Posts

Showing posts from June 1, 2025

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते 61,125 कोटी रु जिल्हा पतपुरवठा पुस्तिकेचे अनावरण पीक कर्जाची मार्चअखेर 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करा--जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
                  रायगड जिमाका दि. 5:- रायगड जिल्ह्यातील बँकांनी मार्च 25 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात  प्राथमिकता क्षेत्रासाठी 8 हजार 800 कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे उद्दिष्ट असताना बँकानी 9 हजार 342 कोटी (106%)कर्ज वाटप झाल्याची माहिती देवून जिल्हाधिकारी  किशन जावळे यांनी सर्व cबँकांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, सर्व बँकांचा आणि सरकारी विभागांचा योग्य समन्वय असल्याने  मोठे उदिष्ट ही साध्य करता येते. असाच समन्वय आणि परस्पर सहकार्य या आर्थिक वर्षात सुद्धा पुढे चालू ठेवावे असे आवाहन जिल्हाधिकारी  किशन जावळे यांनी केले.               किसान क्रेडिट कार्डसाठी असणारे रू.625 कोटी उद्दिष्ट  प्रत्येक सरकारी,खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांनी 100 टक्के पूर्ण  करा.  तसेच  मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड देण्याला प्राधान्य द्या, असे सांगून बँकांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन...

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

  रायगड (जिमाका)दि.04:  वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड यामध्ये सन २०२५ साठीची प्रवेश प्रक्रिया दि. 15 मे 2025 पासून Online पद्धतीने सुरू झाली आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबतची प्रमाणित कार्यपद्धतीची माहितीपुस्तिका  http://www.admission.dvet.gov. in  या संकेतस्थळावर Online स्वरूपात उपलब्ध आहे: इच्छुक उमेदवारांनी 10  वी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण असले तरीही दि.15 मे 2025 पासून Online पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावा. प्रवेश घेतलेल्या पात्र प्रशिक्षणार्थ्यांना नियमानुसार दरमहा रु. 500 इतके विद्यावेतन दिले जाईल. विशेष सुविधा:इ. 10 वी व 12 वी समकक्षतेची सोयख्‍पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेशाची संधी प्राचार्य यांनी सूचित केले आहे की, उमेदवारांनी खालील बाबी विहित वेळेत पूर्ण कराव्यात प्रवेश अर्ज भरणे, अर्ज निश्चितीकरण करणे, व्यवसाय पसंती निवडणे. अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर व्यवसायाची पस...

दि.06 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन माजी प्रशिक्षणार्थी,त्यांचे पालक,नागरिकांनी उपस्थित रहावे,

रायगड(जिमाका)दि.04:-   वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,महाड येथे दि.06 जून 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सामाजिक समरसता या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. एन. एस. पुरकर यांनी केलेआहे.             या कार्यक्रमासाठी स्थानिकआमदार, लोक प्रतिनिधी, पत्रकार व इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. सदरील कार्यक्रम सोहळयाचे उदघाटन मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते Online पध्दतीने करण्यात येणार आहे. ००००००

शिवराज्याभिषेक सोहळा-2025 करिता जड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी

  रायगड(जिमाका)दि.04:- श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून दि.05 जून रोजी सायं.4.00 ते दि.06 जून 2025 रोजी रात्रौ 10.00 वाजेपर्यतच्या कालावधीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा नागोठणे ते कशेडी पर्यत तसेच  माणगांव-निजामपुर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला,  माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला,  महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावरील होणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतुक बंदी अधिसूचना जारी केली आहे. श्री शिवराज्याभिषेक सोहळा-2025 हा कार्यक्रम दि.05 जून  व दि.06 जून रोजी किल्ले रायगड येथे साजरा होणार आहॆ.  या कार्यक्रमासाठी  रायगड, पुणे, सातारा, कोल्हापुर, मुंबई वैगेरे ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने श्री शिवभक्त हे आपआपली वाहने घेवून येत असतात. तसेच सदर कार्यक्रमाकरीता आयोजकांच्या सामानाची वाहने देखील मोठ्या प्रमाणात श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येत असतात.  या सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त हे रायगड किल्ला येथे माणगांव-निजामपुर मार्गे पाचाड ते ...

शासकीय मुकबधिर विद्यालय,विद्यानगर-अलिबाग येथे मोफत प्रवेश सुरू

  रायगड (जिमाका) दि.3:- रायगड जिल्हा व कोकण विभागातील कर्णबधिर मुलां-मुलींच्या शिक्षणाच्या सोयीसाठी शासनाने विद्यानगर-अलिबाग येथे शासकीय मुकबधिर विद्यालय सुरू केले आहे.  या विद्यालयात 6 ते 16 वयोगटातील मुलां-मुर्लीच्या इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी अधिक्षक, शासकीय मुकबधिर विद्यालय, अलिबाग जि. रायगड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, डॉ.शामराव कदम  यांनी केले   आहे. या संस्थेत 06 ते 16वयोगटातील मुकबधिर मुलां-मुलींसाठी इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यतचे मोफत शिक्षण देण्यात येते. प्रवेशित मुलां-मुलीसाठी स्वतंत्र्य निवास व्यवस्था आहे. भोजन, वहया, पुस्तके व शैक्षणिक साधने आदी सुविधा विनामुल्य पुरविण्यात येतात. संपर्कासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक :- 9594313179 शिंदे सर (प्र.अधिक्षक),7030390020 वेखंडे सर, 997025345 बोरकर सर अधिक्षक शासकीय मुकबधिर विद्यालय अलिबाग जि.रायगड 00000

अलिबाग येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

  रायगड (जिमाका) दि.03 :- सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थीनींकरिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, दिव्या अपार्टमेंट, यामाहा शोरुम, आर.सी.एफ.गेटसमोर, वेश्वी अलिबाग येथे कार्यरत आहे.              या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरू, मागासवर्गीय अनु.जाती, अनु.जमाती , विमुक्त जाती व भटक्या जमाती,  इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग,आर्थिकदृष्या मागास, अनाथ व अपंग यांना गुणवत्तेनसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थींनीकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा-दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतुमानानुसार एक फळ व दुध तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण (डाळ, भात, चपाती, भाजी/उसळ, लोणचे पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मांसाहार) देण्यात येते.                अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके शैक्षणिक व लेखन साहित्य देखील विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा...