Posts

Showing posts from June 2, 2024

रायगड लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ संपन्न

  रायगड जिमाका दि.3: - रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी उद्या दि.04 जून रोजी स.8 वाजेपासून सुरु होणार आहे. या मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा मतमोजणी निरीक्षक कमलेश कुमार अवस्थी आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाली. यामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक यांचा समावेश होता. नेहुली येथील क्रीडा संकुलातील हॉलमध्ये पार पडलेल्या या सरमिसळ प्रक्रियेवेळी  उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा सूचना अधिकारी निलेश लांडगे यांसह विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी असे एकूण 1 हजार अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणीची रंगीत ताली