Posts

Showing posts from June 25, 2023

ग्रामविकास अंतर्गत रायगड जिल्ह्यात उत्तम काम ग्रामीण विकास मंत्रालय संचालक यश पाल यांचे गौरोवोद्गार

    अलिबाग,दि.30(जिमाका):-  केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक उषा पोळ व संचालक यश पाल यांनी केंद्रीय ग्रामविकास अंतर्गत रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी रायगड जिल्ह्यात ग्रामविकास अंतर्गत उत्तम काम करण्यात आले असून, या पुढील कालावधीतही असेच काम करावे, असे गौरोवोद्गार यश पाल यांनी काढले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात केंद्रीय ग्रामविकास अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सुरबा नाना टिपणीस सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सुरुवातीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी रायगड जिल्ह्याची भौगोलिक माहिती दिली. तसेच जिल्ह्यात ग्रामीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. यानंतर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक उषा पोळ व संचालक यश पाल यांनी योजनानिहाय कामांचा आढावा घेतला. यामध्ये घरकुल योजना, रोजगार हमी योजना, वृक्षलागवड, स्वच्छ भारत मिशन, जळजीवन मिशन, बचत गट यांसह विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी यश

जिल्ह्याच्या प्राणी क्लेश सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नेमणुकीसाठी पात्र इच्छुक व्यक्ती/संस्थांनी अर्ज सादर करावेत

  अलिबाग,दि.30(जिमाका):- रायगड जिल्ह्याच्या प्राणी क्लेश सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नेमणूका करण्याविषयी शासनाच्या कृषी पदुम विभागाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. या समितीवर रायगड जिल्ह्यातील शासनमान्य गोशाळा पांजरापोळ यांच्याकडील एक सदस्य, प्राणी कल्याणासाठी झटणाऱ्या विश्वस्त संस्थाकडून दोन सदस्य तसेच प्राण्यांबाबत मानवतावादी कार्य करणारे, प्राणी प्रेमी यांच्यातून 5 ते 6 सदस्यांची नेमणूक करावयाची आहे.     याकरिता रायगड जिल्ह्यातील गोशाळा, पांजरापोळ प्राण्याविषयी कार्य करणाऱ्या विश्वस्त संस्था, प्राण्याबाबत मानवतावादी कार्य करणाऱ्या पात्र इच्छुक व्यक्ती, संस्थांनी जवळच्या पशुवैद्यकीय संस्था, पंचायत समितीकडील पशुसंवर्धन विभाग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त रायगड-अलिबाग यांच्याशी संपर्क करुन अर्ज प्राप्त करुन घ्यावा.      अर्ज दि.15 जुलै 2023 पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड-अलिबाग कार्यालयाकडे सादर करावा. अर्जासोबत त्यांनी केलेल्या प्राणी कल्याण विषयक कार्याबाबतचे अनुभव प्रमाणपत्र सादर करावे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपाय

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 66 मि.मी.पावसाची झाली नोंद

  अलिबाग,दि.30 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 66.00 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग-33.08 मि.मी., पनवेल- 63.06 मि.मी.,कर्जत-72.01 मि.मी., खालापूर- 47.00, उरण-43.09 मि.मी., सुधागड-78.08 मि.मी., पेण-55.08 मि.मी., महाड-91.06 मि.मी. माणगाव- 62.04 मि.मी., रोहा- 86.07 मि.मी., पोलादपूर- 95.06 मि.मी, मुरुड- 66.08 मि.मी., श्रीवर्धन- 66.05 मि.मी., म्हसळा-82.00 मि.मी., तळा- 66.09 मि.मी. 0000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 96 मि.मी.पावसाची झाली नोंद

  अलिबाग,दि.29(जिमाका):-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 96.9 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग-161.01 मि.मी., पनवेल- 87.03 मि.मी.,कर्जत-67.05 मि.मी., खालापूर- 63.06, उरण-103.03 मि.मी., सुधागड-78.03 मि.मी., पेण-109.03 मि.मी., महाड-86.05 मि.मी. माणगाव- 70.03 मि.मी., रोहा- 75.08 मि.मी., पोलादपूर- 78.01 मि.मी, मुरुड- 141.01 मि.मी., श्रीवर्धन- 118.05 मि.मी., म्हसळा-71.09 मि.मी., तळा- 105.05 मि.मी. 0000000

ग्राहकांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी "बँक ऑफ इंडिया" कटिबध्द --कार्यकारी निर्देशक सूब्रात कुमार

Image
  अलिबाग,दि.29 (जिमाका):- ग्राहकांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी बँक ऑफ इंडिया, शाखा अलिबाग कटिबध्द असल्याचे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी निर्देशक सूब्रात कुमार यांनी येथे केले.                   बँक ऑफ इंडिया, अलिबाग शाखेचे (दि.19 जून) रोजी नवीन जागेत स्थलांतर झाले असून त्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.              यावेळी नॅशनल बँकिंग समूह पश्चिम विभागाचे महाप्रबंधक श्री.सुब्रतो कुमार रॉय, रायगड विभागाचे विभाग प्रमुख श्री. मुकेश कुमार, उपविभाग प्रमुख श्री.जॉन लोबो, अग्रणी बँक प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, शाखाधिकारी सनी बर्नवाल,  नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी श्री. प्रदीप अपसुंदे तसेच विभागीय कार्यालयाचे पदाधिकारी आणि ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.              यावेळी बोलताना सूब्रात कुमार म्हणाले की, बँकिग सुविधा सुधारण्याबरोबर  कृषी, महिला बचतगट, छोटे-मोठे व्यवसाय यासाठी रायगड जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून बँक ऑफ इंडिया नेहमीच अग्रेसर राहिली आहे. यावर्षी सुध्दा ग्राहकांप्रती आमची समर्पक भावना अशीच राहणार आहे.   “ बँकेचे नाते बँकिंग प

पाणी बचतीसाठी कटिबद्ध होवू या... राष्ट्रीय कर्त्यव्य पार पाडू या..! -- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

  अलिबाग,दि.29 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडून देखील काही प्रमाणात पाणी टंचाई जाणवतेच. याला अनेक कारणे असली तरी वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण, वाढते नागरिकीकरण, यामुळे पाण्याचा दरडोई वापर देखील वाढला आहे. प्रदूषणामुळे पाण्याचे स्त्रोत दूषित होत आहेत. आता हे टाळण्यासाठी सर्वांनी मिळून पाणी बचतीसाठी कटिबद्ध होवू या... राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू या.., असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.    जिल्ह्यात ग्रामीण भागात  पाण्याचा काटकसरीने वापर, "पाणी अडवा पाणी जिरवा" मोहीम राबविणे व पाण्याच्या काटकसरीने वापराबरोबरच या नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करण्यासाठी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभिनव उपक्रम व कृतीशील पाऊले उचलली जात आहेत.    अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक श्रीमती प्रियदर्शिनी मोरे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी  राजेंद्र भालेराव व पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी श्रीमती शुभांगी नाखले या सर्वांच्या समन्वयाने पा

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

अलिबाग,दि.29 (जिमाका):- वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या विजेच्या तारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे. तसेच पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने केले आहे.              अतिवृष्टी, वादळी पाऊस आदिंमुळे तुटलेल्या विजेच्या तारा, विजेचे खांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीच बोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तू, इतर साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झा

गोशाळा अनुदानासाठी 19 जुलै पर्यंत अर्ज करावेत

    अलिबाग,दि.29(जिमाका):- गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील तालुक्यातून योजना राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कर्जत तालुक्यातील लाभार्थ्यांना हा लाभ आधी मिळाला असून आता पनवेल, खालापूर, कर्जत, पेण, रोहा,पाली-सुधागड, माणगाव, महाड, पोलादपूर, तळा, श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग या प्रत्येक तालुक्यातून एका गोशाळेसाठी अनुदान देण्यात येणार असून इच्छुकांनी आपले अर्ज दि.19 जुलै 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.रत्नाकर काळे यांनी केले आहे.               इच्छुकांनी नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आपल्या संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावेत, असेही त्यांनी कळविले आहे. 000000

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी “महास्वयम” वेब पोर्टलवर इच्छुक पात्र उमेदवारांनी नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा --सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार

    अलिबाग,दि.29 (जिमाका):- जागतिक कौशल्य स्पर्धा ही WSI सदस्य देशांपैकी एका देशामध्ये आयोजित केली जाणारी सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धेच्या तोडीची आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024 मध्ये फ्रान्स ( ल्योन ) येथे होणार आहे.  याकरिता कुशल उमेदवारांची निवड करण्याच्या दृष्टीने जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर निवड स्पर्धा घेतली जाणार असून याद्वारे विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि ज्ञानाची चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक जिंकण्याचीही संधी आहे. ही जागतिक कौशल्य स्पर्धा  दर दोन वर्षांनी होत असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुण यामध्ये सहभागी होऊ शकतात. 52 विविध कौशल्य क्षेत्रांमध्ये होणाऱ्या या जागतिक स्पर्धेत भारताकडून सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींना  “ महास्वयम ”  वेब पोर्टल वरून आपला सहभाग नोंदविता येणार आहे.       या जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि.1 जाने

शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात मिळणार पिक विमा ई-पीक ॲपव्दारे पिकांच्या नोंदी 7/12 वर करण्याचे आवाहन

    अलिबाग,दि.29 (जिमाका):-  जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना Cup & Cap Model (80:110) नुसार खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपव्दारे आपल्या पिकांची नोंदी 7/12 उताऱ्यावर करुन घ्यावी, असे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम.उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.     योजनेची उद्दिष्टे :-  नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.     योजनेची वैशिष्टे :-  कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के. रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्क

रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील पेण व अलिबाग तालुक्यातील प्रवासी वाहनास बदली वाहन म्हणून नोंदणी करण्यास मान्यता

  अलिबाग,दि.29 (जिमाका) :- जे.एस.ए.निर्मित ऑटो रिक्षा (तीन चाकी-सहा आसनी) पेट्रोल/सीएनजी या प्रवासी वाहनास परवानगी देण्याबाबतच्या प्रस्तावास मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने सहमती दर्शविली होती व याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यास दि. 05 जून 2023 नुसार शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील पेण व अलिबाग या तालुक्यातील वाहनमालकांनी विक्रम मिनिडोअर तीन चाकी-सहा आसनी हे वाहन निर्लेखित केल्यास त्या बदल्यात ऑटोरिक्षा तीन चाकी-सहा आसनी पेट्रोल/सीएनजी या प्रवासी वाहनास बदली वाहन म्हणून नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांच्या कार्यक्षेत्रातील पेण व अलिबाग तालुक्यातील वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी केले आहे.              मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि.17 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र परिव

आदिवासी मुलांच्या नवीन पनवेल येथील शासकीय वसतिगृहाकरिता हवी भाडेतत्वावर इमारत

    अलिबाग,दि.28(जिमाका) :-  आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह पनवेल (नवीन), ता.पनवेल, जि.रायगड, येथे सुरु असून आता पनवेल परिसरामध्ये या वसतिगृहातील 100 विद्यार्थ्यांना पुरेशी अशी सर्व सोयीसुविधांयुक्त इमारत भाडेतत्वावर मिळणे आवश्यक आहे.      तरी अशा प्रकारची सर्व सोयी-सुविधांयुक्त इमारत उपलब्ध असल्यास संबंधितांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण जि.रायगड (02143 252519)  व गृहप्रमुख, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, पनवेल (नवीन), ता.पनवेल जि.रायगड (श्री.सोळसकर- 8275929569) कार्यालयाशी संपर्क साधून त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव  दि.5 जुलै, 2023 रोजीपर्यंत सादर करावा,असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,पेण च्या प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांनी केले आहे. 0000000

देवकुंड धबधबा", "सिक्रेट पॉईंट" व "ताम्हाणी घाट" या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी

  "   अलिबाग,दि.28(जिमाका):-   पोलीस निरीक्षक माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हरीतील  "देवकुंड धबधबा"  व सणसवाडी गावचे हद्दीतील  "सिक्रेट पॉईंट"  व  "ताम्हिणी घाट"  हा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. ही ठिकाणे नैसर्गिक दुर्गम भागात असल्यामुळे तेथे कोणत्याही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सन 2017 पावसाळी हंगामात या ठिकाणी भेट दिलेल्या पर्यटकांमधील 4 पर्यटक हे नदीच्या प्रवाहात वाहत जाऊन मृत्यूमुखी पडले होते. तसेच सुमारे 55पर्यटक हे अचानक पाण्याचा जोर वाढल्याने नदीपात्रात अडकले होते. सन 2018 चे पावसाळी हंगामातदेखील फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेशाची मुदत संपल्यानंतर 3 पर्यटक हे नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते व मृत्युमुखी पडले होते. सन 2022 मध्ये एक पर्यटक नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्यात वाहून जाऊन मयत झाला आहे. त्याचबरोबर सिक्रेट पॉईंट या ठिकाणी सुरक्षा 'व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटक

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

  अलिबाग,दि.28(जिमाका):-   सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणारे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह महाड येथे कार्यरत आहे. वसतिगृहाकरिता सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या वसतिगृहात इयत्ता आठवी पासून पुढे शिकणात्या विद्यार्थिनीला गुणवत्तेनुसार व प्रवर्गनिहाय प्रवेश दिला जाईल. शालेय- 30 जागा, इयता 11 वी 12 वी-15 जागा, व वरिष्ठ महाविद्यालय 15 जागा व व्यावसायिक - अभ्यासक्रमाकरिता -15 विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास, भटक्या जमाती इत्यादी संवर्गात इयत्ता आठवी पासून व भंगी, मांग, गौड, कातकरी, माडिया गोंड इत्यादी जमातीमधील विद्यार्थिनींना इयत्ता 5वी पासून विशेष प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. वसतिगृह प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे :- मागील इयत्तेची मार्कलिस्ट झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला/ बोनाफाईट झेरॉक्स व विद्यार्थिनीचा 1 फोटो, तहसिलदाराकडील उत्पनाच्या दाखल्याची झेरॉक्स (उत्पन्न अट SC,ST. 2 लाख 50 हजार व इतर जातीच्या विद्यार्थींनींना 1 लाख 50 हजार,  SC/ST/VJNT/OBC या प्रवर्गातील विद्यार्थिनींकरिता जातीच्

महाड येथील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

  अलिबाग,दि.28(जिमाका):-   समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या अधिनस्त मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, महाड़, पंचशिल नगर, तालुका पोलीस स्टेशन जवळ, ता. महाड येथे 100 मुलांचे शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. शासकीय वसतिगृहात गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. याबाबत आरक्षण अनुसूचित जाती 80 टक्के अनुसूचित जमाती 03 टक्के विमुक्त जाती, भटक्या जमाती- 05 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के आर्थिकदृष्ट्या मागास 5 टक्के अनाथ- 3 टक्के, अपंग- 2 टक्के, असे आहे.  प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजन व्यवस्था, शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व महाविद्यालयीन प्रवेशितांकरिता लेखन साहित्याकरिता रु.4 हजार शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता, दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता दरमहा रु.500 निर्वाहभत्ता, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाच्या दोन संचाकरिता गणवेष भत्ता, प्रोजेक्ट रिपोर्ट/शैक्षणिक सहल भत्ता, अॅप्रन भत्ता ही वैशिष्ट्ये आहेत. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न

खालापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे व परिसरात कलम 144 लागू

अलिबाग, दि.28(जिमाका) :-   पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात व दुर्देवाने काही प्रमाणात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात.    त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये,  याकरिता खालापूर तालुक्यातील पळसाचा बंधारा (टेपाचीवाडी नढाळ), पोखरवाडी बंधारा, झेनिथ धबधबा, झेनिथ धबधबा व परिसर, आडोशी धबधबा, आडोशी पाझर तलाव, नढाळ बंधारा, मोरबे धरण, वावर्ले धरण, डोणवत धरण, कलोते धरण, धामणी कातकरवाडी धरण, भिलवले धरण माडप धबधबा, बोरगाव धबधबा  या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या 1 कि.मी. परिसरात पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे,धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, पावस

कर्जत तालुक्यातील पर्यटन स्थळे व परिसरात कलम 144 लागू

    अलिबाग, दि.28 (जिमाका):-  पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात व दुर्देवाने काही प्रमाणात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात.    त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये,  याकरिता कर्जत तालुक्यातील दहिवली पूल, कोमलवाडी धबधबा, बेडीसगाव धबधबा, टपालवाडी धबधबा, आनंदवाडी धबधबा, जुम्मापट्टी धबधबा, मोहिली धबधबा, वदप धबधबा, आषाणे धबधबा, पळसदरी धरण व धबधबा, कोंढाणे लेणी व धबधबा, सोलनपाडा धरण, बेकरे कोल्हा धबधबा, पाली भूतिवली धरण, डोंगरपाडा धरण, पाषाणे धरण, खांडस धरण, साळोख धरण, अवसरे धरण, सिलिया पॉईंट (शार्लोट लेक)  या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या 1 कि.मी. परिसरात पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे,धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याह

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 42 मि.मी. पावसाची झाली नोंद

अलिबाग,दि.28 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 42.5 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग-49.00 मि.मी., पनवेल- 29.05 मि.मी.,कर्जत- 36.00 मि.मी., खालापूर- 25.07, उरण- 30.05 मि.मी., सुधागड-36.01 मि.मी., पेण-52.00 मि.मी., महाड-57.02 मि.मी. माणगाव- 55.02 मि.मी., रोहा- 29.09 मि.मी., पोलादपूर- 57.05 मि.मी, मुरुड- 36.01 मि.मी., श्रीवर्धन- 21.09 मि.मी., म्हसळा-40.03 मि.मी., तळा- 73.08 मि.मी. 00000

"बकरी ईद"ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, दि.28 जून ऐवजी गुरुवार, दि.29 जून रोजी जाहीर

               अलिबाग,दि.28(जिमाका):- शासनाकडून सन 2023 या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील "बकरी ईद" ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, दि.28 जून 2023 रोजी दर्शविण्यात आली होती. मात्र हा सण गुरुवार, दि.29 जून 2023 रोजी येत असल्याने दि.28 जून 2023 रोजीची सुट्टी रद्द करुन गुरुवार, दि.29 जून 2023 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सो.ना.बागुल यांनी जाहीर केली आहे.        तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 000000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 1 ली इयत्तेत प्रवेशाची सूवर्णसंधी इच्छुकांनी 30 जून 2023 पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक

                 अलिबाग,दि.28 (जिमाका):- सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.       या प्रवेशासाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसुचित जमातीचा असावा, पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी, या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलाच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रुपये 1 लाख इतकी असावी, इ.१ली त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्षे पूर्ण असावे, दि.31 डिसेंबर 2023 पर्यत सहा वर्षे पूर्ण असावे, अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाकडून देण्यात आलेला जन्म दाखला तसेच अंगणवाडी मध्ये प्रवेश घेतला असल्यास अंगणवाडीकडून मिळालेला जन्माचा दाखला जोडण्यात यावा, विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, आधारकार्ड ची छायांकित प्रत जोडण्यात यावी, विद्यार्थ्याचे पालक शासकीय/ निमशासकीय नोकरदार नसावेत, खोटी माहिती साद

तंत्रनिकेतन प्रवेशासाठी दि.30 जून पर्यंत मुदतवाढ

  अलिबाग,दि.28(जिमाका):-  विविध तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता दि.21 जून 2023 ही अखेरची मुदत होती.  मात्र विविध जिल्ह्यांमधून प्रवेशासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे मिळण्यास  सर्व्हर  डाऊन असल्याकारणाने विलंब होत होता. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रे मिळण्यास अडचणी येत होत्या. या बाबींचा प्रशासकीय स्तरावर विचार होऊन तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर यांनी सुरू असलेल्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज करण्यास दि. 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे एस.एस.सी.उत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांना आता दि. 30 जून पर्यंत ऑनलाईन नोंदणी, कागदपत्राच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची व्यक्तिशः अथवा ई- पडताळणी करणे, अर्ज भरल्याची निश्चिती करणे या बाबी करता येणार आहेत.   तात्पुरती गुणवत्ता यादी दि.3 जुलै 2023 ला जाहीर होणार आहे.  गुणवत्ता यादीवर आक्षेप असल्यास दि. 4 व दि.5 जुलै 2023 ला घेता येणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादी दि.7 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.    अभियांत्रिकी पदविका अभ

सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणाचा इच्छुकांनी लाभ घ्यावा

               अलिबाग,दि.28 (जिमाका):-  मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व  परिचालन या  प्रशिक्षणाच्या  दि.01 जुलै 2023 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रायगड-अलिबाग येथे सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांकडून दि.30 जून 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा मोबाईल व व्हॉट्सअप क्र.9860254943 वर संपर्क साधल्यास विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्ज स्वत:च्या हस्ताक्षरात भरुन त्यावर संस्थेची शिफारस घेवून दि.30 जून 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी व्हॉट्सअप क्र. 9860254943 वर किंवा  ftoalibag@rediffmail.com  या ईमेल वर सादर करावेत.        अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रायगड-अलिबाग, 102/103 समृध्दी को.ऑप.हौसिंग सोसायटी, घरत आळी, एसटी स्टँडजवळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सु.शं.बाबुलगावे यांनी केले आहे. प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद

महाज्योती मार्फत जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

    अलिबाग,दि.28(जिमाका) :-   महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)   नागपूर मार्फत जेईई, नीट, एमएचटी-सीईटी करिता 10 वी नंतर प्रशिक्षण देण्यात येते.  हे प्रशिक्षण दोन वर्षासाठी असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोज 6 जीबी डेटा देण्यात येतो.  10 वी उत्तीर्ण झालेल्या व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना महाज्योतीच्या जेईई ,  नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. याकरिता महाज्योती संस्थेने इच्छूक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी दि.05 जुलै 2023 पर्यत     मुदतवाढ दिली आहे. या  योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा ,   विद्यार्थी हा इतर मागास वर्ग ,   विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा, तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा, योजनेच्या संदर्भातील सर्व अटी व शर्ती या महाज्योतीच्या   www.mahajyoti. org   या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेत स्थळावरील सूचना फलकात जाऊन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.  तसेच ज्या उमेदवारांनी या आधी जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्