Posts

Showing posts from February 26, 2023

जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट रायगड कार्यालयाकरिता विविध प्रकारची वाहने भाडे तत्त्वावर पुरविण्यासाठी इच्छुकानी निविदा सादर कराव्यात

  अलिबाग,दि.3,(जिमाका):- प्रमुख जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट रायगड कार्यालयाकरिता विविध प्रकारच्या वातानुकूलित (एसी), विना वातानुकूलित (नॉन एसी) वाहने भाडे तत्वावर किमान स्थानिक (80 कि.मी./12 तास) तसेच बाहेरील ठिकाणी (300 कि.मी./24 तास) शासकीय वापरासाठी प्रतीमहा दराने एक वर्ष कालावधीसाठी कॉल बेसिस तत्वावर दरत्रके मागविण्यात आली आहेत.      तरी इच्छुक वाहनपुरवठाधारकानी दि.20 मार्च 2023 दुपारी 3.30  पर्यंत प्रमुख जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, राऊतवाडी, वेश्वी अलिबाग या कार्यालयीन पत्यावर पोस्टाने किंवा हस्तपोच निविदा सादर कराव्यात. तांत्रिक लिफाफा त्याच दिवशी सायंकाळी 4.00 वा. उघडण्यात येईल. (अटी व शर्ती लागू). निविदा दस्तऐवज कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आले आहे, असे प्रमुख जिल्हा अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) तथा प्रकल्प संचालक आत्मा, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. ०००००००

माणगाव येथील दिवाणी न्यायाधीश,वरिष्ठ स्तर,माणगाव न्यायालयाचा दि.05 मार्च रोजी उद्घाटन कार्यक्रम

    अलिबाग,दि.3,(जिमाका):-माणगाव येथे दि. 05 मार्च 2023 पासून दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयाचे कामकाज सुरु होणार आहे. भूसंपादन प्रकरणे, हिंदू विवाह कायद्यांतर्गत दाखल होणारी प्रकरणे, सरकार विरुध्दची प्रकरणे, रक्कम रुपये पाच लाखावरील दावे व इतर प्रकरणांसाठी श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा व पाली या महसुली तालुक्यांकरिता पक्षकार व वकीलांना प्रकरणे दाखल करण्यासाठी अलिबाग येथे यावे लागत होते.त्यामुळे पक्षकारांना आर्थिक भूर्दंड पडत होता तसेच त्यांचा वेळही वाया जात होता. त्यामुळे या परिसरातील पक्षकार व वकीलांची माणगाव येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर हे न्यायालय सुरु करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून प्रलंबित होती.        श्रीवर्धन म्हसळा, माणगाव, तळा, रोहा व पाली या महसुली तालुक्यांकरिता माणगाव, जिल्हा रायगड येथे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, माणगाव न्यायालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मा.उच्च न्यायालयास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मा.उच्च न्यायालयाने मंजूरी दिली असून त्याबाबतची अधिसूचना विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून जाहीर करण्यात आली आ

जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन

    अलिबाग,दि.3,(जिमाका):-   मा.उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे निर्देशानुसार  “ न्याय आपल्या दारी ”  या संज्ञेतर्गत दि.9 मार्च ते दि.7 एप्रिल 2023 या कालावधीत रायगड जिल्हयात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.        या फिरते लोक अदालतीचा उद्घाटन समारंभ दि.9 मार्च 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता रायगड जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.       या कार्यक्रमास सर्व न्यायिक अधिकारी वर्ग, अलिबाग, जिल्हा सरकारी वकील व अध्यक्ष वकील संघटना अलिबाग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.        हे फिरते न्यायालय रायगड जिल्ह्यामध्ये दि.7 एप्रिल 2023 पर्यंत कार्यरत असणार आहे व ते जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये जावून लोकअदालत आयोजित करणार आहे.    या फिरत्या लोकअदालतीचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड श्रीमती एस. एस. सावंत यांनी केले आहे. ०००००००

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

                 अलिबाग,दि.3,(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, मुंबई विभाग, कोकण भवन, नवी मुंबई. आणि स्वमन ह्यूमन राईटस कौन्सिल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 11 मार्च 2023 रोजी सकाळी 10.00 ते 4.00 वा शगुन बॅक्वेट हॉल, शगुन बसस्टॉप समोर, बामणडोंगरी रेल्वेस्टेशन जवळ, सेक्टर-19, उलवे नोड, नवी मुंबई येथे बेरोजगार उमेदवारांसाठी महारोजगार मेळावा आयोजित केला आहे.        जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे.  या रोजगार मेळाव्यात एस.एस.सी. पास, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, इत्यादी नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.        या संयुक्त विभागीय महारोजगार मेळाव्यास स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या बेरोजगार युवकासाठी जिल्हयातील विविध महामंडळे यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनाविषयीची माहीती उमेदवारांना दिली जाणार आहे.        रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती  www.mahas

आरटीई 25 टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश-2023 ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पाल्यांची ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु

    अलिबाग,दि.3,(जिमाका):- सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत दि.1 मार्च 2023 पासून पाल्यांचे ऑनलाईन अर्ज नोंदणी (Online/Allication Registration) सुरु झाली आहे. इच्छुक अर्जदारांनी शासनाच्या  https://student.maharashtra. gov.in/adm_portal/Users/ rteindex , या वेबसाईटवर बालकांचे अर्ज भरावेत.  प्रवेशासंबंधित पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व पंचायत समितीमार्फत मदत केंद्र सुरु करण्यात आली असून केंद्राच्या वेबसाईटवर होम पेज वर हेल्प सेंटर या ऑप्शनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.     प्रवेशासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे : शाळा सर्व मंडळाच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळा (अल्पसंख्याक शाळा वगळून). पात्र अर्जदार-वंचित घटक-व्हीजे, एनटी, ओबीसी, एसबीसी, एसईबीसी, अपंग- 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली बालके, दुर्बल घटक- एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले सर्व घटक, विधवा, घटस्फोटित महिलांची बालके, अनाथ बालके, एकाकी पालकांची बालके, आवश्यक कागदपत्रे-(ऑनलाईन अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता न

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 8 मार्च रोजी आयोजन

    अलिबाग,दि.2,(जिमाका):-  शासनाच्या दि.26 सप्टेंबर 2012 परिपत्रकान्वये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हस्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तथापि माहे मार्च 2023 मधील पहिल्या सोमवारी दि.6 मार्च 2023 रोजी होळी निमित्त जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे व  त्यानंतर मंगळवार, दि.7 मार्च 2023 रोजी धुळीवंदननिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे.  त्यामुळे माहे मार्च 2023 मध्ये होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन बुधवार, दि.8 मार्च 2023 रोजी दुपारी 1.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.   या लोकशाही दिनासाठी नमूद केल्याप्रमाणे त्या दिवशी व त्यावेळी आपण स्वत:आपल्या कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या अर्जाच्या अद्यायावत माहितीसह उपस्थित राहावे, प्रतिनिधी पाठवून नये, असे प्र.तहसिलदार (संगायो) जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड गोविंद वाकडे यांनी कळविले आहे. 00000000

जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्णबधिरता निवारण सप्ताहाचे आयोजन

    अलिबाग,दि.2,(जिमाका):- दि.03  मार्च या जागतिक कर्णबधिरता   दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग तसेच रायगड जिल्हा परिषदेमार्फत रायगड जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर दि.1 मार्च ते दि.8 मार्च 2023 या कालावधीमध्ये कर्णबधिरता निवारणाविषयी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये कानाविषयी   विविध तपासण्या तज्ञांमार्फत   करण्यात येत आहेत. तसेच   कर्णबधिरतेविषयी   जनजागृती होण्यासाठी अलिबाग शहरामध्ये   शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी तसेच पोस्टर्स व रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या सप्ताहामध्ये कानाची तपासणी, कर्णबधिरते विषयी   दिव्यांग प्रमाणपत्र वाटप देखील करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी जिल्हा रुग्णालयातील ओपीडी क्रमांक 24 मध्ये संपर्क साधून या सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई तसेच अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटा

कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत सागरगडमाची येथील आदिवासीवाडीवर विविध दाखले वाटप व आरोग्य शिबिर कार्यक्रम संपन्न

    अलिबाग,दि.2,(जिमाका):- आदिवासी समाजाच्या मुलभूत गरजांची पूर्तता होण्यासाठी रायगडचे भूतपूर्व जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कातकरी उत्थान अभियानांतर्गत सात कलमी कार्यक्रम राबविला. तेवढ्यात तत्परतेने कातकरी उत्थान अभियानांतर्गत सात कलमी कार्यक्रम अभियान विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे राबवित आहेत. याच अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार श्री.बळवंत वालेकर यांच्या मागणीनुसार शासन आपल्या दारी या धोरणानुसार आज सागरमाची येथील आदिवासी वाडीवर विविध दाखले वाटप व आरोग्य शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खंडाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.रंजना नाईक, अलिबागचे उपविभागीय अधिकारी श्री.प्रशांत ढगे, तहसिलदार श्री.अक्षय ढाकणे व अमोल शिंदे, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.जंजिरकर, डॉ.हुलवान  व त्यांचे सहकारी, आरोग्य अधिकारी डॉ.स्मिता म्हात्रे, मंडळ अधिकारी श्री.मांढरे, आरोग्य सेविका दिपाली भोनकर, तलाठी पल्लवी भोईर उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री.प्रशांत ढगे म्हणाले की, शासन आपल्या दारी या धोरणानुसार विविध दाखले वाटप व आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विविध दाखल्यांसाठी

कांदळवनाचा ऱ्हास व तोडीबाबत तसेच अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीबाबत तक्रार दाखल करण्यासाठी टोल फ्री क्र.1077 व व्हाट्सअप क्र. 8275152363 जाहीर

  अलिबाग,दि.2,(जिमाका):-  जिल्ह्यातील नागरिकांनी कांदळवनाचे संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने कांदळवनाचा ऱ्हास व तोडीबाबत जिल्हास्तरावर तक्रार दाखल करण्यासाठी तसेच अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्र-1077 व व्हॉटसअप क्र. 8275152363 चा वापर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.  मा.उच्च न्यायालयाने कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जनहित याचिका 87/2006 मध्ये दि.17 सप्टेंबर 2018 रोजी आदेश पारीत केले होते. त्यानुषंगाने, शासन, महसूल व वन विभागाकडील दि. 16 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयान्वये सागरतटीय जिल्ह्याकरिता कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विभागीय स्तरावर तसेच जिल्हा/तालुका स्तरावर संनियंत्रण समित्या गठीत करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडील दि.03 नोव्हेंबर 2018 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने व या कार्यालयाकडील दि.16 नोव्हेंबर 2018 च्या आदेशान्वये जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागर

दि.6 मार्च रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

  अलिबाग,दि.2,(जिमाका):-  शासकीय ठराव, राजनैतिक व सेवा विभागाच्या दि.16 जानेवारी 1958 च्या शासन निर्णयान्वये रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरिता तीन स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.  त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी सन-2023 या वर्षाकरिता होळी सणानिमित्त सोमवार, दि.6 मार्च 2023 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. ०००००००

अलिबाग तालुक्यातील ऑटोरिक्षा मिनिडोअर/मीटर टॅक्सी चालक-मालकांनी वाहनांचे मीटर रिकॅलिब्रेशन करून घेवून संघटना प्रतिनिधीमार्फत संपर्क साधावा

  अलिबाग,दि.28(जिमाका):- सचिव, मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य) यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या क्षेत्रातील टॅक्सी/ऑटोरिक्षा भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन होऊ न शकलेल्या वाहनांच्या भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरीता दि.31 मार्च 2023 पर्यंत शेवटची मुदतवाढ देणे तसेच भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत सुधारित अधिकृत टेरिफकार्ड दि.31 मार्च 2023 पर्यंत अनुज्ञेय ठेवण्याकरीता प्राधिकरणाने परिचलन पद्धतीने मान्यता दिली आहे.  या कार्यालयाच्या अंतर्गत MMRTA क्षेत्रात येणाऱ्या पेण व अलिबाग तालुक्यातील ऑटोरिक्षा व मिनिडोअर/मीटर टॅक्सी चालक-मालक यांना मीटर रिकॅलिब्रेशनसाठी पेण येथे यावे लागत आहे. अलिबाग तालुक्यातील वाहन चालकांना पेण येथे येणे खर्चिक व गैरसोईचे आहे. त्याबाबत अलिबाग येथील ऑटोरिक्षा व्यवसायिक संघटनाद्वारे निवेदन प्राप्त झाले आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील सर्व ऑटोरिक्षा, सर्व मिनिडोअर/मीटर टॅक्सी चालक-मालक यांनी आपल्या वाहनांचे मीटर रिकॅलिब्रेशन करून घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन आपल्या सं

जवाहर नवोदय विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

  अलिबाग,दि.28(जिमाका):- जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, माणगाव येथे (दि.27 फेब्रुवारी 2023) रोजी विज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी विज्ञान विभागातील अण्णासाहेब पाटील, किरण तिवारी, विवेक पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय या कार्यक्रमात गणित विभागाचे विष्णूदत्त, सुनीता जयसवार, मराठी शिक्षक सुनील बिरादार, संगणक शिक्षक मुकेश सुमन, संगीत शिक्षक केदार केंद्रेकर हे देखील उपस्थित होते.  या कार्यक्रमात विद्यालयाची विद्यार्थिनी भूमिषा पेटारे हिने राष्ट्रीय विज्ञान दिनाची माहिती सांगितली तर साहिल कोकरे या विद्यार्थ्याने सी.व्ही.रमण यांनी लावलेल्या वैज्ञानिक शोधाची माहिती सांगितली. अमृता वाळवी आणि मनस्वी दिवाने या विद्यार्थिनींनी विज्ञान विषयक प्रश्नमंजुषा सादर केली.   कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य के.वाय. इंगळे यांनी भारताच्या उज्वल वैज्ञानिक परंपरेची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली आणि उत्तम वैज्ञानिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.       सुरुवातीला प्राचार्य के.वाय.इंगळे आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते जेष्ठ वैज्ञानिक स्व. चंद्रश

जवाहर नवोदय विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Image
    अलिबाग,दि.28(जिमाका):- जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, माणगाव येथे (दि.27 फेब्रुवारी 2023) रोजी मराठीतील ज्येष्ठ कवी, लेखक तसेच नाटककार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन अर्थात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.              या कार्यक्रमासाठी मराठी भाषा शिक्षक कैलास वाघ, सुनील बिरादार, समुपदेशक संदीप निकम, विज्ञान शिक्षक अण्णासाहेब पाटील, हिंदी शिक्षक अर्जुन गायकवाड, ग्रंथपाल संतोष चिंचकर, संगणक शिक्षक मुकेश सुमन,संगीत शिक्षक केदार केंद्रेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.              मराठी भाषेतील विविध साहित्यिक आणि त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती यावर प्राचार्य के.वाय.इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर मराठी विभागाच्या वतीने कैलास वाघ यांनी मराठी साहित्यातील विविध साहित्य प्रकारांची विद्यार्थ्यांना थोडक्यात ओळख करून दिली. सुनील बिरादार यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेचे प्राचीनत्व यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली.                  कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य के.वाय. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मराठी पुस्तके वाचण्याचा सल्ला दि

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळांतर्गत 50 टक्के अनुदान योजना,बीज भांडवल योजनेसाठी इच्छुकांनी कर्ज प्रस्ताव सादर करावेत

    अलिबाग,दि.27(जिमाका) :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय रायगड यांच्यामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता राबविल्या जाणाऱ्या 50 टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजनेसाठी अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) इच्छुक अर्जदारांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.          महामंडळाच्या 50 टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना या शासकीय योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, ढोर होलार व मोची इ.) असावा. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पूर्ण पूर्तता करून मूळ कागदपत्रांसह योजनेसाठीचे प्रस्ताव तीन प्रतीत मधुनील हाऊस नं.15 रायवाडी कॉम्प्लेक्स, रूम नं.105 पारिजात सह.गृहनिर्माण संस्था मर्या. पहिला मजला, श्रीबाग नं.2, चेंढरे ता.अलिबाग,जि.रायगड येथे स्वतः अर्जदाराने प्रस्ताव दाखल करावे.         कर्ज प्रस्तावासोबत अर्जदाराने जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला, रेश

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 13 व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न रायगड जिल्ह्यातील अंदाजे 1 लाख 8 हजार 654 पात्र लाभार्थ्यांना रु.21 कोटी 73 लाख 8 हजार इतकी लाभाची रक्कम वितरीत

  अलिबाग,दि.27(जिमाका) :-  केंद्र पुरस्कृत 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आज दि.27 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3.00 वा. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.  रायगड जिल्ह्यातील अंदाजे 1 लाख 08 हजार 654 पात्र लाभार्थ्यांना रु.21 कोटी 73 लाख 8 हजार इतकी लाभाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. राज्य शासनाकडील दि.15 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता, केंद्र शासनाने सुरु केलेली केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात दि.01 डिसेंबर 2018 पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.  या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबियांस रु.2 हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात एकूण रु.6 हजार प्रती वर्ष लाभ अनुज्ञेय आहे. त्यानुसार रायगड जिल्हयात या योजनेंतर्गत माहे फेब्रुवारी 2019 पासून एकूण 1 लाख 75 हजार 612 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.  केंद्र शासनातर्फे फेब्रुवारी 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत 12 हप्त्यांमध्ये रक्कम रु. 2 अब्ज 92 कोटी 42 लाख 92 हजार इत

नेहरू युवा केंद्राद्वारे प्रत्येक तालुक्यामध्ये होणार राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांची भरती इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह 9 मार्च पूर्वी अर्ज करावेत

  अलिबाग,दि.27(जिमाका) :-  नेहरु युवा केंद्रांतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये दोन व कार्यालयामध्ये संगणक विभागामध्ये काम करण्याकरिता दोन स्वयंसेवक म्हणून युवक युवतींची निवड करण्यात येणार आहे. तरी इच्छुक, पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज दि.9 मार्च 2023 पूर्वी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, रायगड निशांत रौतेला यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये युवकांचे नेटवर्क तयार करणे, भारत सरकारच्या विविध योजनांमध्ये सहभाग घेणे, युवकांना राष्ट्र निर्माण कार्यामध्ये योगदान देण्याची संधी, भारत सरकार द्वारा युवकांच्या नेतृत्व गुणांची क्षमता व त्यांची उर्जा स्वयंसेवेच्या माध्यमातून राष्ट्र निर्माण कार्यामध्ये वापर करणे,त्याचप्रमाणे साक्षरता, स्वच्छता, आरोग्य, लिंगभेद, सामाजिक समस्यांबाबत जनजागृती अभियान राबविणे, त्याकरिता युवकांना संगठीत करणे, युवक, महिला मंडळे यांच्याशी संपर्क वाढविणे, त्यांचा दुवा म्हणून कार्य करणे, शासकीय विभागाच्या सहकार्याने विविध कार्यक्रम राबविणे तसेच सहकार्य करणे याकरिता प्रत्येक तालुक्यामध्ये दोन व कार्यालयामध्ये संगणक विभाग

क्षय रुग्णांना पोषण आहार वाटप कार्यक्रम संपन्न

    अलिबाग,दि.27(जिमाका):-  नि:क्षय मित्र वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षय रुग्णांना पोषण आहार वाटप कार्यक्रम जिल्हा परिषदच्या टिपणीस सभागृहात नुकताच संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभिानांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील यांच्या हस्ते चार क्षय रुग्णांना पोषक आहाराचे किट वाटप करण्यात आले.  पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत भारत टी.बी.मुक्त करण्याच्या दृढनिश्चय केला आहे. यासाठी सर्वांनी यात योगदान देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात अजूनही 3 हजार 900 इतक्या रुग्णांना नि:क्षय मित्र म्हणून त्यांना दत्तक घेऊन त्यांचे उपचार सुरू असेपर्यंत त्यांना पोषण आहार घेणे गरजेचे आहे. समाजात अनेक रुग्णांना पोटभर खायला अन्न मिळत नाही. अशा प्रकारच्या रुग्णांना दत्तक घेण्यासाठी समाजातील सामाजिक संस्था, औद्योगिक कंपन्या, राजकीय पक्ष, नेते यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात

राजभाषा मराठी....आपला स्वाभिमान...!

    दि.01 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून दि.01 मे हा दिवस मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.  महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल, असे जाहीर करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  वसंतराव नाईक होते. सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात सर्वप्रथम वापर केला तसेच देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली.  महाराष्ट्री या तत्कालीन प्राकृत भाषेचे मराठी भाषा हे आधुनिक रूप आहे. अनेक बोलीभाषा आगरी, कोळी, खानदेशी, वऱ्हाडी, कोकणी, तंजावर, मराठी, कुणबी, आदिवासींच्या विविध समुदायांची मराठी बोली तसेच प्रांताप्रांतांनुसार मराठी भाषेत बदल होतो.  पुस्तकातील प्रमाण मराठी व बोली भाषांमधील मराठी यांच्यात अनेक साम्य व भेद आहेत. मराठी भाषेच्या जडणघडणीत कविवर्य कुसुमाग्रजांचा फार मोठा हातभार होता. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसमाग्रज यांनी मराठी भाषेत जीवन लहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल, विशाखा हे काव्यसंग्रह तर दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नट सम्राट, राजमुकुट ही नाटके लिहिली तर वैष्णव जान्हवी कल्पनेच्या तीरा