शिष्यवृत्ती मिळण्यासाठी 15 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17- सन 2018-19 पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. महाडीबीटी हे संकेतस्थळाचे नाव असून https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ संचालक, माहिती व तंत्रज्ञान (DIT) यांच्या मार्फत नव्याने कार्यान्वित करण्यात आली आहे.  शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती /शिक्षण फी व परिक्षा फी /विद्यावेतन/निर्वाह भत्ता वितरित करण्याच्या खालील योजनांचा समावेश या संकेतस्थळामध्ये करण्यात आला आहे.
 भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती.   राज्य शासनाचे मॅट्रीकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रतिपुर्ती योजना. राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (इ. 11 वी , 12 वी)4. व्यवसायिक अभ्यासक्रमामधुन शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना.
सदर डीबीटी पोर्टलव्दारे विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्यांना देय होणारी शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, शिक्षण फी, परिक्षा फी इतर अनुज्ञेय फी, त्यांच्या आधार संलग्न खात्यावर थेट वितरित केली जाणार आहे. त्या करिता विद्यार्थ्यांनी आपले आधारकार्ड क्रमांक आपल्या बँक खात्याशी संलग्नीत करून द्यावेत.
महाडीबीटीची वैशिष्ट्ये1. लाभार्थी कोणत्याही वेळी कुठूनही महाडीबीटीच्या वेबसाईट वर नोंदणी करू शकतात.
2. लाभार्थी त्यांच्या स्वत:च्या अर्जाची स्थिती युजर आयडीने पाहु शकतात.3.सुलभ पडताळणी, आणि पारदर्शकता यासाठी मार्कशीट्स, जात प्रमाणपत्र इत्यादी अपलोड करू शकतात.4. महाडीबीटी प्रक्रियेच्या विविध स्तरांवर विद्यार्थी आणि संस्थांना एसएमएस आणि ई-मेल अलर्ट ची तरतुद.5. विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात शिष्यवृत्तीचे प्रत्यक्ष वितरण.6. सुलभ शिष्यवृत्ती मंजुरीची प्रक्रिया.7. भुमिका आधारित युनिक लॉग इन आयडी आणि पासवर्ड सर्वासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.8. विभाग आणि राज्य प्राधिकरण यांच्या व्दारे शिष्यवृत्तीच्या देखरेखीची पारदर्शकता.9. कोणत्याही स्वरूपाच्या तांत्रिक बाबींची अडचण उद्भवल्यास संकेतस्थळावरील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्यास कळविले आहे. (टोल फ्री क्रमांक:- 022-49150800) 10. पात्रतेचे निकष विभागाचे संकेतस्थळ https://sjsa.maharashtra.gov.in वर देखील उपलब्ध आहे. 
  
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्वे
             योजनांचे ऑनलाईन अर्ज MAHADBT PORTAL(संकेतस्थळ) https://mahadbtmahait.gov.in वर देण्यात आलेल्या युजर मॅन्युअल /एफ.ए.क्यु.चा वापर करुन ऑनलाईन पध्दतीने व पोर्टलवर दिलेल्या सुचनांचे पालन करुन अर्ज भरण्याच्या विहीत तारखेपर्यंत न थांबता संपुर्ण अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरुन दयावा.   अर्जदार शिष्यवृत्तीसाठी निर्धारित केलेल्या सर्व अटी लागु करण्यासाठी व पुर्ण करण्यासाठी पात्र आहे. याची खात्री करण्याची संपुर्ण जबाबदारी अर्जदाराची असेल.  जर अर्जदाराची पात्रता कोणत्याही टप्प्यावर अवैध आढळली तर त्याची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल.  अर्जदाराने अंतिमत: अर्ज जमा करण्यापुर्वी  तपासावे की, त्याच्या/तिच्याव्दारे प्रदान केलेले सर्व तपशील योग्य आहेत. कारण त्यानंतर माहीती संपादीत करण्यासाठी कोणतीही तरतुद प्रणाली मध्ये नसेल.  शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची पध्दत केवळ ऑनलाईनच असेल.  '*' चिन्हास जे रकाने चिन्हांकीत आहे ते भरणे अनिवार्य असेल.  ज्या विद्यार्थ्यांचे आथारकार्ड क्र. मोबाईल क्रमांकाशी संलग्नीत नाहीत. त्यांनी त्वरीत जवळच्या आधारकेंद्रावर जाऊन आपले आधारक्रमांक मोबाईल क्रमांकाशी संलग्न करुन घ्यावे.
सर्व संस्थांच्या /महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सुचना देण्यात येते की, उपरोक्त योजनांची माहीती संस्थेच्या दर्शनी भागातील सुचना फलकावर कायमस्वरुपी लावावी व पात्र विद्यार्थ्यांना वरील योजनांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी सहकार्य करावे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन भरलेल्या अर्जांची पुढील कार्यवाहीसाठी ऑनलाईन पध्दतीने छाननी करावी.
विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्या बाबतची  सूचना डी.बी.टी. पोर्टलव्दारे प्रत्येक महाविद्यालयाला दिली जाईल. त्यामुळे संबंधित विद्यापीठ /शैक्षणिक संस्था/महाविद्यालय/तंत्रनिकेतने यांनी कोणत्याही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेऊ नये. तसेच कोणत्याही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणुक होणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्याची  जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थांची असेल.
 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी दिनांक 15/11/2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घ्यावयाची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थांची असेल असे                                                                                                                                              रविकिरण पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,  रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक