स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न

 


 

            अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) :-  दि. 01 ऑक्टोबर राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्ताने सी.आय. एफ.एस.थळ, पोलीस पाटील संघटना आणि जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते.

       राष्ट्रीय स्वैच्छिक दिनानिमित्ताने रक्तदात्यांमध्ये रक्तदानाविषयी जागृती व्हावी, तसेच रुग्णालयात तातडीच्या शस्रक्रिया, प्रसूती, थँलेसिमिया, हिमोफिलिया, अपघात अशा रुग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते.  यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन गरजू रुग्णांना तातडीच्या वेळेस रक्ताची कमतरता भासू नये यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, डॉ.दिपक गोसावी यांच्या पुढाकाराने स्वेच्छेने रक्तदान करु या आणि कोरोना लढ्यात सहभागी होऊ या! याउद्देशाने स्वैच्छिक रक्तदान शिबीर रक्तपेढीत आयोजित करण्यात आले होते .

या शिबिरात सी.आय.एस.एफ,थळ, रक्तपेढी प्रमुख डॉ. दिपक गोसावी, डॉ. अमोल भुसारे, डॉ पोटे, रक्तपेढी तंत्रज्ञ सुनील बंदिछोडे आदी सर्वांनी मिळून एकूण 33 जणांनी स्वैच्छिक रक्तदान केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्कचा वापर करण्यात आला होता.

            हे रक्तदान यशस्वी करण्यासाठी डॉ.दिपक गोसावी, हेमकांत सोनार, सुनील बंदिछोडे, पुनम पाटील, चेतना वर्तक,मनिषा नवाळे, प्रज्ञा पवार, उमेश पाटील, संकेत घरत आदी परिश्रम घेतले.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक