Posts

Showing posts from April 24, 2022

महाराष्ट्र दिनी सामाजिक न्याय विभाग उभारणार योजनांचा स्टॉल

    अलिबाग,दि.30 (जिमाका):- दि.1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते पोलीस ग्राऊंड अलिबाग येथे सकाळी 8.00 वा. मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे.   या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचा स्टॉल उभारण्यात येणार असून सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यान्वित असलेल्या योजनांची माहिती असणारे संक्षिप्त बॅनर लावण्यात येणार आहेत. समाज कल्याण आयुक्तालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणाऱ्या माहितीपत्रकाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच माहिती पत्रके सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका येथे वाटपासाठी पाठविण्यात आली आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडून ध्वजारोहण कार्यक्रमानंतर योजनांचे संक्षिप्त वाचन करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील मुख्य कार्यक्रम तसेच सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व नगरपालिका येथे होणाऱ्या कार्यक्रमांकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी सुनिल जाधव यांनी केले आहे. ००००

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

                  अलिबाग,दि.30 (जिमाका):- राज्यमंत्री उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांचा शनिवार, दि.30 एप्रिल 2022 रोजीचा रायगड जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे-                सकाळी 07.30 वा. अलिबाग येथून पोलीस परेड मैदानाकडे प्रयाण. सकाळी 8.00 वा. पोलीस परेड ग्राऊंड येथे आगमन व महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. कार्यक्रमानंतर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : पोलीस परेड ग्राऊंड मुख्यालय अलिबाग. सोईनुसार पोलीस परेड ग्राऊंड येथून आक्षी, ता.अलिबागकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. आक्षी येथे आगमन व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मराठी भाषा आद्य शिलालेख व परिसर सुशोभीकरण करणे भूमिपुजन कार्यक्रम. कार्यक्रमानंतर सुतारवाडी, ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. सुतारवाडी येथून मोटारीने रोहाकडे प्रयाण. सायं.4.00 वा. रोहा येथे आगमन व एन.जे.इंटरप्रायझेस फायन्सासियल प्रो.ड

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ

                अलिबाग, दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार, दि. 1 मे 2022 रोजी   रायगड पोलीस कवायत मैदान येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. सकाळी 8.00 वाजता राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे. 000000

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2022 ची आढावा बैठक संपन्न

अलिबाग, दि.29 (जिमाका):-   जवाहर नवोदय विद्यालय , निजामपुर रायगड येथे इयत्ता   6   वी वर्गाच्या प्रवेशासाठी दि .30   एप्रिल   2022   रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारी संदर्भातील आढावा बैठक दि .28   एप्रिल   2022   रोजी रायगड जिल्हा परिषद येथे संपन्न झाली. या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा परिषद, शिक्षण विभागाचे वरिष्ठ विस्तार अधिकारी श्री . संतोष राजाराम शेंडगे ,   माणगाव गटशिक्षणाधिकारी सौ . सुनिता खरात ,   जवाहर नवोदय विद्यालय ,   निजामपुरचे प्राचार्य श्री.के.वाय. इंगळे, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा   2022 चे प्रभारी श्री . संतोष चिंचकर यांची प्रमुख उपस्थिती तसेच रायगड जिल्ह्याच्या   15   तालुक्यातील केंद्र संचालक आणि केंद्र निरीक्षक म्हणून नवोदय विद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या बैठकीत परीक्षेचे स्वरूप आणि त्यासाठी आवश्यक पूर्वतयारी याची माहिती सर्व उपस्थित केंद्र संचालकांना देण्यात आली. तसेच यावेळी सर्वाधिक परीक्षार्थींची नोंद असणारे केंद्र म्हणून पनवेल तालुका आणि सर्वाधिक परीक्षार्थी टक्केवारी नोंद असणारे केंद्र म्हणून

