स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत आत्मा मार्फत भूमिपूजन संपन्न

स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत
आत्मा मार्फत भूमिपूजन संपन्न
अलिबाग,दि.25:-(जिमाका)-महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प रायगड,अंतर्गत सोमजाई शेतकरी उत्पादक कंपनी इंदापूर ता.माणगावं यांनी 15मे 2017 रोजी भाडोत्री करार तत्वावर घेतलेल्या भुमीचे पुजन करुन शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्र उभारणीचे प्राथमिक कामकाजास सुरुवात केली.
यासाठी जिल्ह्यात 8 शेतकरी उत्पादक कंपन्या, कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत झाल्या असून 2 कंपन्यांची नोंदणीची प्रक्रीया चालु आहे. नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यापैकी 4 कंपन्याचे  व्यवसाय विकास आराखडयास राज्यस्तरीय मंजूरी मिळाली आहे. उर्वरीत मंजुर 3 शेतकरी उत्पादक कंपन्यांची प्राथमिक सुविधा उभारण्याचे कामकाज लवकरात लवकर करण्यात येणार असून शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत परिसरात उत्पादित शेतीमालाची प्रक्रीया व विपणन कार्य करुन शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला बाजारभाव मिळवून देण्यात येईल. 
या कार्यक्रमास सोमजाई शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, प्रमोद दळवी,दिलीप नवगणे, श्रीराम जाधव, तसेच एम.ए.सी.पी.प्रकल्पाचे तसेच जिल्ह्याचे कृषि पणन तज्ञ टि.वी.शिंदे व सेवा पुरवठादार संस्था प्रायमुव्ह यांचे अधिकारी रमेश पेटकर,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, माणगांव प्रमोद शिंदे,आदी सभासद उपस्थित होते.

00000000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक