक आयुक्त कामगार श्री.समीर चव्हाण,  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ श्री. ठाकूर इत्यादी सह जिल्ह्यातील सुमारे 60 ते 70 उद्योजक उपस्थित होते.

महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त मोठे व विशाल उद्योग असून 12 हजार पेक्षा जास्त सूक्ष्म, लघु व मध्यम उत्पादन उद्योग  कार्यरत असून 8 ते 9 महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ क्षेत्रे 3 सहकारी औद्योगिक वसाहती कार्यरत आहेत. रायगड जिल्हा औद्योगिकदृष्टया महाराष्ट्रातील एक मोठा जिल्हा असून जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूकीकरिता मोठा वाव आहे.  तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आजपर्यंत 200 पेक्षा जास्त नव उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.

 या कार्यशाळेत उपस्थित व्यवसाय सुलभीकरण कक्षाचे सल्लागार श्री.सरीम खान यांनी माहिती तंत्रज्ञान पातळीवर व नियामक पातळीवर केल्या जाणाऱ्या विविध सुधारणांविषयी व शासनाच्या नवीन सुधारणांबाबतची माहिती तर श्रीमती आमषा शेट्टी यांनी मंत्री कक्षांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सुविधांविषयी सविस्तर सादरीकरणाव्दारे माहिती दिली.

या कार्यशाळेकरिता उपस्थित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कामगार विभाग, महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा विभाग यांनी व्यवसाय सुलभीकरणाविषयी उपस्थित उद्योजकांना माहिती दिली. तसेच उपस्थित उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक निरसन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, EODB व MAITRI टिम कडून करण्यात आले.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड