Posts

Showing posts from April 28, 2024

मतदान पूर्व दिवशी तसेच मतदानादिवशी वृत्तपत्रात प्रसिध्द करावयाच्या जाहिरातींसाठी प्रमाणिकरण बंधनकारक

    रायगड दि.4 जिमाका:  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान पूर्व दिवशी तसेच मतदानादिवशी केवळ वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचा मजकूर प्रसिध्दीच्या आधी प्रमाणिकरण करुन घेणे उमेदवारांना बंधनकारक आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला ॲनेक्चर २७ हा उमेदवार अथवा उमेदवारांने प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीचा अर्ज (अर्जावर स्वत: उमेदवाराची सही अथवा प्रतिनिधीची सही असल्यास त्याबाबत उमेदवाराचे प्रतिनिधी नियुक्त केलेले घोषणापत्र अर्जासोबत हवे), जाहिरात मजकुराची सोबत दोन प्रतीत, जाहिरात तयार करण्यासाठी आलेला खर्च व त्याचे देयक, जाहिरात कोणत्या वृत्तपत्रात प्रसिध्दीला देणार याबाबतची माहिती व त्याबाबतच्या संभाव्य खर्चाचा तपशील आवश्यक आहे. मतदान पूर्व दिवशी तसेच मतदानादिवशी (म्हणजेचे दि. 6 मे व 7 मे रोजी) केवळ वर्तमान पत्रात करावयाच्या जाहिरातीचा मजकूर प्रसिध्दीच्या दोन दिवस आधी प्रमाणिकरण करुन घेणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाहिरातींच्या प्रमाणिकरणासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम कक्ष,जिल्हाधिकारी कार्

सर्वात जास्त मतदान करून रायगड जिल्ह्याला मतदानात अग्रेसर करण्याचे आवाहन लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी तरुणाईवर- जिल्हाधिकारी

    रायगड दि.04(जिमाका):-  रायगड लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी होत असलेल्या मतदानामध्ये सर्वात जास्त मतदान करून रायगड जिल्ह्याला मतदानात अग्रेसर होण्याचा निर्धार युवक-युवतींनी करावा. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका तरुणाईची आहे, तरुणाईने ठरविले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे येत्या 7 मे रोजी सर्व पात्र मतदारांसह प्रत्येक युवक-युवतीने  मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. लोकशाही व्यवस्थेने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हा अमूल्य आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने हा अधिकार बजाविणे आवश्यक आहे. तसेच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य, आपल्या मित्र-मैत्रिणी यांना मतदानासाठी आग्रह धरून त्यांचे मतदान होईल, यासाठी पाठपुरावा करावा. आपल्या जिल्ह्याला मतदानात नंबर वन बनविण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी यावेळी केले. जिल्हा प्रशासन सज्ज             रायगड लोकसभा मतदारसंघाकरीता होणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान केंद

मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य --जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे

  रायगड,दि.04(जिमाका):-  मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी अंतर्गत दि.7 मे रोजी रायगड आणि दि.13 मे रोजी मावळ या दोन मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे, असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागात

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची मतमोजणी केंद्राला भेट

Image
  रायगड दि.4(जिमाका):-  जिल्ह्यातील 32-रायगड लोकसभा मतदारसंघासाठी दि.7 मे 2024 रोजी मतदान होणार असून मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूमची व मतमोजणी केंद्राची पाहणी मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी केली. जिल्हा निवडणुक विभागाने  केलेल्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी श्री.चोक्कलिंगम 32-रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी निवडणुक यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक घेतली. मतदान प्रक्रिया, कायदा व सुव्यवस्था, मनुष्यबळ आदीबाबत माहिती घेऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्याचा आढावा घेतला आहे. 32-रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि.4 जून रोजी होणार असून अलिबाग येथील नेहुली येथे उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टेवाड,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, उपविभ

मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री.बुदिती राजशेखर यांची जिल्हाधिकारी कार्यालयास भेट रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याशी केली चर्चा

Image
    रायगड दि.03,(जिमाका):- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 अंतर्गत मावळ मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक ( सर्वसाधारण ) श्री.बुदिती राजशेखर यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत 31 मावळ लोकसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरु असलेल्या पूर्वतयारी बाबत चर्चा केली व त्यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप,  जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.        मावळ लोकसभा मतदार संघातील  मावळ लोकसभा मतदारसंघाचे उरण, पनवेल,  कर्जत विधानसभा क्षेत्रातील भाग असून मतदारसंघाशी संबंधित कामकाज सुरू आहे. निवडणूक निरीक्षक श्री.बुदिती राजशेखर यांनी जिल्हा निवडणूक आचारसंहिता कक्ष,  निवडणूक सनियंत्रण कक्ष, मीडिया सेल आदींची पाहणी केली. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. निवडणूक निरीक्षक श्री. राजशेखर यांची माध्यम कक्षास भेट        माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल, समाज माध्यम

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
    रायगड,(जिमाका): दि.1-  महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनानिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, डॉ ज्योस्त्ना पडियार, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण डॉ.रविंद्र शेळके, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार उमाकांत कडनोर, श्री.यादव, विक्रम पाटील आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 0000000

समृद्ध, संपन्न महाराष्ट्र घडवू या - महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात

Image
    रायगड (जिमाका)दि.1:-  उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांच्या सहकार्याने समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र ही ओळख अबाधित राहील, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय समारंभात कु.तटकरे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.             आपल्या शुभेच्छा संदेशात कु.तटकरे म्हणाल्या  शेती, औद्योगिक उत्पादने, व्यापार, दळणवळण आदी क्षेत्रात देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक असलेला महाराष्ट्र देशाचे आर्थिक शक्तीकेंद्र असून देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्राने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याप्रसंगी झालेल्या संचलनात रायगड जिल्हा पोलीस सशस्त्र बल, दंगल नियंत्रण पथक, सशस्त्र महिला पोलीस दल,

1 मे रोजी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

    रायगड,दि.29(जिमाका) :  महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार 1 मे रोजी सकाळी 8 वाजता अलिबाग येथील पोलीस परेड ग्राऊंडवर महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनील तटकरे  यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.   मुख्य शासकीय समारंभ सकाळी 8 वाजता असल्यामुळे इतर कार्यालय अगर संस्था यांनी आपल्या कार्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी 7.15 वा.पूर्वी किंवा सकाळी 9 वा.च्या नंतर करावा. या मुख्य शासकीय समारंभासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. ०००००००