Posts

Showing posts from October 14, 2018

पोलीस स्मृती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना

Image
अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.21 : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पाडीत असताना आपल्या प्राणाची आहुती दिली त्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पोलीस मुख्यालय अलिबाग येथे राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळी ८ वाजता पोलीस मुख्यालय येथे स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना मानवंदना दिली.  यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल  पारसकर, अपर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ तसेच पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

आज पोलीस स्मृती दिन

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.20 : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पाडीत असताना आपल्या प्राणाची आहुती दिली त्या हुतात्म्यांचे स्मरणार्थ 21 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वा.   पोलीस मुख्यालय अलिबाग येथे हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे, असे सचिन गुंजाळ (म.पो.से.) अपर पोलीस अधिक्षक रायगड यांनी कळविले आहे. 00000

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.20 , राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे रविवार दि.21 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. रविवार दि.21 रोजी रात्री दीड वा. तुषार शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव.  सकाळी अकरा वा. कोळी महासंघ महामेळावा व सत्कार समारंभास उपस्थिती.  स्थळ : पी.एन.पी.नाट्यगृह अलिबाग.  दुपारी एक वा. अलिबाग येथून मुंबईकडे प्रयाण. 00000

जागतिक अंडी दिवस जिल्ह्यात 52 हजार अंडी वाटप

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20-   जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी जागतिक अंडी दिन (दि.१२) साजरा करण्यात आला.यानिमित्त आयोजित कार्यक्रमातून ५२ हजार अंड्यांचे वाटप करण्यात आले व अंड्यांचे आहारातील महत्त्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये आदिवासी आश्रमशाळा, आदिवासी पाड्यातील शाळा,अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, आदिवासीपाडा पंचायत समिती सर्व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1, राज्यस्तरीय व जिल्हा परिषदेकडील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 येथील कार्यक्षेत्रात लोकसहभागातून व अंडी निर्माण करणाऱ्या कुक्कटपालन व्यावसायिकांच्या सहकार्याने 52 हजार अंड्याचे वाटप करण्यात आले.   अंडे हे निसर्ग निर्मित अन्न आहे.   अंड्यामध्ये शरीराची जडणघडण करणारी प्रथीने आणि नऊ अत्यावश्यक अमिनो ॲसिडस आहेत.   मानवी शरीरासाठी आवश्यक असलेल्या प्रथीने, जीवनसत्वे, खनिजे व स्निग्ध पदार्थ या पोषणमूल्यांचे संतुलित प्रमाण अंड्यांमध्ये असते.    साधारण आकाराच्या कोंबडीच्या अंड्यापासून सरासरी 66 किलो कॅलरी एवढी उर्जा मिळते व ती मानवी आहारात लागणाऱ्या सरासरी उर्जेच्या तीन टक्

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.17 , राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे शुक्रवार दि.19 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. शुक्रवार दि.19   रोजी पहाटे एक वा.शासकीय विश्रामगृह रोहा येथे आगमन व राखीव.   सकाळी 6.30 वा. ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळा येथे आगमन व शासकीय मानवंदना सोहळ्यास उपस्थिती.          स. नऊ वा. सौ.मेघना ओक यांचे निवासस्थानी भेट स्थळ : धनगर आळी रोहा.   स.दहा वा. भाजपा कार्यकर्ता संवाद व बैठक.   स्थळ : शासकीय विश्रामगृह रोहा.   दु. बारा वा. रोहा येथून कर्जतकडे प्रयाण.   दु.दोन वा. श्री.पंढरी भोईर, यांच्या हॉटेलचे उद्घाटन. स्थळ : भिसेखिंड, कर्जत.   दु.तीन वा. भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.   दु.4.30 वा.   मोटारीने मुंबईकडे प्रयाण. 00000

केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17 -    केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे-            शुक्रवार दि. 19 रोजी सकाळी साडे आकरा वा. धावीर देवस्थान ट्रस्ट्र रोहा येथे आगमन. दुपारी साडे बारा   वा. धावीर देवस्थान ट्रस्ट्र रोहा येथून प्रयाण. दु. दीड वा. इंदापूर ता.माणगांव येथे आगमन. दु. साडे तीन वा. इंदापूर, ता.माणगांव येथून प्रयाण. दु.चार वा. द वाई अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक लि.मोर्बा रोड खांदाड माणगांव येथे आगमन. सायं. सहा वा. मोर्बा रोड खांदाड येथून श्रीवर्धनकडे प्रयाण. सांय. साडे सात वा. एमटीडीसी विश्रामगृहात हरिहरेश्वर येथे आगमन व मुक्काम. शनिवार दिनांक 20 रोजी सकाळी 10 वा. एमटीडीसी विश्रामगृह येथून हरिहरेश्वर मंदिराकडे प्रयाण. सव्वा दहा वा. हरिहरेश्वर मंदिर येथे आगमन. साडे आकरा वा. हरिहरेश्वर मंदिर येथून प्रयाण. दुपारी बारा वा. आर.पी.दिवेकर हायस्कूल दांडगुरी येथे आगमन. दु. अडीच वा. आर.पी. दिवेकर हायस्कूल दांडगुरी येथून प्रयाण. दुपारी तीन वा. रानवली समाज मंदिर श्रीवर्धन येथे आगमन. साडे तीन वा.

शिष्यवृत्ती मिळण्यासाठी 15 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत

अलिबाग , जि. रायगड (जिमाका) दि. 17- सन 2018-19 पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. “ महाडीबीटी ” हे संकेतस्थळाचे नाव असून https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ संचालक, माहिती व तंत्रज्ञान (DIT) यांच्या मार्फत नव्याने कार्यान्वित करण्यात आली आहे.  शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती /शिक्षण फी व परिक्षा फी /विद्यावेतन/निर्वाह भत्ता वितरित करण्याच्या खालील योजनांचा समावेश या संकेतस्थळामध्ये करण्यात आला आहे.   भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती.   राज्य शासनाचे मॅट्रीकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रतिपुर्ती योजना. राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (इ. 11 वी , 12 वी)4. व्यवसायिक अभ्यासक्रमामधुन शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना. सदर डीबीटी पोर्टलव्दारे विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्यांना देय होणारी शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, शिक्षण फी, परिक्षा फी इतर अनुज्ञेय फी, त्यांच्या आधार संलग्न खात्यावर थेट वितरित केली जाणार आहे. त्या करिता विद्यार्थ्यांनी आपले आधारकार्ड क्र

सप्तमी, अष्टमीला ध्वनीक्षेपक मर्यादा मध्यरात्रीपर्यंत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15-   नवरात्रौ उत्सव कालावधीतील दोन दिवस (सप्तमी व अष्टमी) या दिवशी श्रोतागृह, सभागृह, सामुहिक सभागृह आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी ध्वनीक्षेपक वापराची मर्यादा सकाळी 6.00 वाजेल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आले असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी   तथा जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी जारी केले आहेत. 00000

‘दिशा’ समिती बैठक लाभार्थ्यांपर्यंत वेळेत लाभ पोहोचविण्याची यंत्रणेने दक्षता घ्यावी- केंद्रीय मंत्री ना. गिते

Image
अलिबाग,जि. रायगड, दि.15,(जिमाका)- केंद्र शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. या योजनांमधून होणारी लोकहिताची कामे वेळेत पूर्ण करुन लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याची यंत्रणेने दक्षता घ्यावी, असे निर्देश केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना. अनंत गिते यांनी आज येथे दिशा संनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज दिशा संनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री ना. अनंत गिते हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आ. धैर्यशिल पाटील, तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच किशोर जैन, जि. प विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे सर्व सदस्य व सर्व विभागांचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.  बैठकीच्या प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी, आंबेनळी घाट अपघातातील मृत, केरळ पुरग्रस्त आदींबा