शासकीय मुकबधिर विद्यालय,विद्यानगर-अलिबाग येथे मोफत प्रवेश सुरू
रायगड (जिमाका) दि.3:- रायगड जिल्हा व कोकण विभागातील कर्णबधिर मुलां-मुलींच्या शिक्षणाच्या सोयीसाठी शासनाने विद्यानगर-अलिबाग येथे शासकीय मुकबधिर विद्यालय सुरू केले आहे. या विद्यालयात 6 ते 16 वयोगटातील मुलां-मुर्लीच्या इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी अधिक्षक, शासकीय मुकबधिर विद्यालय, अलिबाग जि. रायगड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, डॉ.शामराव कदम यांनी केले आहे.
या संस्थेत 06 ते 16वयोगटातील मुकबधिर मुलां-मुलींसाठी इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यतचे मोफत शिक्षण देण्यात येते. प्रवेशित मुलां-मुलीसाठी स्वतंत्र्य निवास व्यवस्था आहे. भोजन, वहया, पुस्तके व शैक्षणिक साधने आदी सुविधा विनामुल्य पुरविण्यात येतात.
संपर्कासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक :- 9594313179 शिंदे सर (प्र.अधिक्षक),7030390020 वेखंडे सर, 997025345 बोरकर सर अधिक्षक शासकीय मुकबधिर विद्यालय अलिबाग जि.रायगड
00000
Comments
Post a Comment