सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.3- सावित्रीबाई
फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा
प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात
सावित्रीबाई फुले यांच्या
प्रतिमेस उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती यांनी
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी
कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी व महिला कर्मचारी वर्ग आदि उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment