Posts

Showing posts from September 27, 2020

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी वाहिली आदरांजली

Image
  अलिबाग,जि.रायगड,दि.2, (जिमाका)-  राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.        यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के- पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, तहसिलदार सतिष कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कुलाबा किल्ल्यावर जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन

  अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) :-   राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि.02 ऑक्टोबर रोजी, सायं.4.00 वा. अलिबाग येथील कुलाबा किल्ला येथे जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यासह जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर तसेच जिल्ह्यातील अन्य शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. ०००००

स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न

                अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) :-   दि. 01 ऑक्टोबर “ राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान ” दिनानिमित्ताने सी.आय. एफ.एस.थळ, पोलीस पाटील संघटना आणि जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे   आयोजन करण्यात आले होते.        राष्ट्रीय स्वैच्छिक दिनानिमित्ताने रक्तदात्यांमध्ये रक्तदानाविषयी जागृती व्हावी, तसेच रुग्णालयात तातडीच्या शस्रक्रिया, प्रसूती, थँलेसिमिया, हिमोफिलिया, अपघात अशा रुग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते.   यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन गरजू रुग्णांना तातडीच्या वेळेस रक्ताची कमतरता भासू नये यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, डॉ.दिपक गोसावी यांच्या पुढाकाराने “ स्वेच्छेने रक्तदान करु या आणि कोरोना लढ्यात सहभागी होऊ या! ” याउद्देशाने स्वैच्छिक रक्तदान शिबीर रक्तपेढीत आयोजित करण्यात आले होते . या शिबिरात सी.आय.एस.एफ,थळ, रक्तपेढी प्रमुख डॉ. दिपक गोसावी, डॉ. अमोल भुसारे, डॉ पोटे, रक्तपेढी तंत्रज्ञ सुनील बंदिछोडे आदी सर्वांनी मिळून एकूण 33 जणांनी स्वैच्छिक रक्तदान केले. यावेळी सोशल डिस्टन

करोना नियंत्रणासाठी व्यापारी उद्योजकांचा सहभाग महत्त्वपूर्ण -राज्यमंत्री कु.आदिती तटकरे महाराष्ट्र चेंबर व राजारामपुरी असोसिएशन तर्फे जनजागरण अभियानाचा शुभारंभ

    अलिबाग,जि.रायगड दि.30 (जिमाका) :-   करोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जनजागरण आवश्यक असून त्यासाठी व्यापारी उद्योजकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे   प्रतिपादन राज्याच्या पर्यटन, पर्यावरण, माहिती व जनसंपर्क , राजशिष्टाचार, विधी व न्याय, उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.     महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा शुभारंभ, माहितीपत्रकाचे प्रकाशन व मास्कचे अनावरण कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, वेदांत पाटील, सागर नागरे आदी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्याचा वृत्त्तांत विषद केला.   राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी असोसिएशनच्या रौप्य   मह

राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन

  वृत्त क्रमांक :-1243                                                                                दिनांक :- 30 सप्टेंबर, 2020     अलिबाग,जि.रायगड दि.30 (जिमाका) :-   दि.1 ऑक्टोबर राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त   जिल्हा शासकीय रक्त केंद्र , जिल्हा रुग्णालय, रायगड-अलिबाग येथे सकाळी 10.00   ते सायं. 5.00 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.   या स्वैच्छिक रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.दिपक गोसावी, रक्तपेढी तंत्रज्ञ हेमकांत सोनार यांनी केले आहे. ००००००

“ स्वेच्छेने रक्तदान करू या” “करोनाविरूद्धच्या लढ्यात हातभार लावू या .!”

  विशेष लेख क्र.29                                                                                             दिनांक :- 30 सप्टेंबर 2020                “ राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस ” सर्वप्रथम   01 ऑक्टोबर 1975 साली Indian Society Of Blood Transfusion and Immunoheamatology ( इंडियन सोसायटी आँफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँड इम्युनोहिमॅटोलॉजी ) व्दारे “ व्यक्तीच्या जीवनात रक्ताची आवश्यकता आणि रक्ताचे महत्त्व ” यासाठी साजरा करण्यात आला.   ISBTI(आय.एस बी.टी आय.)ची स्थापना दि.22 ऑक्टोबर 1971 साली डॉ. जे.जी ज्वाली आणि श्रीमती के.स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली झाली.             ◆ स्वैच्छिक रक्तदानासाठी आवाहन :-             देशात तसेच महाराष्ट्रात कोविड-19 कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यामुळे या काळात सर्वात मोठा फटका रक्तपेढ्यांना झाला आहे. रक्ताचा तुटवडा भासू नये तसेच करोनाविषाणूचा   संसर्ग टाळण्यासंबधी शासनातर्फे देण्यात आलेल्या सगळ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून स्वैच्छिक रक्तदान करण्याचे आवाहन शासनस्तरावरुन करण्यात आले, आपण जर रक्तदान करताना   सोशल डिस्टन्सिंगचा, सॅनिटायझर

मोटार वाहन निरीक्षकांचा ऑक्टोबर महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर

    अलिबाग,जि.रायगड दि.29 (जिमाका) :-   उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा ऑक्टोबर-2020   महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर झाला असून शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे- सोमवार दि.05ऑक्टोबर दि.12 ऑक्टोबर व दि.19 ऑक्टोबर 2020 रोजी ता. महाड.   मंगळवार दि.06 ऑक्टोबर व दि.20 आक्टोबर 2020   रोजी ता.श्रीवर्धन.   बुधवार दि. 07 ऑक्टोबर व दि.21 ऑक्टोबर 2020   रोजी माणगाव.    शुक्रवार दि.09, दि.16 व दि.23 ऑक्टोबर 2020 रोजी ता.अलिबाग.   मंगळवार दि.13 ऑक्टोबर 2020 रोजी ता.रोहा. बुधवार दि.14 ऑक्टोबर 2020 रोजी ता.मुरुङ ००००००

स्वदेस फॉउंडेशन मार्फत जागतिक हृदयरोग दिवस साजरा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा विशेष सहभाग

  अलिबाग,जि.रायगड दि.29 (जिमाका) :-   आज दि.29 सप्टेंबर या जागतिक हृदयरोग   दिवसाचे औचित्य साधून स्वदेस फाऊंडेशन तर्फे हृदयरोग शस्रक्रिया झालेल्या मुलांसोबत तसेच पालकांसोबत   डिजिटल झूम अँप   च्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, स्वदेस फौंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला, झरीना स्क्रूवाला, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने,   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, वोक्हार्ट हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनीष चोखान्द्रे, स्वदेस फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मंगेश वांगे, महाव्यवस्थापक तुषार इनामदार, महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्र यादव उपस्थित होते. पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी स्वदेस फॉउंडेशन तर्फे लहानमुलांच्या जन्मजात हृदयरोग तपासणी व शस्रक्रिया कार्यक्रमाचे   कौतुक केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले व हृदयाचे ऑपरेशन झालेल्या मुलांना शुभेच्छा दिल्या.   स्वदेस फौंडेशनने गेल्या पाच वर्षात

“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन..” उक्तीप्रमाणे जीवनाची वाटचाल करावी --जिल्हाधिकारी निधी चौधरी

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.29 (जिमाका) :-   जीवनाचा दृष्टीकोन विशाल ठेवून “ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.. ” या उक्तीप्रमाणे फळाची अपेक्षा न करता जीवनात चांगले कर्म करीत जीवनाची वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज येथे केले.   जिल्हा प्रशासन आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था रोहा, स्पर्धा विश्व ॲकडमी, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान तसेच “ माझे कुटुंब-माझी जबाबदारी ” या मोहिमेची विस्तृत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे ऑनलाइन व्याख्यान गुगल मिट द्वारे आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.   यावेळी राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा   प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबागच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहाच्या अध्यक्षा सुचिता साळवी, जे.एस.एम.कॉलेज, अलिबागचे प्राध्यापक प्रेम आचार्य, स्पर्धा विश्व ॲकडमी रायगडचे संचालक तसेच   स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक युवती उपस्थित होते.   जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्वप्रथम “

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगारांमधून पास, स्मार्ट कार्ड कार्यप्रणाली, नोंदणीकरण, नूतनीकरण प्रक्रिया सुरु

    अलिबाग,जि.रायगड दि.28(जिमाका) :-   राज्य परिवहन महामंडळाची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आगारांमधून विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक, मासिक, त्रैमासिक पास, आवडेल तेथे प्रवास पास, स्मार्ट कार्ड कार्यप्रणाली, नोंदणीकरण, नूतनीकरण व टॉपअप अशा सर्व   प्रक्रिया सुरु करण्यात आल्या असून स्मार्ट कार्ड नोंदणीकरण पूर्ववत सुरु करण्यात आले आहे. या प्रक्रिया आगारातील बसस्थानकावरील स्मार्ट कार्ड वितरण केंद्रावर कोविड-19 बाबतच्या शासन निर्णयाचे पालन करुन करण्यात येणार आहे. इच्छुक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन   महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रायगड विभागाच्या विभाग नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के यांनी केले आहे. ००००००

जिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्तिक प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार--खासदार सुनिल तटकरे

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.28(जिमाका) :-   आधी करोनाचे संकट, त्यानंतरचे निसर्ग चक्रीवादळाचे संकट यामुळे जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला बळ देण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्नशील तर आहेच.   मात्र इन्श्युरन्स कंपन्या आणि पोल्ट्रीधारकांनी सामंजस्य वृध्दींगत करुन एकमेकांमधील विश्वासार्हता टिकवावी तसेच जिल्हा प्रशासन व राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्तिक प्रयत्नातून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास निश्चित साधला जाईल, असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी आज येथे व्यक्त केला. जिल्ह्यातील पोल्ट्रीधारकांच्या अडीअडचणीविषयी उपाययोजना राबविण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह येथे इन्श्युरन्स कंपन्यांचे अधिकारी, पोल्ट्रीधारक शेतकरी असोसिएशनचे पदाधिकारी, पोल्ट्रीधारक शेतकरी यांची बैठक खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, कृषी व पशुसवंर्धन सभापती बबन मनवे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, निवा