जिल्हा क्रीडा संकुलात सामुहिक योगाभ्यासाने साजरा झाला योग दिवस



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21- जिल्हा क्रीडा संकूल नेहुली येथे सामुहिक योगाभ्यासाचे आयोजन करुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिवस (21 जुन) हा दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीन आज जिल्हा क्रीडा संकूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभय यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, प्रांताधिकारी सर्जेराव सोनवणे,  जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम साळूंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी पाथरुट, तहसिलदार प्रकाश संकपाळ, लोखंडे  आदी उपस्थित होते.
 यावेळी अंबिका योग कुटीर या संस्थेचे संचालक योग शिक्षक वीरेंद्र पवार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे धडे दिले.  या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांनी सहभाग घेतला होता. देण्यात आलेल्या योगाभ्यासात श्वास, प्रश्वास, प्राणायाम, यम नियम तसेच शारिरीक ताण तणाव निवारणाची आसने शिकविण्यात आली. काही प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.
योगाभ्यास हा शरीर आणि मन यांचा संवाद साधणारा अभ्यास आहे, असे यावेळी योगशिक्षक वीरेंद्र पवार यांनी सांगितले. त्यांना माधवी पवार, सोनल हसलानी, सुषमा घाडी, शुभांगी माळी, प्रमिला पाटील, रीया चौधरी, सुजाता दामोदरे, नारंगीकर, प्रिझम संस्थेच्या तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व ॲकेडमी अलिबागच्या संचालक आदींनी सहकार्य केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड