अपंग, मूकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत

 

 

अलिबाग,दि.15(जिमाका) :- दिव्यांग कल्याण आयुक्तालय, म.रा.पुणे मार्फत शासन मान्यताप्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर या संस्थेत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग, मूकबधीर, मतिमंद, मुला-मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे.

 या प्रशिक्षण केंद्रात शिवण, कर्तन कला, कॉम्प्युटर अकॉऊटिंग व ऑफिस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रिकेटर इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशितांची निवासाची व जेवणाची विनामूल्य सोय केली जाणार आहे.

तरी इच्छुक अपंग, मूकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी दि.05 जुलै 2023 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि.नांदेड येथे अर्ज सादर करावेत किंवा समक्ष भेटावे. अधिक माहितीसाठी मो.क्र.9960900369, 9403207100, 7378641136, 9420846887 वर संपर्क साधावा, असे आवाहन कर्मशाळा अधीक्षक, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक