Posts

Showing posts from May 2, 2021

तृतीयपंथीयांना शासनाकडून मिळणार एकरकमी रु.1 हजार 500 ची आर्थिक मदत माहिती तात्काळ देण्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांचे आवाहन

  अलिबाग, जि.रायगड दि.06 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यामार्फत तृतीय पंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत कोविड-19 या महामारीच्या परिस्थितीमध्ये तृतीय पंथीय व्यक्तींना शासनाकडून एकरकमी रु.1 हजार 500   आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हयातील तृतीय पंथीय व्यक्तींची माहिती शासनाकडे कळवावयाची असून जिल्हयातील तृतीय पंथीयांनी आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर ही माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड कच्छी भवन, नमिनाथ मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग, जि.रायगड येथे संपर्क करुन किंवा या कार्यालयाच्या acsworaigad@gmail.com या ई-मेल आयडी वर पाठवून किंवा समाज कल्याण निरीक्षक श्री.अंकुश पोळ यांच्याशी 7820884580 या मोबाईल नंबरवर संपर्क साधून द्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. ०००००००

व्यापाऱ्यांकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाला मदत सामाजिक बांधिलकी जपत 24 पंखे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्याकडे केले सुपूर्द

  अलिबाग, जि.रायगड दि.06 (जिमाका) :- करोनाच्या संकटात जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांसाठी अलिबागमधील व्यापारी उमेश मोरे, दिलीप जैन, सूरजकुमार यादव, कांतीलाल जैन यांनी सामाजिक बांधिलकी जपत 24 पंखे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्याकडे   सुपूर्द केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, डॉ.अमोल भुसारे, नगरसेवक अनिल चोपडा, रवि थोरात, गणेश मांजरेकर आदी उपस्थित होते. उमेश मोरे, दिलीप जैन, सूरजकुमार यादव, कांतीलाल जैन हे अलिबागमधील प्रसिध्द व्यापारी आहेत. उद्योग व्यवसाय सांभाळत असताना गरजूंना मदत करण्याचे काम ते करीत आहेत. अनेकांना त्यांच्याकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. सध्या सर्वत्र करोनाचे सावट आहे. अलिबागमधील जिल्हा रुग्णालयासह अन्य रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. या महामारीच्या संकटात जिल्हा सामान्य रुग्णालयाला व्यापाऱ्यांनी केलेली ही मदत निश्चितच कौतुकास पात्र आहे, सर्वांसाठी अनुकरणीय आहे. 0000000

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अथक प्रयत्नांनी जिल्ह्यातील आरोग्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून रू. 106.15 कोटी रक्कमेचा भरीव निधी मंजूर

  अलिबाग, जि.रायगड दि.06 (जिमाका) :- जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अथक प्रयत्नांनी जिल्ह्यातील आरोग्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी विविध आरोग्यविषयक कामांकरीता शासनाने एकूण रू. 106.15 कोटी रक्कमेचा भरीव निधी मंजूर केला आहे.   जिल्ह्यातील स्त्री रूग्णालयासाठी रू.70 कोटी, महाड येथील ट्रॉमा केअर युनिटसाठी रू.17 कोटी, विरजोली ता. रोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रू. 9 कोटी, मौजे परसुले, ता. पोलादपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रू. 9 कोटी, मौजे जिते, ता.कर्जत येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी रू. 1 कोटी 15 लक्ष इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या प्राप्त झालेल्या निधीमुळे रायगड जिल्ह्यातील जनतेस अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वेळोवेळी नवीन आरोग्य संस्था स्थापनेस तसेच श्रेणीवर्धनास मान्यता देण्यात आलेली आहे. या आरोग्य संस्था कार्यन्वित होण्याकरीता त्यांचे विहित कालावधीत बांधकाम पूर्ण होऊन जनतेस आरोग्य सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. तसेच सद्यस्थितीत असलेल्या कोविड-19 या संसर्गजन्य आजाराच्या अन

नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मौजे देवघर हरिहरेश्वर येथील जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.06 (जिमाका) :- श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.      या पार्श्वभूमीवर मौजे देवघर, ता.श्रीवर्धन येथील गावठाण नं.1/101/अ क्षेत्र 2-24-50 हे.आर.या सरकारी खुले गावठाण वहिवाटदार ग्रुप ग्रामपंचायत हरिहरेश्वर या मिळकतीपैकी 0-22-0 हे.आर.ही जमीन ग्रुप ग्रामपंचायत हरिहरेश्वर (देवघर) यांच्याकडून शासनाकडे पूर्नग्रहण करण्यात आली असून ही जमीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र हरिहरेश्वर, ता.श्रीवर्धन करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. 000000

कोविड रुग्णांच्या मानसिक समुपदेशनासाठी 130 पेक्षा अधिक स्वयंसेवक सज्‍ज जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात लवकरच सुरु होणार कोविड हेल्पलाईन

  अलिबाग,जि.रायगड, दि.6 (जिमाका):   कोविड-19 या आजाराविषयी समाजामध्ये असणारी भीती आणि सोशल मीडियामुळे निर्माण झालेले गैरसमज याला आळा बसावा, कोविड रुग्णांचे मानसिक समुपदेशन व्हावे, याकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील कोविड हेल्पलाईन करिता 130 पेक्षा अधिक स्वयंसेवकांचे काल (दि.5 मे रोजी ) जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्रीम.निधी चौधरी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने,ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ.अनिल डोंगरे आणि जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ.अमोल भुसारे, ॲड.पल्लवी तुळपुळे, श्री.प्रभाकर नाईक,श्री.सुशील साईकर यांच्यासह अन्य कार्यालयीन कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती तर जवळपास 150 पेक्षा अधिक लोक व्हिडिओ कॉनफरन्सिंद्वारे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज, लोकांमध्ये कोविडबाबत असलेली संभ्रमावस्था, रुग्णांची वाढणारी संख्या याचा विचार करता लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत या गोष्टींची चर्चा करून मानसिक स्वास्थ्य रा

अलिबागमध्ये कौटुंबिक न्यायालय सुरु न्यायप्रविष्ट कौटुंबिक वाद जलदगतीने सोडविण्यास होणार मदत

  वृत्त क्रमांक:- 334                                                                   दिनांक:- 05 मे 2021   अलिबाग,जि.रायगड, दि.5 (जिमाका):   न्यायप्रविष्ट वैवाहिक वादाची तसेच कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे जलदगतीने व सामोपचाराने निकाली निघावीत, यासाठी जिल्ह्यातील अलिबागमध्ये कौटुंबिक न्यायालयाचे आभासी उद्घाटन मंगळवार, दि.5 एप्रिल रोजी संपन्न झाले. यामुळे अन्य सत्र न्यायालयांवरील ताण कमी होणार असून न्यायप्रविष्ट कौटुंबिक वाद जलदगतीने सोडविण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाचे आभासी उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.सुरेश गुप्ते यांच्या शुभहस्ते विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश अभय जोगळेकर, बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण ठाकू

कृषी विभागाचे विविध पुरस्कार (भाग-3)

  विशेष लेख क्र.31                                                               दिनांक :- 05 मे 2021   महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, कृषीभूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी व कृषी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात येते. तसेच याच विविध पुरस्कारांच्या धर्तीवर सन-2020 पासून राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व नाविण्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांनाही युवा शेतकरी पुरस्कार देण्यात येणार आहे. शासनाच्या सन 2020 करिता 1) डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न, 2) वसंतराव नाईक कृषीभूषण 3) जिजामाता कृषीभूषण, 4) सेंद्रीय शेती कृषीभूषण, 5) वसंतराव नाईक शेतीमित्र, 6) युवा शेतकरी,

जिल्हा प्रशासन लागले मान्सून पूर्व तयारीला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

  वृत्त क्रमांक:- 333                                                                   दिनांक:- 05 मे 2021   अलिबाग,जि.रायगड, दि.5 (जिमाका): रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पूर्व तयारी व करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड यांच्या अध्यक्षतेखाली दि.23 व 27 एप्रिल   रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषद अलिबाग,अध्यक्षा, योगिता पारधी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे इतर सदस्य ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी भारतीय हवामान विभागाच्या पूर्वअंदाजानुसार यावर्षी सरासरीच्या 98 टक्के पर्जन्यमान असण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने येणाऱ्या मान्सून कालावधीमध्ये निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीस सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी

लॉकडाऊन काळात शासनाच्या विविध योजनांमुळे दुर्बल घटकांना मिळाला मोठा आधार पनवेल तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकांना 79 लाखांचे अर्थसहाय्य

      अलिबाग,जि.रायगड, दि.5 (जिमाका): लॉकडाऊनच्या काळात पनवेल तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकांच्या उपजीविकेसाठी   जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार विजय तळेकर यांनी विविध योजनेच्या लाभार्थ्यांना 79 लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप केले. करोनाच्या दुसऱ्या लाटेत करोना प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत शासनाने काही उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यातील एक महत्वाचा निर्णय राज्यातील दुर्बल घटकांना   माहे एप्रिल आणि मे मध्ये अर्थसहाय्य   करण्याबाबतचा होता. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तात्काळ नियोजन केले. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्याचे तहसिलदार विजय तळेकर यांनी तब्बल 4 हजार 693 लाभार्थ्यांना एकूण 78 लाख 99 हजार 800 रुपयांच्या धनादेशाचे वाटप केले. यामध्ये संजय गांधी निराधार योजना 1 हजार 796 लाभार्थ्यांना एकूण 38 लाख 60 हजार 400, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून 1 हजार 998 जणांना 36 लाख 22 हजार 400, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनाद्वारे 828 जणांना 37 लाख 4 ह

कृषी विभागाचे विविध पुरस्कार (भाग-2)

  विशेष लेख क्र.30                                                               दिनांक :- 05 मे 2021   महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, कृषीभूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी व कृषी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात येते.   तसेच याच विविध पुरस्कारांच्या धर्तीवर सन-2020 पासून राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व नाविण्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांनाही युवा शेतकरी पुरस्कार देण्यात येणार आहे. शासनाच्या सन 2020 करिता 1) डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न, 2) वसंतराव नाईक कृषीभूषण 3) जिजामाता कृषीभूषण, 4) सेंद्रीय शेती कृषीभूषण, 5) वसंतराव नाईक शेतीमित्र, 6) युवा शेतकर