Posts

Showing posts from June 17, 2018

पर्यटक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22 -   वर्षापर्यटन, गड किल्ले, वन भ्रमंती आणि  गिर्यारोहणासाठी जिल्ह्यात येणाऱ्या  पर्यटकांच्या सुरक्षेसाठी व होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पर्यटक सुरक्षा उपायांची यंत्रणेने अंमलबजावणी करावी,  तसेच पर्यटनस्थळी व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी दिले.   मान्सून पर्यटनाच्या काळात पर्यटक धबधबे, समुद्र किनारे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. उत्साहाच्या भरात पर्यटक नको त्या संकटात सापडून प्रसंगी प्राणाला मुकतात. अशा दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. या अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभय यावलकर यांच्या सह अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क   विभाग सीमा झावरे, उपवनसंरक्षक रोहा,    जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागरकुमार पाठक आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पर्यटनस्थळ

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 66 मि.मि.पावसाची नोंद

      अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22 - रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 66.34 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 445.45   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 65.00 मि.मि., पेण-135.40 मि.मि., मुरुड-95.00 मि.मि., पनवेल-20.20 मि.मि., उरण-40.00 मि.मि., कर्जत-7.00 मि.मि., खालापूर-54.00 मि.मि., माणगाव-64.00 मि.मि., रोहा-120.00 मि.मि., सुधागड-30.50 मि.मि., तळा-50.00 मि.मि., महाड-36.00 मि.मि., पोलादपूर-49.00, म्हसळा-90.40मि.मि., श्रीवर्धन-145.00 मि.मि., माथेरान-45.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1061.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 66.34 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   15.03 टक्के इतकी आहे. ०००००

जिल्हा क्रीडा संकुलात सामुहिक योगाभ्यासाने साजरा झाला योग दिवस

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21 - जिल्हा क्रीडा संकूल नेहुली येथे सामुहिक योगाभ्यासाचे आयोजन करुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिवस (21 जुन) हा दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीन आज जिल्हा क्रीडा संकूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभय यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, प्रांताधिकारी सर्जेराव सोनवणे,   जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम साळूंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे,   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी पाथरुट, तहसिलदार प्रकाश संकपाळ, लोखंडे   आदी उपस्थित होते.   यावेळी अंबिका योग कुटीर या संस्थेचे संचालक योग शिक्षक वीरेंद्र पवार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे धडे दिले.   या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांनी सहभाग घेतला होता. देण्यात आलेल्या योगाभ्

अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21 -   भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेध शाळेकडून प्राप्त अंदाजानुसार शुक्रवार दि.22 जून ते सोमवार दि.25 जून   पर्यंत उत्तर कोकण भागात ढगांच्या गडगडाटासह अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. तसेच येत्या 48 तास समुद्र खवळलेला राहणार असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. ०००००

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 4.81 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.81 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 481.76   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 0.00 मि.मि., पेण-2.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-8.40 मि.मि., खालापूर-6.00 मि.मि., माणगांव-30.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-8.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-14.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-7.00 मि.मि., माथेरान-1.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 76.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 4.81 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   15.33 % इतकी आहे. ०००००

सेवाविषयक बाबी ऑनलाईन; 248 जि.प. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 - केडर मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी वर्गाच्या सेवा विषयक बाबी ऑनलाईन करण्याबाबत विकसित करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीचे जिल्हा परिषदेच्या 248 कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.19) प्रशिक्षण घेतले.   यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.ही संगणक प्रणाली एनआयसी ने विकसित केली आहे. ग्राम विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्या पुढाकारामुळे ही संगणक प्रणाली राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत होणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत करणे,पदोन्नती,बदली रजा या सारख्या सेवा विषयक अनेक बाबी ऑनलाईन करण्यात येणार आहेत. या ऑनलाईन संगणक प्रणालीबाबतचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण मंगळवार दि.   19   रोजी जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय प्रभाकर पाटील सभागृहात आयोजित पार पडले. या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन प्रभारी अतिरिक्त् मुख्य् कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांच्या हस्ते झाले. या प्रशिक्षणास रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व स्तरावरील एकूण 153 कार्यालयातील 248 कर्मचारी प्रशिक्षणास उपस्थित होते. या प्रकल्प

योग दिन आयोजनाचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 - केंद्र व राज्यशासनाने 21 जुन हा दिवसा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. राज्यशासनाने प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन गाव पातळीपर्यंत योग विद्येचा प्रसार होण्याच्यादृष्टीने खाजगी योग प्रसार करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधून   संबंधित प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणे,चर्चासत्र कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम,जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये महाविद्यालये विद्यापीठे यामधील विद्यार्थ्यांकडून तसेच एनएसएस नेहरु युवा केंद्र इ.युवा संघटनामार्फत योगा संबंधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्रतिवर्षी दिनांक 12 ते 16 जानेवारी या कालावधीत 5 दिवसांच्या योगा उत्सवाचे आयोजन करणे असे कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांबरोबरच सर्व शासकीय कार्यालय, सर्व ग्रामपंचायती,पंचायत समित्या या ठिकाणी गुरुवार दि.21 जुन रोजी केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाच्या योग शिष्टाचारानुसार सकाळ, सायंकाळ सत्रामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी या सर्वांनी किमान अर्धा ते एक तास योगासने करुन व समाजातील सर्व घटकांनी सदर

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 1 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 -   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.20 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 476.95   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 1.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-12.00 मि.मि., पोलादपूर-6.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-0.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 19.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 1.20 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   15.18 % इतकी आहे. ०००००

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक-2018 :मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता घ्यावी-जिल्हाधिकारी यावलकर

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19 - कोकण विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी सोमवार दि.25 रोजी मतदान होणार असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक कर्मचारी व निवडणूक बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलीस यंत्रणेने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी आज येथे दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवडणूक यंत्रणेची कायदा व सुव्यवस्था व वाहतुक आराखड्याच्या नियोजनासाठी बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी यावलकर यांच्या सह उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रतिमा पुदलवाड,   नवी मुंबई पोलीस उपायुक्त राजकुमार चाफेकर, जिल्हा विशेष शाखेचे अविनाश पाटील, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.   दरम्यान आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकीसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व केंद्राधिकाऱ्यांचे द्वितीय क्रमांकाचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी निवडणूकीसाठी नियुक्त सुक्ष्म निरीक्षकही प्रशिक्षणास उपस्थित होते. कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतांना श्री. यावलकर यांनी निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर जारी करावयाचे प्रतिबंधात्मक आदेशांच्या

गोंधळपाडा येथे मागासवर्गीय मुलींसाठी मोफत शासकीय वसतीगृह

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19 :- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थींनींकरीता मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह हे गोंधळपाडा अलिबाग,जि.प.मराठी शाळेच्या बाजूला जि.रायगड येथे कार्यरत आहे. या शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरिता वसतिगृहात प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध करुन देणेत आलेले आहेत.   वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात येऊन प्रवेश अर्ज घेवून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.तसेच भरलेले प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह वसतिगृहात विहीत वेळेत जमा करणे आवश्यक् आहे. इयत्ता आठवीपासून   गरीब,   हुशार,   होतकरु,   मागासवर्गीय,आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना (अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग,आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग ) गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. त्यासाठी संबंधित इच्छुकांनी संपर्क साधावा. असे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे. वसतीगृहात विद्यार्थिनींना निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य आहे. अभ्यासाकरीता लागणारी वह्या,पुस्तके,शैक्षणिक व लेखन साहित्य विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व

आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19 - रायगड जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा आगरवाडा येथे संस्थेचे संधाता,नळकारागिर, कर्तन व शिवण   आणि दोन वर्ष व्यवसाय अभ्यासक्रमाचे विजतंत्री, इलेकट्रॉनिक्स् मॅकॅनिक व जोडारी या व्यवसायांतील ऑगस्ट-2018   सत्र   प्रवेशाकरीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया दि. शुक्रवार दि.1 जुन पासून सुरु झाली असून ते बुधवार दि.20 जुन पर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या वेळात जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हसळा येथे अर्ज सादर करावेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज http//admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावेत आहे.   तसेच माहितीपुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे. असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था-म्हसळा जि.रायगड यांनी केले आहे. ०००००

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19 - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत   ग्रामीण व शहरी भागासाठी विहीत केलेल्या कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादेत पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात धान्य दिले जाते. त्यासाठी ग्रामीण भागाकरीता 44 हजार व शहरी भागातील 59 हजार रुपये इतकी वार्षिक उत्पन्न मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. या कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत सामावून घेण्यात येते. या उत्पन्न मर्यादेतील   लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी. 1.)राष्ट्रीय अन्नसुरक्षा मधून धान्य मिळणेबाबतचा अर्ज. 2.) अर्जदार यांच्या कुटूंबातील सर्वांचे आधारकार्ड. 3.) विहीत नमुन्यात हमीपत्र (हमीपत्रावर अर्जदारांचे फोटो लावून सही करणे.) 4.) रेशनकार्ड झेरॉक्स. 5.) बँक पासबुकची झेरॉक्स. तरी तालुक्यातील जे लाभार्थी सवलतीच्या दराने ध्यान्याचा लाभ घेऊ इच्छित असतील त्यांनी वरील कागदपत्रासह अर्ज तहसिल कार्यालय रायगड अलिबाग या कार्यालयाकडे सादर करावेत.असे आवाहन तहसिलदार अलिबाग-रायगड यांनी केले आहे. ०००००

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 21 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19 - रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 21.33 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 373.10   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 3.00 मि.मि., पेण-2.00 मि.मि., मुरुड-17.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-49.00 मि.मि., रोहा-5.00 मि.मि., सुधागड-6.00 मि.मि., तळा-12.00 मि.मि., महाड-15.00 मि.मि., पोलादपूर-13.00, म्हसळा-100.20मि.मि., श्रीवर्धन-70.00 मि.मि., माथेरान-49.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 341.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 21.33 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   11.87 % इतकी आहे. ०००००

केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19 - केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे बुधवार दि.20 रोजी   जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- बुधवार दि.20 रोजी सकाळी 11 वा.पेण येथे आगमन. दुपारी साडे बारा वा. पेण येथून अलिबागकडे प्रयाण. दुपारी दीड वा. अलिबाग येथे आगमन. सायं. साडे चार वा. अलिबाग येथून रोहा कडे प्रयाण. सायं. साडेपाच वाजता रोहा येथे   आगमन. रात्री नऊ वा. रोहा येथून महाराष्ट्र सिमलेस,सुकेळी नागोठणे कडे प्रयाण.   गुरुवार दि.21 रोजी   सकाळी साडेसात वा.महाराष्ट्र सिमलेस,सुकेळी नागोठणे   येथून   राठी इंग्लिश स्कुल, रोहा कडे प्रयाण.सकाळी आठ वाजता अंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त राठी इंग्लिश स्कुल, रोहा येथे आगमन. सकाळी पावणे नऊ वा. राठी इंग्लिश स्कुल रोहा कोलाड येथून प्रयाण. सकाळी सव्वा नऊ वा.   महाराष्ट्र सिमलेस,सुकेळी नागोठणे जि.रायगड येथे आगमन. सकाळी साडे अकरा वा. महाराष्ट्र सिमलेस,सुकेळी नागोठणे जि.रायगड येथून अलिबागकडे प्रयाण. दुपारी एक वा. अलिबाग येथे आगमन.दुपारी तीन वा. अलिबाग येथून पालीकडे प्रयाण. सायं. चार वा. पाली येथे

पत्रपरिषद ; कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक-2018; मतदानासाठी विशेष रजा; वेळ ही वाढवली- जिल्हाधिकारी यावलकर

Image
  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18 - विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी प्रशासनाची   रायगड जिल्ह्यातील तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. दरम्यान मतदारांना मतदान करण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून मतदानाच्या दिवशी (दि.25) विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. तसेच मतदानाची वेळही   दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 2018 संदर्भात माहिती देण्यासाठी आज रायगड जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड या उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी यावलकर यांनी माहिती दिली की, विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2018 चा कार्यक्रम 24 मे 2018 रोजी भारत निवडणूक आयोग यांनी घोषित केलेला आहे.    कोकण पदवीधर मतदार संघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो.   या निवडणुकीकरिता एकूण 93 केंद्

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 98 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18 - रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 98.44 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 351.77   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 124.00 मि.मि., पेण-130.00 मि.मि., मुरुड-210.00 मि.मि., पनवेल-55.20 मि.मि., उरण-138.00 मि.मि., कर्जत-78.70 मि.मि., खालापूर-62.00 मि.मि., माणगाव-65.00 मि.मि., रोहा-128.00 मि.मि., सुधागड-51.50 मि.मि., तळा-129.00 मि.मि., महाड-58.00 मि.मि., पोलादपूर-31.00, म्हसळा-125. 60मि.मि., श्रीवर्धन-130.00 मि.मि., माथेरान-59.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1575.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 98.44 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   11.19 % इतकी आहे. ०००००

अपंगासाठी मोफत संगणक व व्यावसायिक प्रशिक्षण सुविधा

         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18 - महाराष्ट्र शासन अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य् पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह   येथे अपंगांसाठी मोफत संगणक व व्यावसायिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहे. इच्छुक अपंग विद्यार्थ्यांकडून 31 जुलै 2018 पर्यंत प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. उपलब्ध अभ्यासक्रम व शैक्षणिक पात्रता- 1.सर्टीफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस.ऑफिस (संगणक कोर्स) किमान इयत्ता आठवी पास . 2.मोटार अँड आमेंचर रिवायडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज-(इलेक्ट्रिक कोर्स) किमांन इयत्ता नववी पास. 3.एम .एस. सी.आय. टी. (संगणक कोर्स) 4.वयोमर्यादा सोळा ते चाळीस वर्ष तसेच प्रशिक्षण कालावधी एक वर्ष प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक,शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह,टाकळी रोड,म्हेत्रे मळा,गोदड मळ्याजवळ, मिरज ता.मिरज जि. सांगली पिनकोड 416410.दूरध्वनी-0233-222908 मोबाईल   9921212919,9922577561,9975375557 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष