ईव्हीएम,व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठीच्या गोदामाच्या बांधकामाचे भूमीपूजन संपन्न

 


 

अलिबाग,दि.02(जिमाका):-ईव्हीएम,व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या गोदामाच्या बांधकामाचे भूमीपूजन मौजे शितोळे, ता.पेण येथे आज दि.2 जानेवारी 2023 रोजी  पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न झाले.

यावेळी सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ, पेण तहसिलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे,उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, दादर सागरी पोलीस निरीक्षक गोविंदराव पाटील, उद्योजक राजू पिचिका, डी.एम.पाटील, चेतन पाटील, प्रकाश झावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे यांनी ईव्हीएम,व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या गोदामाच्या बांधकामाच्या बांधकामास साधारणत: 12 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. हे दुमजली आरसीसी फ्रेम स्ट्रक्चरचे एकूण बांधकाम 2 हजार 148 चौरस सेंटीमीटरचे आहे.  या कामाकरिता 8 कोटी 71 लाख 24 हजार 244 इतक्या रकमेस शासनाकडून तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती दिली. 

त्या पुढे म्हणाल्या की, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी अत्यंत विचारपूर्वक व दूरदृष्टीने ईव्हीएम,व्हीव्हीपॅट मशिन्सच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या गोदामाकरिता रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण तालुक्यातील मौजे शितोळे येथील जागेची निवड केली आहे.  हे ठिकाण जिल्ह्यातील सात मतदारसंघांना जोडणारे आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ईव्हीएम,व्हीव्हीपॅट मशिन्स सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन   व आभार प्रदर्शन पेण तहसिलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे यांनी केले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक