क्षय रुग्णांना पोषण आहार वाटप कार्यक्रम संपन्न

 

 

अलिबाग,दि.27(जिमाका):- नि:क्षय मित्र वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षय रुग्णांना पोषण आहार वाटप कार्यक्रम जिल्हा परिषदच्या टिपणीस सभागृहात नुकताच संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभिानांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील यांच्या हस्ते चार क्षय रुग्णांना पोषक आहाराचे किट वाटप करण्यात आले.

 पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत भारत टी.बी.मुक्त करण्याच्या दृढनिश्चय केला आहे. यासाठी सर्वांनी यात योगदान देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात अजूनही 3 हजार 900 इतक्या रुग्णांना नि:क्षय मित्र म्हणून त्यांना दत्तक घेऊन त्यांचे उपचार सुरू असेपर्यंत त्यांना पोषण आहार घेणे गरजेचे आहे. समाजात अनेक रुग्णांना पोटभर खायला अन्न मिळत नाही. अशा प्रकारच्या रुग्णांना दत्तक घेण्यासाठी समाजातील सामाजिक संस्था, औद्योगिक कंपन्या, राजकीय पक्ष, नेते यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. त्यांनी सर्व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नि:क्षय मित्र बनून क्षय रुग्णांना दत्तक घ्यावे व त्यांना पोषण आहार वाटप करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक कंपन्यांना, सामाजिक संस्थांना, राजकीय पक्षांना, नेते मंडळींना भेटून त्यांना याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारेही माहिती देण्यात आली आहे. नि:क्षय मित्र होण्यासाठी https://reports.nikshay.in/FormIO/DonorRegistration  या लिंकवर जाऊन नि:क्षय मित्र होण्यासाठी फॉर्म भरावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक