Posts

Showing posts from November 14, 2021

अलिबाग तालुक्यातील झिराड येथे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा संपन्न

    अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका) :- मा.भारत निवडणूक आयोगाकडून दि.1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम-2022 जाहीर केला आहे.   या कार्यक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील झिराड येथे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा संपन्न झाली.   यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती श्री.दिलीप भोईर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार मिनल दळवी तसेच   झिराड येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.      या विशेष ग्रामसभेच्या व मतदार नोंदणी शिबिराच्या निमित्ताने मतदार यादीचे वाचन, नव मतदार नोंदणी, आधीच्या मतदारांच्या यादीची तपासणी आदी महत्वाची कामे करण्यात आली. दि.1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण असलेल्या भारतीय नागरिकास मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होईल. मात्र मतदार यादीत नाव असेल तरच आपण मतदान करू शकतो, संविधानाने दिलेल्या या मौलिक अधिकाराचा वापर करण्याची संधी मतदानाच्या वेळी कोणत्याही पात्र मतदाराने गमावू नये, यासाठी या विशेष ग्रामसभेस आयोजन करण्यात आ

नगरपंचायतीच्या आरक्षण व सोडत ते अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापर्यंतच्या कामावर नियंत्रणाकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती

    अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):-राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.12 नोव्हेंबर 2021 अन्वये नमूद केलेल्या नगरपंचायतीकरिता नगरपंचायतीच्या आरक्षण व सोडत इत्यादी ते अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापर्यंतच्या कामावर नियंत्रण ठेवण्याकरिता पुढील अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1) पाली- रोहा उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, 2) तळा- पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, 3) माणगाव- माणगाव उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रशाली दिघावकर, 4)   म्हसळा- श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, 5)   पोलादपूर- महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड.               या अधिकाऱ्यांनी   नगरपंचायत सदस्य पदाच्या (नागरिकांचा मागास प्रवर्ग)आरक्षणाची सोडत काढणे, (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला) इत्यादी ते अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापर्यंतच्या कामावर नियंत्रण ठेवणे, ही कार्यवाही पूर्ण करण्याबाबत शासनाने आदेशित केले आहे.                 राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.29 ऑक्टोबर 2020 च्या आदेशान्वये रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत दि.30 नोव्हेंबर पर्यंत

  अलिबाग जि.रायगड, दि.16 (जिमाका) :-   शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1 जानेवारी 2022 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. 15 ते 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या   आहेत.               60 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक 1 जानेवारी, 2022 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.          नाट्य स्पर्धेकरीता रु.3,000/- इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल.             नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahas

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहर 2021-22 करिता प्रस्ताव द्यावेत

    अलिबाग जि.रायगड, दि.16 (जिमाका) :- शासनाने आंबा व काजू पिकांसाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे. रायगड जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनी लि.मुंबई लि. कंपनी नेमलेली आहे. या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमासंरक्षण मिळते. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित पिकांसाठी (आंबा व काजू) योजना ऐच्छिक आहे.       या योजनेंतर्गत पुढील जोखमीच्या बाबींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस नमूद कालावधीपर्यंत विमा संरक्षण दिले जाईल. काजू पिकासाठी अवेळी पाऊस 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी, कमी तापमान 01 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी, विमा संरक्षित रक्कम रु.01 लाख, गारपीट दि.01 जानेवारी ते 30 एप्रिल, विमा संरक्षित रक्कम 33 हजार 333, विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख दि.30 नोव्हेंबर 2021.        आंबा पिकासाठी अवेळी पाऊस दि.1 डिसेंबर ते दि.15 मे, कमी तापमान दि.1 जानेवारी ते दि.10 मार्च, जास्त तापमान दि.1 मार्च ते दि.15 मे, वेगाचा वारा दि.10 एप्रिल ते दि.15 मे विमा संरक्षित रक्कम रु.01 लाख

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग शोध मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे --जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर

  अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका):- जिल्ह्यात क्षयरोग्यांना शोधण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम जोखीमग्रस्त भागात तसेच शहरी व ग्रामीण भागात हाती घेतलेली आहे. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांनी आज जिल्हा क्षयरोग कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.         ते म्हणाले, दि. 15 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत आरोग्य विभागाचे पथक (आशा स्वयंसेवक, आरोग्य सेवक/सेविका/ आरोग्य सहाय्यक/समुदाय वैद्यकीय अधिकारी) घरोघरी जाऊन संशयित क्षयरुग्णांचा शोध घेणार आहेत. त्यांना तपासणीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रात आणून औषधोपचार केले जाणार आहेत.             जिल्ह्यात जानेवारी 2021 पासून दि. 31 ऑक्टोबर 2021 अखेर क्षयरोगाचे 2 हजार 794 क्षयरुग्ण शोधण्यात आले आहेत. (शासकीय व खाजगी संस्थेमध्ये) असे असले तरी आजही समाजात आणखी क्षयरुग्ण असण्याची शक्यता आहे.   या रुग्णांना शोधून त्यांना क्षयरोगमुक्त करण्यासाठीच सक्रिय क्षयरोग शोध मोहीम दि. 15 ते 25 नोव्हेंबर 2021 दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील अतिजोखमीच्या कार्यक्षेत्र