Posts

Showing posts from December 29, 2019

नारी शक्ती पुरस्कारासाठी मागविले अर्ज

अलिबाग, जि. रायगड, दि.04 (जिमाका) - अपवादात्मक परिस्थितींमध्ये महिलांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणाच्या क्षेत्रांमध्ये किंवा या विषयाशी संबंधीत किंवा आनुषंगीक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे पात्र आहेत. दि. 01/11/2019 रोजी ज्या व्यक्तींचे वय किमान 25 व र्षे आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, तसेच ज्या संस्था, गट, संघटना यांनी किमान 5 वर्षे संबंधीत क्षेत्रात काम केलेले आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार , स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, असे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत.   पारंपारीक व अपारंपारीक क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण महिलांसाठी मुलभुत सुविधा सुकर करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रिडा, कला, संस्कृती इ. अपारंपारीक क्षेत्रांमध्ये ठोसपणे व सार्थपणे बचाव व सुरक्षा, आरोय व निरोगीपणा, शि

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ द्यावा ----जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.04 (जिमाका) - नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झालेला आहे व त्यांना शेती कामांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने   शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर केली असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 01/04/2015 ते 31/03/2019 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची पुनर्गठन/फेरपुनर्गठन करुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात दिनांक 30/09/2019 रोजी मुद्दल व व्याजासहीत थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्

सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 -   सावित्रीबाई फुले यांच्या   जयंतीनिमित्त आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.               जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस   उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.   यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी व महिला कर्मचारी वर्ग आदि उपस्थित होते. 00000

महिला व बालकांनी सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे --जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट विरार मिलिंद पोंगशे

Image
महिला व बालकांनी सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे                                             ---जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट विरार मिलिंद पोंगशे अलिबाग, जि. रायगड, दि.03 (जिमाका) -     महिला व बालकांबाबतचे गुन्हे ,   लैंगिक अत्याचार आणि फसवणूक करताना अनेक समाजकंटक इंटरनेटचा वापर करत आहेत. जिल्ह्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील असून महिला व बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे ,   असे आवाहन जाणीव चॅरिटेबल स्ट्रस्ट विरारचे मिलिंद पोंगशे यांनी केले आहे. सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून उन्नत सप्ताहा निमित्ताने जे.एस.एम.कॉलेज अलिबाग येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी जे.एस.एम.कॉलेज येथील लॉ कॉलेजच्या प्राचार्य ॲङरेश्मा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कदम, श्रीमती स्वाती पवार,पोलीस निरीक्षक श्री.कोल्हे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.साखरकर आदि उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री.पोंगशे म्हणाले की, आपल्या समाजात पुरोगामी बदल घडून आले तरी दुर्देवाने स्त्री म्हणजे उपभोग वस्तू या दृष्टीने पाहण