तहसिलदार मीनल दळवी यांचे स्पर्धा विश्व अकॅडमीतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Image
    अलिबाग, दि.29 (जिमाका):-   बहुतांश विद्यार्थ्यांना 10 वी, 12 वी, पदवी परीक्षेनंतर पुढे काय करायचे, कशात करियर करायचे या समस्येला सामोरे जावे लागते. या   वयातील आणि अशा स्वरूपाच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता गेली काही वर्षे स्वयंसिद्धा संचलित स्पर्धा विश्व अकॅडेमी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम राबवित असून त्यांना विविध स्पर्धा परीक्षेसंदर्भात माहिती देवून अशा उमेदवारांना मदत करीत आहेत. आजपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील जवळपास 850 पेक्षा अधिक उमेदवारांना अभ्यासरूपी मेहनतीने व संस्थेच्या मार्गदर्शनामुळे सरकारी नोकरी मिळविता आली आहे. असे असले तरी आजही स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत जिल्ह्यातील बरेच विद्यार्थी अलिप्त किंवा वंचित राहताना दिसत आहेत. या संदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता अलिबागच्या तहसिलदार मीनल दळवी यांनी अलिबागस्थित स्पर्धा विश्व अकॅडेमीला सदिच्छा भेट दिली व उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, कोणत्या वयात तयारीला लागावे, परीक्षेचे बदलणारे स्वरूप, शासनाकडून घेतल्या जा

संवेदनशील भौगोलिक परिस्थिती असलेल्या महाड तालुक्याच्या महसूल यंत्रणांचे बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय - पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
महाड तालुक्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय भवन-इमारतीसाठी शासकीय जागा प्रदान   अलिबाग, दि.28 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याच्या भौगोलिक स्थितीनुसार या तालुक्यात सखल पृष्ठभाग, सावित्री नदीची पावसाळ्यातील पाण्याची वाढती पातळी, सरासरी पेक्षा जास्त पर्जन्यमान व आपतकालीन स्थितीमध्ये महसूल व आपत्ती व्यवस्थापन कार्यालयांतर्गत युद्ध पातळीवर कार्य चालते. अशा परिस्थितींमध्ये उपविभागीय अधिकारी (महसूल) व तहसिलदार या महसूली कार्यालयांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे, ही कामे प्राधान्याने होण्यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुराव्यातून प्रगतीकार्य होत आहे, असे जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले. महाड तालुक्यात नव्या प्रांत अधिकारी व तहसिलदार या कार्यालयांच्या मध्यवर्ती प्रशासकीय भवन इमारतींच्या बांधकामासाठी महसूल विभागाने जागा प्रदान केली आहे. ही जागा महाड तालुक्यातील मौजे चांभारखिंड येथील जल विद्युत प्रकल्पाची जागा जलसिंचन विभागाने या महत्त्वाच्या महसूल कार्यालयांसाठी उपलब्ध करुन दिली आहे, असे सांगून पालकमंत्री कु.तटकरे यांनी राज्याचे मा.मुख्यमंत्री ना.श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे,

उन्हाळी शिबीरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिक, खेळाडूंनी सहभाग घ्यावा --- जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक

      अलिबाग, दि.27 (जिमाका):-   जि ल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग आणि डिफेन्स अकॅडमी अलिबाग यांच्या   संयुक्त विद्यमाने दि.28 एप्रिल ते दि.30 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी 4.00 ते 7.00   या वेळेत विविध क्रीडा उपक्रम उन्हाळी प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे. आजच्या युगात सर्व मुला- मुलींनी स्वसंरक्षण शिकावे, स्वत:चे रक्षण करण्यासाठी सक्षम बनावे, आत्मनिर्भर बनावे, हसत खेळत शारीरिक व मानसिक दृष्टया सक्षम व निरोगी व्हावे, त्यांच्या   भविष्याला योग्य दिशा मिळावी ,   या हे तू ने   स्वसंरक्षण कला व आत्मनिर्भरता, क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शन, शारीरिक व मानसिक सक्षमीकरण, मुलांच्या फिटनेस ॲक्टिविटी, योगा, मेडिटेशन व प्राणायम, संभाषण   कौशल्य व व्यक्तिमत्व विकास, करिअर   मार्गदर्शन व सैन्य भरती संदर्भात मार्गदर्शन व आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जागरुकता   इत्यांदी विविध उपक्रम जयमाला गार्डन, अलिबाग येथे घेतले जाणार आहेत.               या उन्हाळी शिबीरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिक, खेळाडूंनी सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे. 000