लॉकडाऊन काळात शासनाच्या विविध योजनांमुळे दुर्बल घटकांना मिळाला मोठा आधार पनवेल तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकांना 79 लाखांचे अर्थसहाय्य

 


 

 

अलिबाग,जि.रायगड, दि.5 (जिमाका): लॉकडाऊनच्या काळात पनवेल तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकांच्या उपजीविकेसाठी  जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार विजय तळेकर यांनी विविध योजनेच्या लाभार्थ्यांना 79 लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप केले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत करोना प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत शासनाने काही उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यातील एक महत्वाचा निर्णय राज्यातील दुर्बल घटकांना  माहे एप्रिल आणि मे मध्ये अर्थसहाय्य  करण्याबाबतचा होता. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तात्काळ नियोजन केले. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्याचे तहसिलदार विजय तळेकर यांनी तब्बल 4 हजार 693 लाभार्थ्यांना एकूण 78 लाख 99 हजार 800 रुपयांच्या धनादेशाचे वाटप केले.

यामध्ये संजय गांधी निराधार योजना 1 हजार 796 लाभार्थ्यांना एकूण 38 लाख 60 हजार 400, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून 1 हजार 998 जणांना 36 लाख 22 हजार 400, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनाद्वारे 828 जणांना 37 लाख 4 हजार 400 तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनातून 71 महिलांना 42 हजार 600 रूपये असे मिळून  4 हजार 693 लाभार्थ्यांना एकूण 78 लाख 99 हजार 800 रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार विजय तळेकर यांनी दिली.

यामुळे लॉकडाऊन काळात उपजीविकेचा प्रश्न उद्भलेला असतानाही शासनाच्या विविध योजनांमुळे दुर्बल घटकांना या देण्यात आलेल्या दोन महिन्यांच्या अर्थसहाय्यातून मोठा आधार मिळाला आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक