पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

             अलिबाग,दि.30 (जिमाका):- राज्यमंत्री उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांचा शनिवार, दि.30 एप्रिल 2022 रोजीचा रायगड जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे-

              सकाळी 07.30 वा. अलिबाग येथून पोलीस परेड मैदानाकडे प्रयाण. सकाळी 8.00 वा. पोलीस परेड ग्राऊंड येथे आगमन व महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. कार्यक्रमानंतर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : पोलीस परेड ग्राऊंड मुख्यालय अलिबाग. सोईनुसार पोलीस परेड ग्राऊंड येथून आक्षी, ता.अलिबागकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. आक्षी येथे आगमन व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मराठी भाषा आद्य शिलालेख व परिसर सुशोभीकरण करणे भूमिपुजन कार्यक्रम. कार्यक्रमानंतर सुतारवाडी, ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. सुतारवाडी येथून मोटारीने रोहाकडे प्रयाण. सायं.4.00 वा. रोहा येथे आगमन व एन.जे.इंटरप्रायझेस फायन्सासियल प्रो.डिस्ट्रीब्युटर्स उद्घाटन कार्यक्रम. स्थळ : निंभोरे कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, रोहा-कोलाड रोड, रोहा. सायं.4.30 वा. रोहा येथून मोटारीने काकळ गौळवाडी ता.माणगावकडे प्रयाण. सायं.5.00 वा. काकळ गौळवाडी-उसर खुर्द येथे आगमन व स्वदेश फाऊंडेशन आयोजित नळपाणीपुरवठा योजना उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ : काकळ गौळवाडी-उसर खुर्द,  ता.माणगाव. सायं.5.30 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित बचत गट महिला मार्गदर्शन शिबीर. स्थळ : निजामपूर ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय, पटांगण, निजामपूर ता.माणगाव.  कार्यक्रमानंतर निजामपूर, ता.माणगाव येथून मोटारीने सुतारवाडी, ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी येथे आगमन व राखीव.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक