Posts

Showing posts from June 11, 2023

रेवदंडा-साळाव पुलावरील 12 टनावरील अवजड वाहतुकीबाबत बंदी आदेश जारी

  अलिबाग,दि.15 (जिमाका):-  अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार रेवदंडा साळाव पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी दूर्घटना टाळण्याच्या दृष्टीने तसेच पुलाची पुर्नबांधणी व दुरुस्तीचे काम करण्याकरिता रेवदंडा-साळाव पुल दि.29 ऑगस्ट 2024 पुलावरून 12 टनावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत.      त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी अधिसूचनेच्या दिनांकापासून रेवदंडा-साळाव पुलावरील 12 टनावरील अवजड वाहतूक दि.29 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत बंद करुन अलिबाग ते साळाव दरम्यान होणारी अवजड वाहनाची वाहतूक ही अलिबाग-पोयनाड-वडखळ-नागोठणे-को लाड-रोहा-तळेखार-साळाव मार्गे अथवा अलिबाग-पेझारी चेकपोस्ट- नागोठणे - कोलाड- रोहा- तळेखार - साळाव मार्गे तसेच दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग-बेलकडे-वावे-सुडकोली-रो हा-तळेखार-साळाव मार्गे व मुरुड अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूक ही मुरुड- साळाव- तळेखार-चणेरा-रोहा-कोलाड - नागोठणे- वडखळ-पोयनाड -अलिबाग अथवा मुरुड - साळाव - तळेखार-रोहा-कोलाड-

जवाहर नवोदय विद्यालयात जी-20 कार्यशाळा संपन्न

    अलिबाग,दि.15 (जिमाका):- जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, रायगड येथे दि. 14 जून 2023 रोजी एक दिवसीय जी-20 कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात ग.रा. मेथा हायस्कूल, निजामपूर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, निजामपूर येथील 20 शिक्षक तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 40 विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य के. वाय. इंगळे यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. G- 20 परिषदेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, की विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देणं हा या गटाचा उद्देश आहे. G  20 राष्ट्रगटाचं अध्यक्षपद फिरतं असतं आणि डिसेंबर 2022 पासून ते वर्षभरासाठी भारताकडे आले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात बोलताना त्यांनी हे धोरण विद्यार्थी तसेच शिक्षक या दोघांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून नजीकच्या काळात या धोरणाला संपूर्ण देशभरात अधिकाधिक सक्रिय पद्धतीने राबविले जाणार आहे असे सांगितले. यावेळी नवोद

“शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

      अलिबाग,दि.15 (जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व लोकनेते दि.बा.पाटील, नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा   शनिवार दि.24 जून, 2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे महात्मा फुले सभागृह ता.पनवेल जि. रायगड  या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. त्यासा़ठी या कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या आस्थापनांनी या विभागाचे  https://rojgar.mahaswayam.gov. in  या संकेतस्थळावर प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती भरावी.  ही माहिती भरताना प्रथम उपरोक्त संकेतस्थळावर Employment - Employer (List a Job)- Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील  Pandit Dindayal Upadhyay Job Fair  या ऑप्शनमधून दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्हयाच्या नावावरील View Details - Job Details - Agree and Post Vacancy-

9 वा आंतरराष्ट्रीय योगा दिन दि.21 जून रोजी होणार उत्साहात साजरा सर्व शासकीय, निमशासकीय विभागांनी सहकार्य करण्याचे आवाहन

    अलिबाग,दि.15 (जिमाका):-  केंद्र शासनाने दि.21 जून 2023 हा दिवस नववा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.  मा.पंतप्रधान महोदयांनी सन 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दि.21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने दरवर्षी दि. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. येत्या दि. 21 जून रोजी अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानातील जंजिरा सभागृह येथे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली 9 वा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी दिली आहे. योगा दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्विकारणे व तो करणे, ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे. दि.21 जून 2023 या आंतरराष्ट्रीय योगा दिनाची तयारी सुरू असून जगभरात

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

    अलिबाग,दि.15 (जिमाका):-  शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत रायगड जिल्ह्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील होतकरु व बेरोजगार व्यक्तींना व्यवसाय, स्वयंरोजगार करण्याकरिता अल्प व्याजदराने विविध योजनेंतर्गत कर्ज देण्यात येते. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. तरी या योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या गरजू व्यक्तींनी, विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या श्री राम समर्थ गृहनिर्माण सह.सो.पहिला मजला, रुम नं.101, मारुती मंदिराच्यामागे, चेंढरे, अलिबाग, दूरध्वनी क्रमांक – 02141-224448,ईमेल -  dmobcalibagraigad@gmail.com  या पत्यावर अथवा महामंडळाच्या वेबसाईट  www.msobcfdc.org संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री.निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे. योजनेचा उद्देश - इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत मंजूर केलेल्या रु.20 लक्ष पर्यंत कर्ज रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केला जाईल. योजनेचे स्वरूप - राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी

अपंग, मूकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत

    अलिबाग,दि.15(जिमाका) :-   दिव्यांग कल्याण आयुक्तालय, म.रा.पुणे मार्फत शासन मान्यताप्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर या संस्थेत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग, मूकबधीर, मतिमंद, मुला-मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे.  या प्रशिक्षण केंद्रात शिवण, कर्तन कला, कॉम्प्युटर अकॉऊटिंग व ऑफिस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रिकेटर इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशितांची निवासाची व जेवणाची विनामूल्य सोय केली जाणार आहे. तरी इच्छुक अपंग, मूकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी दि.05 जुलै 2023 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि.नांदेड येथे अर्ज सादर करावेत किंवा समक्ष भेटावे. अधिक माहितीसाठी मो.क्र.9960900369, 9403207100, 7378641136, 9420846887 वर संपर्क साधावा, असे आवाहन कर्मशाळा अधीक्षक, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर यांनी कळविले आहे. ०००००००

सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणाचा इच्छुकांनी लाभ घ्यावा

                अलिबाग,दि.15 (जिमाका):-  मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व  परिचालन या  प्रशिक्षणाच्या  दि.01 जुलै 2023 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रायगड-अलिबाग येथे सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांकडून दि.30 जून 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा मोबाईल व व्हॉट्सअप क्र.9860254943 वर संपर्क साधल्यास विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्ज स्वत:च्या हस्ताक्षरात भरुन त्यावर संस्थेची शिफारस घेवून दि.30 जून 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी व्हॉट्सअप क्र. 9860254943 वर किंवा  ftoalibag@rediffmail.com  या ईमेल वर सादर करावेत.        अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रायगड-अलिबाग, 102/103 समृध्दी को.ऑप.हौसिंग सोसायटी, घरत आळी, एसटी स्टँडजवळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सु.शं.बाबुलगावे यांनी केले आहे. प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कें

“शासन आपल्या दारी..!” अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

                 कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते.गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकास प्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हे लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळावेत, यासाठी शासनाने  “ शासन आपल्या दारी..! ”  हा एक महत्वाकांक्षी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.               या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्दी करण्यात येत असून काय आहेत शासकीय योजना.. जाणून घेवू या या लेखातून...              राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनुसूचित जमातीच्या एकूण 10 विद्यार्थ्यांना परदेशात एम.बी.ए., वैद्यकीय शिक्षण, बी.टेक (इंजिनिअरींग ), कृषी, विज्ञान व इतर विषयांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना आयुक्तालयस्तरावर राबविण्यात येत आहे....या योजनेबाबतचा माहितीपू

आदिम जमातींची दिल्ली येथे अभ्यास कार्यशाळा

   अलिबाग,दि.12(जिमाका) :-  जनजाती कार्य मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रधानमंत्री पीव्हीटीजी डेव्हलपमेंट मिशन अंतर्गत आदिम जमाती कॉन्फरन्स कम एक्सपोजर व्हिजिट नवी दिल्ली येथे दि.10 जून ते दि.14 जून 2023 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे.   संपूर्ण भारतात एकूण 75 आदिम जमाती आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये कातकरी,कोलाम व माडिया गोंड या तीन आदिम जमाती वास्तव्यास आहेत. रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने कातकरी आदिम जमात मोठ्या प्रमाणात आहे.. या कार्यशाळेकरीता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण मार्फत रायगड जिल्ह्यातील दोन कातकरी बांधवांना कार्यशाळेत जाण्याची संधी मिळाली आहे. या देशस्तरीय कार्यशाळेमध्ये महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुरमु यांच्याशी भेटण्याची व त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे संधी मिळणार आहे तसेच राष्ट्रपती भवन व संसद भवन येथेही भेट देणार आहेत. या कार्यशाळेकरिता कातकरी बांधवांना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण श्रीमती शशिकला अहिरराव  यांनी शुभेच्छा देऊन ही टीम दिल्लीकडे रवाना झाली. ०००००००

दि.28 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

    अलिबाग,दि.12(जिमाका) :-  अधीक्षक डाकघर रायगड विभाग , अलिबाग कार्यालयाद्वारे  बुधवार,  दि.28  जून 2023  रोजी ,  सकाळी ठीक 11 वाजता डाक अदालत आयो जि त करण्यात आली आहे.          या डाक अदालतीमध्ये   रायगड विभागातील डाक सेवेसंबंधित तक्रार, समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही ,  अ शा  टपाल ,  स्पीडपोस्ट ,  काऊटर सेवा ,  बचत बँक ,  मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.     तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक ,  ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. तरी इछूक ग्राहकांनी आपली तक्रार  दोन  प्रतीत   अधीक्षक डाकघर रायगड विभाग यांच्याकडे दि.27  जून 2023 पर्यंत पोहोचतील अशारितीने पाठवावी, असे आवाहन  डाकघर रायगड विभाग अधीक्षक डॉ.संजय लिये  यांनी केले आहे. ०००००००

आय.आय.एच.टी.बरगढ, वेंकटगिरी येथे प्रथम व द्वितीय वर्षाकरिता प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

    अलिबाग,दि.12 (जिमाका):-   केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन-2023-24 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीसा) करीता 13 जागा व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाकरिता 1 जागा तसेच वेंकटगिरी करिता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि.23 जून 2023 पर्यंत मागविण्यात येत आहेत.  त्यानुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दि.23 जून 2023 पर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावेत.  प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या  http://www. directortextilesmah.in/main. php , वर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे, असे आयुक्त वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर एम.जे.प्रदीप चंदन यांनी कळविले आहे. ००००००