Posts

Showing posts from January 1, 2023

सेवापुस्तके पडताळणीकरिता विभागीय स्तरावर शिबिराचे आयोजन

    अलिबाग,दि.05(जिमाका):-  संचालक,संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांच्या परिपत्रकामधील निर्देशानुसार आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे मोठया प्रमाणावर सेवापुस्तके पडताळणी करणे प्रलंबित असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे तात्पुरते निवत्ती वेतन प्रदान करण्याची प्रकरणे मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. शासन व संचालनालय स्तरावर ही प्रकरणे निकाली काढण्याकरिता व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. विभागीय स्तरावर सेवापुस्तके पडताळणी करण्याकरिता शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरादरम्यान आपल्या अखत्यारीतील कार्यालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येवून जास्तीत जास्त सेवापुस्तके वेतन पडताळणीकरिता वेतन पडताळणी पथक, कोकण भवन येथे सादर करावीत.    तसेच वेतन पडताळणी झालेली अशी प्रकरणे महालेखापाल कार्यालयास सादर करण्यात यावीत. माहे डिसेंबर 2022 च्या वेतन देयकासोबत अशा सर्व तात्पुरती निवृत्तीवेतनधारकांची वेतन पडताळणी पूर्ण झाल्याबाबत कार्यालयप्रमुखाचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे किंवा तात्पुरती निवत्ती वेतन अदा करण्याचे कारण नमूद करावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी श्री. रमेश इंगळे यांनी कळ

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल येथे अप्रेंटिस भरती मेळाव्याचे आयोजन पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा

    अलिबाग,दि.05 (जिमाका) :- शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल येथे दि.09 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  या मेळाव्यासाठी जेएसडब्ल्यू, रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड, दिपक फर्टिलायझर्स लिमिटेड या सारख्या नामांकित आस्थापनाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. शिकाऊ उमेदवारी करिता निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार दरमहा विद्यावेतन आणि कंपनीतर्फे विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येतात. ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी, उमेदवारांनी आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केलेले तसेच बीए, बीकॉम व इतर पदवी/पदविकाधारक उमेदवारांना अप्रेंटिसशिप देण्याच्या दृष्टीने या भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, टीसी, आयटीआय पास/ शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र या मूळ प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतींसह तसेच पासपोर्ट फोटो घेऊन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथे सकाळी 9 वाजेपर्यंत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे पनवेल औद्

वनविभाग रोहा येथे सर्वोत्कृष्ट नाविण्यपूर्ण व विकासात्मक प्रभावी कार्य केल्याबद्दल श्री.अप्पासाहेब निकत यांना राज्यस्तरीय रजत पदक व सन्मानपत्र प्रदान

    अलिबाग,दि.05 (जिमाका) :- रोहा उप वनसंरक्षक श्री.अप्पासाहेब निकत यांना सन 2016 ते 2019 या कालावधीत विभागीय वन अधिकारी या पदावर कार्यरत असतांना त्यांनी 50 कोटी वृक्ष लागवड, चार जैवविविधता बन उद्यानांची निर्मितीव्दारे वनविस्तार, वनविषयक जनजागृती, महाराष्ट्र हरित सेना सदस्य नोंदणी करुन लोकांचा वन विस्तार करण्याकामी सहभाग, कन्या वन समृध्दी शेताच्या बांधावर वृक्ष लागवड निसर्गाची उपासना करण्याकामी जन्म वृक्ष माहेरची झाडी अशा नाविन्यपूर्ण उपक्रम, अटल आनंदवन घन वन ची श्रमदानातून प्रायोगिक तत्वावर यथस्वी निर्मिती आणि विषयावर पुस्तक लेखन व छायाचित्रण तसेच वन विस्तारासाठी तालुकास्तरीय 11 नवीन आधुनिक रोपवाटिका तयार केल्या, अशी सर्वोत्कृष्ट नाविण्यपूर्ण व विकासात्मक प्रभावी कार्य केल्याबद्दल उप वनसंरक्षक रोहा श्री.अप्पासाहेब निकत यांना मंत्री (वने) श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते (दि. 18 डिसेंबर 2022) रोजी वसंतराव देशपांडे सभागृह, आमदार निवास समोर, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे राज्यस्तरीय रजत पदक व सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. 0000000

कोकण सौम्यीकरण योजनेंतर्गत रायगडमधील आपत्ती व्यवस्थापन नियोजनाकरिता जिल्हा प्रशासनाकडून 1 हजार 800 कोटींचा प्रस्ताव शासनास सादर

  अलिबाग,दि.5(जिमाका):- कोकण सौम्यीकरण योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील नवीन व जुन्या खार बांधांचे नूतनीकरण करणे, समुद्र धूप प्रतिबंधात्मक बंधारा बांधणे, चक्रीवादळ, पूर व दरडप्रवण गावांमध्ये बहुउद्देशिय निवारा केंद्र बांधणे, चक्रीवादळ, पूर व दरडप्रवण प्रमुख तालुका मुख्यालय व आपत्तीप्रवण गावांमध्ये भूमीगत विद्युत वाहिनी टाकणे, महाड शहरनजिक सावित्री नदीलगत संरक्षक भिंत बांधणे, बीएसएनएल चे दूरध्वनी भूमीगत लाईन टाकणे, महाड नगरपरिषदेसाठी आवश्यक आपत्कालीन सोयी सुविधा निर्माण करणे, निवारा शेडमध्ये आवश्यक शोध व बचाव साहित्य उपलब्ध करणे इ. विविध आपती सौम्यीकरणाचे प्रस्ताव जिल्हयातील कार्यान्विय यंत्रणांकडून प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दि. 21 डिसेंबर 2022 रोजीच्या बैठकीमध्ये हे प्रस्ताव प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी शासनास सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनास सादर केलेल्या प्रस्तावबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे : खारप्रतिबंधक बांध- नवीन बांध (1) रक्कम रुपये 476.09 जुने बांधाचे पुनर्जीवन (45) रक्

खेळाने आयुष्यमान वाढते -- पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर दुर्ग रायगड येथून राज्य ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ज्योत रवाना

Image
    अलिबाग,दि.4(जिमाका):-  सध्याच्या धकाधकीच्या काळात मैदानी खेळ अत्यंत महत्त्वाचे असून ते नियमित खेळल्याने आयुष्यमान वाढण्यास मदत होते, असे मत महाड येथील पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांनी दुर्ग रायगड येथे आज झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेच्या मुख्य ज्योत प्रज्वलन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.  याप्रसंगी महाड प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी अमित गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, यांच्यासह पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांच्या पत्नी श्रीमती बाविस्कर, सुप्रसिद्ध वेटलिफ्टर प्रतिक्षा गायकवाड, महाड तहसिलदार सुरेश काशिद, क्रीडा विभागाचे निवृत्त सहाय्यक संचालक उदय पवार, कुस्ती या खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी, ऑलिंपियन अजित लाकरा, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जगदाळे तसेच स्थानिक पदाधिकारी, शासकीय अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व शिवशक्ती पुरस्कार विजेते उपस्थित होते.  याप्रसंगी राज्य ऑलिंपिक स्पर्धेला शुभेच्छा देताना पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी सार्वजनिक जीवनात ख

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

    अलिबाग,दि.4(जिमाका):-  मा.भारत निवडणूक आयोगाकडील दि.29 डिसेंबर 2022 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून त्याबाबतची आचारसंहिता दि.29 डिसेंबर 2022 ते दि.4 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू झाली आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे-  निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्दी करण्याचा दिनांक :  गुरुवार, दि.5 जानेवारी 2023,  नामनिर्देशन सादर करण्याचा अखेरचा दिनांक :  गुरुवार, दि.12 जानेवारी 2023,  नामनिर्देशनपत्रांची छाननी:  शुक्रवार, दि.13 जानेवारी 2023, उमेदवारी  अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक :  सोमवार, दि.16 जानेवारी 2023,  मतदानाचा दिनांक व मतदानाची वेळ :  सोमवार, दि.30 जानेवारी 2023, सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत,  मतमोजणीचा दिनांक :  गुरुवार, दि.2 फेब्रुवारी 2023,   निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक :  शनिवार, दि.4 फेब्रुवारी 2023. कोकण विभाग शिक्षक मतदार संघामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग हे 5 जिल्हे समाविष्ट आहेत. प्रस्तावित मतदार केंद्र, कोकण विभाग शिक्षक

ईव्हीएम,व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठीच्या गोदामाच्या बांधकामाचे भूमीपूजन संपन्न

    अलिबाग,दि.02(जिमाका):- ईव्हीएम,व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या गोदामाच्या बांधकामाचे भूमीपूजन मौजे शितोळे, ता.पेण येथे आज दि.2 जानेवारी 2023 रोजी   पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न झाले . यावेळी सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ, पेण तहसिलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे,उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, दादर सागरी पोलीस निरीक्षक गोविंदराव पाटील, उद्योजक राजू पिचिका, डी.एम.पाटील, चेतन पाटील, प्रकाश झावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे यांनी ईव्हीएम,व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या गोदामाच्या बांधकामाच्या बांधकामास साधारणत: 12 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. हे दुमजली आरसीसी फ्रेम स्ट्रक्चरचे एकूण बांधकाम 2 हजार 148 चौरस सेंटीमीटरचे आहे.   या कामाकरिता 8 कोटी 71 लाख 24 हजार 244 इतक्या रकमे

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडा ज्योत रॅलीचे किल्ले रायगडवरून आयोजन

    अलिबाग,दि.02(जिमाका):-   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे दि.05 ते दि.13 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने या स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत रॅली रायगड किल्ल्यावरुन करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.   या स्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या मुख्य ज्योतीचे प्रज्वलन दि.04 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता रायगड किल्ल्यावर करण्यात येणार आहे.   ही मुख्य क्रीडा ज्योत निजामपूर–पाटणूस-ताम्हिणी घाट– मुळशी मार्गे   श्री शिवछपत्रती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे येथे नेण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा आयोजन समितीचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी तसेच क्रीडा विभागाचे अधिकारी-कर्मचारी, रायगड जिल्ह्यातील सर्व क्रीडा पुरस्कारार्थी, महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होणारे रायगड जिल्ह्यातील खेळाडू हे उपस्थित राहणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील स

महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन

    अलिबाग,दि.2(जिमाका): महिला व बाल विकास विभागाच्या दि. 04 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व मुले व प्राधान्याने बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव सांधिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी 35 जिल्ह्यांमध्ये 6 विभागीयस्तर व जिल्हास्तर चाचा नेहरु बाल महोत्सव सन 2022-23 आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. रायगड जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागांतर्गत शासकीय व स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, बालकांसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्यातर्फे जिल्हा क्रीडा संकुल, अलिबाग, नेहुली संगम येथे मंगळवार, दि.03 जानेवारी ते गुरुवार, दि.5 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार, दि.03 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.00 वा. तर बक्षीस वितरण समारोप कार्यक्रम गुरुवार,