Posts

Showing posts from May 21, 2017

जेनेरिक औषधांचा लाभ सर्वांनी घ्यावा - उद्योग मंत्री सुभाष देसाई

Image
जेनेरिक औषधांचा लाभ सर्वांनी घ्यावा                                                                   -   उद्योग मंत्री सुभाष देसाई अलिबाग दि.27 (जिमाका) जेनेरिक औषधांचा वापर हा आरोग्यासाठी लाभदायक असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज माणगांव येथे केले. प्रबोधन गोरेगांव ग्राहक संस्था मर्यादित संस्थेच्यावतीने माणगांव येथे सुरु करण्यात आलेल्या रायगड जिल्हयातील जेनेरिक औषध पेढीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.            यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले उपस्थित होते. मंत्री महोदय पुढे बोलताना म्हणाले की, प्रबोधन औषधपेढी ही महाराष्ट्रातील पहिली जेनेरिक ISO-9001-2015 औषधपेढी आहे. शरीर स्वास्थासाठी जेनेरिक औषधे उपयुक्त असून याचे दर देखील सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. ही औषधपेढी सुरु करण्यचा मुख्य उद्देश गरीब गरजूनां कमी दरात म्हणजेच सवलतीत औषध उपलब्ध व्हावती हा असल्याने सर्वच ग्राहकांना ब्रँडेड औषधांवर 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या औषध पेढीच्या माध्यमातून ना-नफा-ना-तोटा या तत्वावर गरजू आणि अल्प उत्पन्न गटातील

गाळमुक्त धरण अन गाळयुक्त शिवार दुहेरी लाभांनी होईल समृद्ध आवार

सुधारीत लेख गाळमुक्त धरण अन गाळयुक्त शिवार दुहेरी लाभांनी होईल समृ द्ध आवार आपल्या परिसरातील  धरणांमधून गाळ काढून मागेल त्याला तो शेतात पसरविण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही एक महत्वाची  योजना राबविण्यास शासनाने सुरुवात केली  आहे. या उपयुक्त अशा योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खताच्या खर्चात सुमारे 50%  पर्यंत घट होणार असून दुभत्या जनावरांपासून होणाऱ्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. अगदी दुहेरी लाभाची ही योजना असून यामुळे आपला परिसर,आपले शेत समृद्ध होऊ शकेल अशी ही योजना आहे.शेतकऱ्यांना एका अर्थाने आर्थिक सक्षम करण्याऱ्या योजनेची ही थोडक्यात माहिती….             देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त धरणे आहेत. हे आपल्याला माहितच असेल.मुबलक पाण्याची साठवण क्षमता असलेल्या या धरणांमध्ये आता काही प्रमाणात गाळ साचला आहे. जर हा गाळ उपसा निघाला तर नक्कीच पाणी साठवण वाढेल, शिवाय धरणातील हा गाळ शेतात पसरविल्यास कृषी उत्पन्न वाढीसाठी सुद्धा त्याचा लाभ होऊ शकेल. यासाठी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने शासन निर्णय काढून महत्

गाळमुक्त धरण अन गाळयुक्त शिवार दुहेरी लाभांनी होईल समृद्ध आवार

गाळमुक्त धरण अन गाळयुक्त शिवार दुहेरी लाभांनी होईल समृ द्ध आवार आपल्या परिसरातील  धरणांमधून गाळ काढून मागेल त्याला तो शेतात पसरविण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही एक महत्वाची  योजना राबविण्यास शासनाने सुरुवात केली  आहे. या उपयुक्त अशा योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खताच्या खर्चात सुमारे 50%  पर्यंत घट होणार असून दुभत्या जनावरांपासून होणाऱ्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. अगदी दुहेरी लाभाची ही योजना असून यामुळे आपला परिसर,आपले शेत समृद्ध होऊ शकेल अशी ही योजना आहे.शेतकऱ्यांना एका अर्थाने आर्थिक सक्षम करण्याऱ्या योजनेची ही थोडक्यात माहिती….             देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त धरणे आहेत. हे आपल्याला माहितच असेल.मुबलक पाण्याची साठवण क्षमता असलेल्या या धरणांमध्ये आता काही प्रमाणात गाळ साचला आहे. जर हा गाळ उपसा निघाला तर नक्कीच पाणी साठवण वाढेल, शिवाय धरणातील हा गाळ शेतात पसरविल्यास कृषी उत्पन्न वाढीसाठी सुद्धा त्याचा लाभ होऊ शकेल. यासाठी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने शासन निर्णय काढून महत्वपूर्ण योजनेची

वयोवृद्ध खेळाडूंना मानधन संबंधितांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन

वयोवृ द्ध खेळाडूंना मानधन संबंधितांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन अलिबाग,दि.25:-(जिमाका)- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृद्ध खेळाडूंना त्यांच्या वृद्धापकाळात वित्तीय सहाय्य मिळावे यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, यांच्यामार्फत सन 2017-18  या वर्षाकरिता वयोवृद्ध खेळाडूंना मानधन ही योजना सुरु केली आहे. रायगड जिल्ह्यातील संबंधित खेळाडूंनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी याबाबतचे   प्रस्ताव द्यावेत तसेच या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. 00000000

माथेरान इको सेन्सेटीव्ह झोन सनियंत्रण समितीची 2 जुनला बैठक प्रस्ताव -तक्रारी सादर करण्याचे आवाहन

माथेरान इको सेन्सेटीव्ह झोन सनियंत्रण समितीची 2 जुनला बैठक प्रस्ताव -तक्रारी सादर करण्याचे आवाहन अलिबाग,दि.25:-(जिमाका)- भारत सरकार, पर्यावरण भवन, नवी दिल्ली परिपत्रकान्वये वासुदेव जी.गोरडे (भा.प्र.से.) सेवा निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 9 सदस्यांची सनियंत्रण समिती दोन वर्षाकरीता गठीत करण्यांत आली असून जिल्हाधिकारी रायगड हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. सदर समितीची दुसरी बैठक 2 जून 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एम.टी.डी.सी.) विश्रामगृह दस्तुरी माथेरान ता.कर्जत, जि.रायगड येथे आयोजित करण्यांत आलेली आहे. या संदर्भात भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाकडील दि.04 फेब्रुवारी 2003 च्या अधिसूचनेन्वये रायगड व ठाणे जिल्हयातील एकूण 89 (काही पूर्ण व काही भागत:) गांवाचा प्रदेश संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यांत आला आहे.यात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पुर्ण  1 व भागत: 19, एकूण- 20,खालापूर तालुक्यातील भागत: 10,पनवेल तालुक्यातील पुर्ण 2 व भागत: 38, एकूण- 40,आणि ठाणे जिल्हा अंबरनाथ तालुक्यातील भागत: 19,अशा एकूण 89 गांवांचा प्रदेश समाविष्ट आहे.वर

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

उ द्यो ग मंत्री सुभाष देसाई यांचा रायगड जिल्हा  दौरा कार्यक्रम अलिबाग,दि.25:- (जिमाका)- उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई  हे दिनांक 26 मे 2017 रोजी  रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि.26 मे 2017 रोजी दुपारी 2.00 वाजता मुंबईहून मोटारीने माणगांवकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 माणगांव येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि.27 मे 2017 सकाळी 10.00 वाजता प्रबोधन गोरेगांव ग्राहक सहकारी संस्थेच्या 10 व्या जेनेरिक औषधपेढीचे उदघाटन. सकाळी 11.00 वाजता माणगांव येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण. 0000000

इनलॅण्ड व्हेसल ॲक्ट अंतर्गत यांत्रिक बोटीची नोंदणी आवश्यक --प्रादेशिक बंदर अधिकारी

इनलॅण्ड व्हेसल ॲक्ट अंतर्गत यांत्रिक  बोटीची नोंदणी आवश्यक                                         --प्रादेशिक बंदर अधिकारी अलिबाग,दि.25:-(जिमाका)-प्रादेशिक बंदर अधिकारी, मोरा बंदरे समूह, ठाणे यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वसई, धरमतर, उल्वा, बेलापूर, ट्रॉम्बे,कल्याण-भिवंडी, मांडवा, करंजा, मोरा व तापोळा डॅम येथील जलयान मालकांनी इनलॅण्ड् व्हेसल ॲक्ट अंतर्गत यांत्रिक  बोटीची नोंदणी आवश्यक असल्याचे परिपत्रक कॅप्टन विनायक इंगळे, प्रादेशिक बंदर अधिकारी, मोरा बंदरे समूह, ठाणे यांनी जारी केले आहे. या परिपत्रकात असेही म्हंटले आहे की,ज्या यांत्रिक जलयानांची नोंदणी Identification Number (ओळख क्रमांक) अंतर्गत करण्यात आलेली आहे. अशा सर्व जलयान मालकांना आय.डी.अंतर्गत नोंदणी असलेल्या यांत्रिक जलयानांच्या नोदणीस महालेखाकार (लेखापरिक्षा), मुंबई यांनी आक्षेप घेतल्यामुळे व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मुंबई यांच्या आदेशानुसार या कार्यालयाकडे आय.डी.अंतर्गत करण्यात आलेली यांत्रिक बोटींची नोंदणी रद्द करण्यांत आली आहे. अशा सर्व जलयान मालकांनी  आय.डि. अंतर्गत मूळ नोंदणी

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम अलिबाग,दि.025 (जिमाका) केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे दिनांक 25मे 2017 रोजी  रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून  त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवारी  दि.25 मे 2017 रोजी सकाळी 9.00 वाजता दिल्ली येथून मुंबईकडे प्रयाण. मुंबई येथे आगमन व राखीव.शुक्रवार दि.27 मे 2017 रोजी सकाळी 09.00 वाजता मुंबई येथून ता.चिपळूण जि.रत्नागिरीकडे प्रयाण.दि.28 मे 2017 रोजी सकाळी दुपारी 2.00 वाजता कुणबी भवन, देवरुख, ता.संगमेश्वर, येथून महाडकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वाजता रोहन फाटा, महाड येथे आगमन. महाड एमआयडीसी येथे आगमन व मुक्काम.दि.29 मे 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता महाड येथून  मुंबईकडे प्रयाण. 00000

स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत आत्मा मार्फत भूमिपूजन संपन्न

स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत आत्मा मार्फत भूमिपूजन संपन्न अलिबाग,दि.25:-(जिमाका)-महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प रायगड,अंतर्गत सोमजाई शेतकरी उत्पादक कंपनी इंदापूर ता.माणगावं यांनी 15मे 2017 रोजी भाडोत्री करार तत्वावर घेतलेल्या भुमीचे पुजन करुन शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्र उभारणीचे प्राथमिक कामकाजास सुरुवात केली. यासाठी जिल्ह्यात 8 शेतकरी उत्पादक कंपन्या, कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत झाल्या असून 2 कंपन्यांची नोंदणीची प्रक्रीया चालु आहे. नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यापैकी 4 कंपन्याचे  व्यवसाय विकास आराखडयास राज्यस्तरीय मंजूरी मिळाली आहे. उर्वरीत मंजुर 3 शेतकरी उत्पादक कंपन्यांची प्राथमिक सुविधा उभारण्याचे कामकाज लवकरात लवकर करण्यात येणार असून शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत परिसरात उत्पादित शेतीमालाची प्रक्रीया व विपणन कार्य करुन शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला बाजारभाव मिळवून देण्यात येईल.  या कार्यक्रमास सोमजाई शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, प्रमोद दळवी,दिलीप नवगणे, श्रीराम जाधव, तसेच एम.ए.सी.पी.प्रकल्पाचे तसेच जिल्ह्याचे कृषि पणन तज्ञ टि.वी.शिंदे व सेवा

राज्य युवा पुरस्कार अर्ज करण्यास 31 मे पर्यंत मुद

राज्य युवा पुरस्कार अर्ज करण्यास 31 मे पर्यंत मुदत अलिबाग, दि.24(जिमाका)- जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यस्तर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतात. त्यासाठी संबंधितांनी 31 मे पर्यंत अर्ज करावेत असे आवाहान जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. या पुरस्काराचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे.राज्यस्तरावर युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रीय विभागानुसार प्रत्येक विभागातील एक युवक,एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार देण्यात येतील. गौरवपत्र,सन्मानचिन्ह,रोख रु.50हजार वैयक्तिक पुरस्कार तर संस्थेकरीता गौरवपत्र,सन्मानचिन्ह रोख रु. 1,लाख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. युवा युवतींसाठी पात्रतेचे निकष - अर्जदार युवक,युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च  रोजी 35 वर्षापर्यंत असावे. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी राज्यात 10 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही, पुरस्कार मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही, के

महासैनिक प्रशिक्षण केंद्रामार्फत विविध कोर्सचे आयोजन

महासैनिक प्रशिक्षण केंद्रामार्फत विविध कोर्सचे आयोजन अलिबाग दि.23(जिमाक)- महाराष्ट्र शासन अंगीकृत महासैनिक प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर यांचे मार्फत विविध कोर्स चालविण्यात येणार असून प्रशिक्षण केंद्रात उमेदवारांसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम् सोय केलेली आहे तसेच प्रशिक्षणानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येतात.यासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अ.क्र. कोर्सचे नाव कालावधी कोर्स फी 1. सिक्युरीटी कोर्स 1महिना 5500/- 2. भरतीपूर्व प्रशिक्षण कोर्स 1 महिना 6500/- 3. टेक्नीकल आणि र्क्ल्क रहिवासी कोर्स 02 वर्ष 4000/- अधिक माहितीसाठी महासैनिक प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर यांच्याशी-0231-2663132, 8378842449 व 9021550363 या क्रमांकावर संपर्क करावा. 0000000000000 

बॉईज स्पोर्टस कंपनी निवड चाचणी

बॉईज स्पोर्टस कंपनी  निवड चाचणी अलिबाग दि.23:-(जिमाका)- मॅकनॉईज रेजीमेन्टल सेंटर, अहमदनगर यांचे मार्फत 12 जून ते 14 जुन 2017 रोजी या आरचेरी(तिरंदाजी), शूटींग (निशानेबाजी खेळासाठी खुली निवड व प्रवेश प्रक्रीयेचे आयोजन केले आहे.याकरिता पात्रता पुढीलप्रमाणे आहे. पात्रता:- वयोमर्यादा 11 ते 14  वर्ष, शैक्षणिक पात्रता - कमीत कमी 5 वी पास, (बरोबर इंग्रजी व हिंदीचे चांगले ज्ञान असावे) मेडिकल फिटनेस- मेडिकल चाचणी मॅकनाईज रेजीमेंटल सेंटर, अहमदनगर यांचेकडून घेतली जाईल. प्रमाणपत्रे -उमेदवाराला आपले सब ज्यूनियर,ज्यूनियर नेशनल, ईटर स्कूल,स्टेट लेव्हल खेळाचे मेडल,पार्टीसीपेशन सर्टीफिकेट जमा करावे लागेल.तसेच विशेष सूचना म्हणजे उमेदवाराच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा टेटू (गोंदण )नसावे. यासाठी खेळाडूची उंची व वजन पुढीलप्रमाणे अपेक्षित आहे . खेळ:- आरचेरी(तिरंदाजी) वय मर्यादा-11 ते 14  वर्ष-वय-08 वर्षे उंची:- 134 से.मी.,वजन:-29 कि.ग्रँ ब)शूटींग (निशानेबाजी):- वय मर्यादा-11 ते 14  वर्ष-वय-09 वर्षे उंची:- 139 से.मी.,वजन:-31 कि.ग्रँ. वय-10 वर्षे उंची:- 143 से.मी.,वजन:-34 कि.ग्रँ., वय-11 वर्षे उंची